चालू घडामोडी - २९ ऑगस्ट २०१७

Date : 29 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशाचे ४५ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. दीपक मिश्रा :
  • देशाचे ४५ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. दीपक मिश्रा (६४) यांचा सोमवारी शपथविधी झाला असून राष्ट्रपती भवनात त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.

  • शपथविधीला उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद व अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

  • त्यांचा कार्यकाळ २ आॅक्टोबर २०१८पर्यंत आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहर हे रविवारी निवृत्त झाले.

  • निर्भया बलात्कार व हत्या खटल्यात चार दोषींना देहदंडाची शिक्षा कायम करणाºया खंडपीठात मिश्रा यांचा समावेश होता.

  • चित्रपटगृहांत राष्ट्रगीताचे गायन बंधनकारक करण्याचा आदेशही त्यांचाच, याकुब मेमनच्या फाशीची सुनावणी त्यांनी मध्यरात्री घेतली असून प्रघातानुसार मिश्रा यांचे नाव सरन्यायाधीश खेहर यांनी गेल्या महिन्यात सरन्यायाधीश पदासाठी सुचवले होते.

पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत गेल्या ३ वर्षांत ३० कोटी कुटुंबांनी उघडली खाती :
  • ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी म्हणाले की, २८ आॅगस्ट रोजी जन-धन योजनेला तीन वर्षे पूर्ण झाली असून या काळात आम्ही ३० कोटी गोरगरीब कुटुंबांना या योजनेशी जोडले आहे.

  • पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत गेल्या ३ वर्षांत ३० कोटी कुटुंबांनी जन-धन खाती उघडली असून, गरिबांनी या खात्यांत तब्बल ६५ हजार कोटी रुपये जमा केले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

  • या योजनेमुळे गरीब माणूस राष्टÑीय अर्थव्यवस्थेचा भाग बनला आहे गरीब लोक पैशांची बचत करू लागले आहेत. पैशाबरोबर येणाºया सुरक्षेचा अनुभव घेत आहेत. मोदी म्हणाले की, पैसा हातात असला तर तो सढळ हाताने खर्च करण्याची इच्छा होते.

  • पैसा वाचवला तर तो आपल्या मुलांसाठी अथवा चांगल्या कामासाठी उपयोगी पडू शकतो, हे गरिबांनाही आता जाणवू लागले आहे. रुपे कार्डामुळे गरिबांतही आता सन्मानाची भावना वाढीस लागली आहे.

  • मोदी म्हणाले, गरिबांनी बँकांत ६५ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. ही त्यांची बचत आहे तसेच त्यांच्या भविष्यासाठीचे बळही आहे.

देशाला सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी जपानची मदत :
  • जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या भारत दौऱ्याआधी जपान सरकारने रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक भारतात पाठवले आले.

  • रेल्वे अपघातांचे सत्र सुरु असतानाच आता रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारताने जपानची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • जपानमधील रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक भारत दौऱ्यावर आले असून रेल्वे मंत्रालयातील अधिकारी आणि भारतातील रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांशी हे पथक चर्चा करणार आहे.

  • रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक पाठवावे, अशी विनंती जुलै महिन्यात भारताने जपानला केली होती. तसेच हे पथक पाच दिवसांसाठी भारतात आले असून जपानच्या दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली.

चिनी मोबाइल कंपन्या भारतात सर्व्हर हलविणार :
  • भारतातील स्मार्टफोन्सची बाजारपेठ चिनी कंपन्यांनी काबीज केली असून देशात विकले जाणारे जवळपास निम्मे स्मार्टफोन चिनी कंपन्यांचे असतात.

  • अत्यंत वाजवी दर व उत्तम फिचर्स यामुळे साहजिकच चिनी कंपन्यांच्या स्मार्टफोन्सना ग्राहकांची पसंती मिळत आहे, सरकारने काही दिवसांपूर्वी २१ मोबाइल कंपन्यांना नोटिसा बजावल्या होत्या.

  • बहुतांशी चिनी कंपन्या भारतीय युजर्सची गोपनीय माहिती आपल्या देशात पाठवत असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारने त्यांना नोटिसा बजावल्यानंतर या कंपन्यांनी आपले सर्व्हर स्टोअरेज भारतात हलविण्याची तयारी दर्शविल्याचे समजते.

  • मात्र बहुतांशी चिनी कंपन्या भारतीय युजर्सची गोपनीय माहिती चोरत असल्याचा आणि ती माहिती आपल्या देशात पाठवत असल्याचा संशय केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला आला.

  • मात्र बहुसंख्य कंपन्या चीनच्या होत्या. डोकलामवरून भारत व चीनमध्ये तणावाचे वातावरण असल्याच्या पार्श्वभूमीवर चिनी मोबाइल कंपन्यांच्या माहिती आपल्या देशात पाठवण्याच्या तक्रारींचा मुद्दा अधिकच गंभीर बनला.

श्रीलंकेतील प्रेक्षकांनी केली १९९६ च्या वर्ल्ड कपमधील घटनेची पुनरावृत्ती :
  • भारत आणि श्रीलंकेदरम्यान पार पडलेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला, भारत विजयाच्या उंबरठ्यावर असताना संतापलेल्या श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकण्यास सुरुवात केली.

  • भारताला विजयासाठी केवळ ८ धावांची आवश्यकता असताना हा सर्व गोंधळ सुरु झाला होता, प्रेक्षकांचा हा गोंधळ पाहून अनेकांना १९९६ मधील वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्याची आठवण झाली.

  • जसप्रीत बुमराहचे पाच बळी आणि रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा गड्यांनी दणदणीत पराभव केला.

  • विजयासह पाच एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने ३-० नं खिशात घातली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील श्रीलंकेचा पराभव पाहून सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षकही नाराज झाले होते.

दिनविशेष : 

जन्म /वाढदिवस

  • बापुजी अणे (माधव श्रीहरी अणे) यांचा जन्म : २९ ऑगस्ट १८८०

ठळक घटना

  • डॉ. बाबासाहेब अंबेडकर (मुळ नाव भीमराव रामजी आंबेडकर) यांना भारतीय घटना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले : २९ ऑगस्ट १९४७

  • ब्रिटिश प्रिन्स चार्ल्स व डायना विवाहबध्द झाले : २९ ऑगस्ट १९८१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.