चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ जून २०१९

Date : 29 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘राजधानी’, ‘शताब्दी’सह रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रस्ताव नाही :
  • नवी दिल्ली : रेल्वेचे किंवा राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाडय़ांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. रेल्वेचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा होती त्या पाश्र्वभूमीवर गोयल यांनी वरील बाब स्पष्ट केली.

  • खासगीकरण आणि संपूर्ण रेल्वे यांचे खासगीकरण करण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना गोयल यांनी राज्यसभेत लेखी उत्तर दिले आणि खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.

  • राजधानी, शताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या गाडय़ांचे सरकार खासगीकरण करणार आहे ही वस्तुस्थिती आहे का, असा प्रश्न सपाचे खासदार सुरेंद्र नाथ नागर यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना गोयल म्हणाले की, राजधानी-शताब्दीचे आणि रेल्वेचे खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

  • रेल्वेत भरती - रेल्वेमध्ये लवकरच नऊ हजार पदांची भरती केली जाणार आहे, हवालदार आणि पोलीस उपनिरीक्षक पदे भरली जाणार असून त्यामध्ये ५० टक्के महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे, असेही गोयल यांनी ट्वीट केले आहे.

देशात सर्वाधिक साडेतीन हजार स्टार्टअप महाराष्ट्रात :
  • ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात 19 हजार 351 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. या योजनेंतर्गत देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्राने आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यात एकूण 68 स्टार्टअप मध्ये 440 कोटी 38 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक झाली आहे.

  • केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने 16 जानेवारी 2016 पासून देशभरात ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. एकूण 19 कृती आराखड्यानुसार सुरु असलेल्या या कार्यक्रमावर देखरेख ठेवणाऱ्या केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) 24 जून रोजी राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची यादी जाहीर केली आहे.

  • या यादीत देशातील 29 राज्ये आणि 7 केंद्र शासीत प्रदेशांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. या यादीत महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक 2 हजार 847, दिल्ली 2 हजार 552, उत्तरप्रदेश 1 हजार 566 तर 1 हजार 80 स्टार्टअपसह तेलंगण पाचव्या स्थानावर आहे.

  • लघु उद्योग विकास बँकेने भांडवली बाजारावर देखरेख ठेवणाऱ्या ‘सेबी’ संस्थेकडे नोदंणीकृत संस्थांच्या माध्यमातून स्टार्टअप उद्योगांसाठी वैकल्पिक गुंतवणूक निधी उभारला आहे. या निधीच्या माध्यमातून देशभरात 13 राज्ये आणि दिल्लीत 247 स्टार्टअप उद्योगांत 1 हजार 625 कोटी 73 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक केली आहे.

आयसीएसई विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशबाबत शिक्षण विभागाचा नवा निर्णय :
  • मुंबई: आयसीएसई विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर जे सरासरी गुण देण्यात आले त्या सहा विषयांपैकी पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण अकरावी प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील, असे आदेश शिक्षण उपसंचालकाना देण्यात आले होते.

  • आयसीएई विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशप्रक्रियेसंबंधी शिक्षण विभागाने 19 जून रोजी जे परिपत्रक काढले होते त्यानुसार आयसीएसई मार्कशीटवर असलेल्या सहापैकी पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जाणार होते. आता पुन्हा एकदा बदल करत आणखी एक नवा निर्णय सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांना कळविण्यात आला आहे.

  • आयसीएसई मार्कशीटवर विषयांची विभागणी A,B आणि C ग्रुपमध्ये ( ग्रुप 1, ग्रुप2 आणि ग्रुप 3) अशी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सहा विषय घेतले होते त्यांचे ग्रुप A मधील तीन विषय, ग्रुप B मधील दोन विषय आणि ग्रुप C मधील 1 विषय अशी विभागणी केली होती.

  • यामध्ये मार्कशीटवर असलेले पहिले पाच विषय हे ग्राह्य धरले जाणार होते, मात्र या तीन ग्रुप्स पैकी फक्त ग्रुप A आणि B च्या पाच विषयांचेच गुण आता ग्राह्य धरले जाणार आहेत. C ग्रुप मधील एक विषय स्पेशल सब्जेक्ट आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा हा विषय वेगळा असल्याने या सरासरीमध्ये या विषयाचे गुण धरले जाणार नाहीत.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्राची २० सूत्री व्यापक योजना :
  • नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याची कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली. राज्यनिहाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या यादीत तेलंगणा आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्र अग्रणी आहे. शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढल्यानंतर केंद्र सरकारने २० सूत्री व्यापक योजना आखली असून, या योजनेमुळे शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण निश्चित कमी होईल, असा दावा सरकारने राज्यसभेत केला.

  • २०१६, २०१७ आणि २०१८ मधील यासंबंधीची आकडेवारी उपलब्ध नाही, अशी माहितीही सरकारने राज्यसभेत दिली. तथापि, बिहार झारखंड, जम्मू-काश्मीर आणि गोव्यासह ३६ राज्यांपैकी १६ राज्यांत एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही.

  • केंद्राच्या २० सूत्री व्यापक योजनेतहत राज्यांमार्फत राबविण्यात येणाºया कार्यक्रमामुळे शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल, असा दावा केंद्रीय कृषी आणि ग्रामीणविकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केला. कृषी हा राज्यांचा विषय असल्याने राज्य सरकार यादृष्टीने केंद्रीय योजना, कार्यक्रम हाती घेऊन प्रभावी अंमलबजावणी करतात.

  • सरकारने २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ठरविले आहे. याबाबत शिफारस करण्यासाठी २०१६ मध्ये आंतर-मंत्रालय समिती स्थापन केली होती. समितीच्या शिफारशी अमलात आणण्याच्या दृष्टीने निगराणीसाठी यावर्षी २३ जानेवारी रोजी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७१: ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.

  • १९७४: इसाबेल पेरेन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

  • १९७५: स्टीव्ह वोजनियाक यांनी ऍपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.

  • १९७६: सेशेल्सला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९८६: आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.

  • २००१: ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.

  • २००१: पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.

  • २००७: ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

जन्म 

  • १७९३: प्रोपेलर चे शोधक जोसेफ रोसेल यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८५७)

  • १८६४: शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म.

  • १८७१: मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९३४)

  • १८९१: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)

  • १८९३: भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट चे संस्थापक प्रसंत चंद्र महालनोबिस यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १९७२)

  • १९०८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १९६८)

  • १९३४: रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९८)

  • १९४५: श्रीलंकेच्या ५व्या राष्ट्राध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगा यांचा जन्म.

  • १९४६: पनामाचे राष्ट्राध्यक्ष अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस यांचा जन्म.

  • १९५६: पोर्तुगालचे पंतप्रधान पेद्रोसंताना लोपेस यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७३: बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८२४)

  • १८९५: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक थॉमस हक्सले यांचे निधन. (जन्म: ४ मे १८२५)

  • १९६६: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०७)

  • १९८१: मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)

  • १९९२: अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद बुदियाफ यांचे निधन.

  • १९९२: सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे यांचे निधन.

  • १९९३: चिमणराव-गुंड्याभाऊ  मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक आणि अभिनेते विष्णुपंत जोग यांचे निधन.

  • २०००: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)

  • २००३: हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०७)

  • २०१०: विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.