आर्थिक धोरणांत अचानक करण्यात येत असलेले बदल आणि धरसोडीच्या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम संकटात सापडेल अशी भीती औद्योगिक क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत.
दुसरीकडे भाजपचे ‘अस्वस्थ’ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थनीतीवर जोरदार टीकाप्रहार केले.
देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा दावा करीत त्यांनी त्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटलींनाच जबाबदार धरले असून याआधी भाजपचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनीही अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात असल्याचा इशारा देऊन जेटली यांना लक्ष्य केले होते.
‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘जनरल मोटर्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीशी रेल्वेकरीता डिझेलवर चालणारी एक हजार इंजिने पुरविण्यासाठी २०१५ मध्ये २६० कोटी डॉलरचा करार केला होता.
रेल्वेत १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक करण्यास परवानगी दिल्यानंतर अमेरिकी कंपनीने केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक होती परंतु गेल्याच आठवडय़ात रेल्वे मंत्रालयाने, आम्हांला आता डिझेल इंजिनांची गरज नसून, आता त्याऐवजी इलेक्ट्रिक इंजिने पुरवा असे जनरल मोटर्सला कळविले.
पुण्यातल्या वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गाचे भूमीपूजन आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार असून यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते २४ नोव्हेंबरला पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं.
एकीकडे नागपूर मेट्रोचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे जात आहे, तिची ट्रायल रनही यशस्वी झाली, तर दुसरीकडे पुण्यातली मेट्रो प्रत्यक्षात कधी धावणार यावर विविध चर्चा रंगत आहे.
या मेट्रोचा काही भाग मुठा नदी पात्रातून जात आहे त्याविरोधातील याचिकेवर अजूनही निर्णय झाला नसतानाही आता बापटांकडून भूमीपूजन केलं जाणार आहे.
पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचं कामकाज सध्या जोरात सुरु असून तसेच पुढच्या ३ वर्षात पुण्यात मेट्रो धावू लागेल, असं आश्वासन महामेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिलं आहे.
मेट्रोसाठी नदी पात्रातील एलिव्हेटेड मार्गाच्या विरोधात एनजीटीमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती, सर्वोच्च न्यायालयाने मेट्रोचं काम सुरुच ठेवण्याचे आदेश दिले असून त्यामुळे मेट्रोला कसलाही अडथळा येणार नाही, असंही ब्रिजेश दीक्षितांनी स्पष्ट केलं.
पतंजलीचे आयुर्वेद आणि हर्बल उत्पादने यशस्वी झाल्यानंतर रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात उतरण्याची तयारी करत असून त्यामुळे बाजारात लवकरच पतंजलीचे अंतर्वस्त्रापासून ते क्रीडा पोषाखापर्यंतची उत्पादने पाहायला मिळतील.
अलवर येथे पतंजली ग्रामोद्योगाचे उद्घाटन करताना रामदेव बाबांनीच ही माहिती दिली असून पतंजली लवकरच कपडे आणि टेक्सटाईल बाजारात पाऊल ठेवणार असून विदेशी कंपन्यांना ते टक्कर देतील.
पतंजली अंतर्वस्त्रापासून ते पारंपारिक कपडे आणि क्रीडा पोषाख तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले, नुकताच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात पतंजली आयुर्वेद लि.चे सीईओ आणि रामदेव बाबांचे सहकारी बालकृष्ण हे देशातील आठवे सर्वांत श्रीमंत व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.
यावर रामदेव बाबा म्हणाले की बालकृष्ण यांना होणारा फायदा हा गरजूंसाठी असून तो ऐषोआरामासाठी नसल्याचे म्हटले आहे, रामदेव बाबा यांनी आपला उद्देश हा देशातील विदेशी कंपन्यांचे वर्चस्व संपवण्याचे असल्याचे सांगितले.
पतंजलीचे प्रवक्ता एस.के. तिजोरीवाला म्हणाले की, कंपनी स्वदेशी कपडे तयार करणार असून याची सुरूवातीची गुंतवणूक ही ५ हजार कोटी रूपयांची असेल.
आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली असून तुम्ही आता ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आधारला पॅन कार्डशी जोडू शकता.
केंद्र सरकारनं याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे, तसेच केंद्रानं बँकांच्या सर्व ग्राहकांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आपली खाती ‘आधार कार्ड’शी जोडणे अनिवार्य केले आहे.
या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील बँकांनाही आता आपल्या ग्राहकांसाठी ‘आधार कार्ड‘ नोंदणी आणि ‘आधार’च्या तपशीलात बदल करण्याची सेवा द्यावी लागणार असून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत जे बँकांचे ग्राहक आपले बँक खाते आधार कार्डशी जोडत नाहीत त्यांची खाती या तारखेनंतर गोठवण्यात येणार आहेत.
यापूर्वी केंद्र सरकारने १ जुलै रोजी सर्व बँक खाती ‘आधार’शी जोडण्याचे आदेश दिले होते, या आदेशात ‘प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग’चाही (पीएमएलए) समावेश केला होता, सद्यस्थितीत बहुतांश बँका आधार कार्ड आणि खाते जोडण्याची सेवा देत आहेत.
अजूनही बऱ्याच जणांकडे आधार कार्ड नसल्याने अडचणी निर्माण होत असून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत आधार कार्ड काढणं गरजेचं करण्यात आलं आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यापासून मोबाईल फोन कनेक्शनसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे, केंद्र सरकारनं मोबाईल फोनच्या सिम कार्डला आधारशी लिंक करण्याची मुदत फेब्रुवारी २०१८ पर्यंत वाढवली आहे. तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केला नाही, तर तो नंबर बंद होणार आहे.
सावधान दूरसंचार क्षेत्रात एकाधिकारशाही येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून हे क्षेत्र ‘आयसीसीयू’ मध्ये असून, त्यामुळे सरकार आणि कर्जदात्या बँकांची जोखीम वाढणार आहे, असा इशारा प्रख्यात उद्योगपती अनिल अंबानी यांनी दिला आहे.
अनिल अंबानी यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचे दूरसंचार क्षेत्रात आगमन झाल्यानंतर या क्षेत्रातील दर प्रचंड प्रमाणात घसरले असून जुन्या कंपन्या संकटात सापडल्या आहेत, या पार्श्वभूमीवर अनिल अंबानी यांनी हे वक्तव्य केले आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या (आरकॉम) वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अनिल अंबानी म्हणाले की, वायरलेस अथवा मोबिलिटी क्षेत्र सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे.
ते जनरल वॉर्डात नाही, तसेच आयसीयूमध्येही नाही, ते ‘आयसीसीयू’मध्ये असून सध्याच्या स्थितीमुळे महसुलाच्या बाबतीत सरकारला पद्धतशीर धोका निर्माण झाला आहे.
आपल्या बँकिंग व्यवस्थेसाठीही ही धोकादायक स्थिती आहे, या स्थितीचे वर्णन मी ‘सर्जनात्मक विध्वंस’ (क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन) असे करेन.
या क्षेत्रातील सेवादाता कंपन्यांची संख्या एकेकाळी डझनभर होती, ती आता सहावर येत आहे. स्पर्धात्मकता संपली असून बहुतांश जागतिक कंपन्या भारतातून निघून गेल्या असून मोठ्या प्रमाणातील पैशांवर पाणी सोडून या कंपन्या भारत सोडत आहेत.
अनिल अंबानी म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने एप्रिलमध्ये इशारा जारी केल्यानंतर दूरसंचार क्षेत्राला नवे कर्ज देणे बँकांनी थांबविले आहे, या क्षेत्राला थोड्या थोडक्या नव्हे, वर्षाला १ लाख कोटींच्या गुंतवणुकीची गरज आहे.
जागतिक दिवस
चेक राष्ट्र दिन : चेक प्रजासत्ताक.
शिक्षक दिन : तैवान.
जन्म /वाढदिवस
लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक : २८ सप्टेंबर १९२९
शेख हसीना वाजेद, बांगलादेशची पंतप्रधान : २८ सप्टेंबर १९४७
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
बाळकृष्ण गणेश खापर्डे, चरित्रकार, वाड्.मय विवेचक : २८ सप्टेंबर १९६८
ठळक घटना
भारताची आरती शहा ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली आशियाई महिला ठरली : २८ सप्टेंबर १९५९
कोमोरोस द्वीपांवर लश्करी उठाव : २८ सप्टेंबर १९९५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.