चालू घडामोडी - २९ जून २०१७

Date : 29 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताच्या ९५ सदस्यांचा संघाची निवड :
  • भारताच्या संघात ४६ महिला खेळाडू आहेत.

  • भुवनेश्वर येथे ६ ते ९ जुलै दरम्यन होणाऱ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताने आपला ९५ सदस्यांच्या संघाची निवड असून भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यजमान भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे.

  • कलिंगा स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या निर्धाराने भारताने आपला सर्वोत्तम संघ निवडला आहे.

  • दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारे सर्व खेळाडू लंडन येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार असून ही स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे.

आशियाई फुटबॉल महासंघातर्फे इंडियन सुपर लीगला अधिकृत मान्यता :
  • आता आयलीग विजेता एएफसी चॅम्पियन्स लीग क्वालिफायरमध्ये सहभाग घेईल, तर पुढील आयएसएल चॅम्पियन एएफसी कप क्वॉलिफाइंगमध्ये सहभागी होईल.

  • आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) इंडियन सुपर लीगला (आयएसएल) अखेर अधिकृत मान्यता प्रदान केली, आता देशात २०१७-१८ पासून दोन राष्ट्रीय लीग होतील.

  • तसेच या लीगला पहिली तीन वर्षे एएफसीची मान्यता नव्हती व गेल्या काही कालावधीपासून त्यांनी मान्यतेसाठी प्रयत्न केला असून एएफसीने अखेर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) प्रस्ताव मान्य केला.

३४व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक :
  • म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू झाली. ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुलांच्या गटात उत्कर्षने ३४.३० सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.

  • भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे आयोजित ३४व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोर, संजिती सहा, वेदिका अमीन यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले.

  • उत्कर्ष हा दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये पाचवीत शिकत असून हार्मनी क्लब येथे नरेंद्र आचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : सेशेल्स.

  • सैनिक दिन : नेदरलँड्स.

जन्म, वाढदिवस

  • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिध्द नाटककर, साहित्यिक व विनोदी लेखक : २९ जून 

  • १९५६पेद्रो संताना लोपेस, पोर्तुगालचा पंतप्रधान : २९ जून १८७१

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • मायकेल मधुसूदन दत्त, बंगाली कवी : २९ जून १८७३

  • कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासीक कादंबरीकार : २९ जून २०००

ठळक घटना

  • विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे पहिले प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात : २९ जून १६१३

  • अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर : २९ जून १९५६

  • पहिल्या महायुद्धातील शौर्याच्या कृतज्ञतेदाखल फ्रांसने कॅनडाला व्हिमी रीज येथे १ वर्ग कि.मी. जागा तहहयात दिली : २९ जून १९२२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.