ओसाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जपानचे पंतप्रधान शिजो आबे यांच्याशी जागतिक अर्थव्यवस्था, आर्थिक गैरव्यवहार करून फरार झालेले आरोपी, आपत्कालीन व्यवस्थापन या विषयांवर चर्चा केली. ऑक्टोबर महिन्यात सम्राट नारुहितो यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहतील, असेही मोदी यांनी या वेळी जाहीर केले.
जी २० शिखर परिषदेसाठी आलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी आभार मानले. रेइवा पर्वाची सुरुवात झाल्याबद्दल मोदी यांनी आबे आणि जपानच्या जनतेचे अभिनंदन केले. नव्या पर्वासाठी रेई आणि वा या दोन शब्दांनी तयार झालेली रेइवा ही संज्ञा आहे.
या भेटीबाबत परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, दोन्ही पंतप्रधान एकमेकांचे चांगले मित्र असून त्यांच्यात परस्पर संबंधांबाबत रचनात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. अबे यांनी जी२० परिषदेकडून काय अपेक्षा आहेत त्या मुद्दय़ावर चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली, असे गोखले म्हणाले.
मुंबई : आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केला असला तरी राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आरक्षण ठेवावे, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास शिक्षणातील जागांची फेररचना होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य पदवी अभ्यासक्रमांसाठी उर्वरित चार टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध होतील.
उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता मराठा समाजाच्या १६ टक्क्यांऐवजी १२ टक्के जागा शैक्षणिक प्रवेशांमध्ये राखीव ठेवण्यात येणार असल्याने अभियांत्रिकी, वैद्यकीय व अन्य पदवी अभ्यासक्रमांमध्ये त्यानुसार उपलब्ध जागांची फेररचना होईल आणि प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांना मात्र यंदा अभय मिळाले आहे. वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात १६ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा मुद्दा राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील विजय थोरात आणि अॅड्. अनिल साखरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. हे प्रवेश या टप्प्यावर रद्द करणे योग्य ठरणार नाही. तसे केल्यास गोंधळ निर्माण होईल, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.
त्यामुळे हे प्रवेश यंदा ‘जैसे थे’च ठेवण्यात यावे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी १२ टक्के आरक्षण लागू करण्यात येईल, अशी विनंती सरकारने केली. त्यावर स्वतंत्र अर्ज करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले असून राज्य सरकारतर्फे सोमवारीच यासाठीचा अर्ज करण्यात येणार आहे.
कोबे : कारचे उत्पादन करण्यापासून ते बुलेट ट्रेनचे उत्पादन करण्यासाठी एकत्र येण्यापर्यंत भारत व जपान यांनी सहकार्य केल्यापासून या दोन देशांमधील संबंध अधिक बळकट झाले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
जपानने भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मोदी यांनी जपानच्या कोबे शहरातील भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितले.
भारताच्या जगाशी असलेल्या संबंधांचा मुद्दा येतो, तेव्हा जपानचे स्थान महत्त्वाचे ठरते. हे संबंध आजचे नसून अनेक शतकांपासूनचे आहेत. या संबंधांचा पाया एकमेकांच्या संस्कृतीबाबत सामंजस्य आणि आदर हा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
येत्या पाच वर्षांमध्ये ५ ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे भारताची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे, द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होणार आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.
दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू आहे, या समस्येशी लढणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्सच्या बैठकीत केले. आजपासून जपानमधील ओसाका या ठिकाणी ब्रिक्स देशाची जी २० परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत ब्रिक्स देशांचा सहभाग आहे. या परिषदेत बोलताना दहशतवाद हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
दहशतवाद हा फक्त निष्पापांचे बळीच घेत नाही तर त्यामुळे विकासाच्या गतीवर आणि सामाजिक समानतेवरही फरक पडतो असेही मोदींनी म्हटले आहे. दहशतवाद आणि जातीयवाद रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मोदींनी म्हटलं आहे.
जगासमोरच्या तीन आव्हानांबाबतही मोदींनी या परिषदेत भाष्य केले. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आहे तसेच व्यापारविषयक अनिश्चितता आहे. नियमांवर आधारीत बहुराष्ट्रीय व्यापाऱ्यांबाबत घेतले जाणारे एकतर्फी निर्णय, साधनसंपत्तीची कमतरता भासते आहे त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक आवश्यक आहे.
विकास साधायचा असेल तर वेगाने प्रगती करणारे तंत्रज्ञान अंगिकारले जाणे महत्त्वाचे आहे. सशक्तीकरणाला हातभार लावतो तोच खरा विकास असेही मोदींनी म्हटले आहे.
मथुरा : तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत पुन्हा मांडण्याच्या केंद्र सरकारच्या हेतूवर द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी प्रशचिन्ह उपस्थित केले आहे. मुस्लिम महिलांना दिलासा द्यायचा असेल, तर या समाजात पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करणे हा गुन्हा ठरविण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असेही त्यांनी सांगितले.
गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सवाल केला की, पतीला तुरुंगात पाठविल्यावर त्याच्या पत्नीला आधारासाठी पैसा कोण पुरविल? त्यामुळे मुस्लिम समाजात पहिली पत्नी हयात असताना पतीने दुसरा विवाह करू नये यासाठी हिंदू कोड बिलाच्या धर्तीवर कायदा केला पाहिजे.
अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या मुद्यावर भाजपकडून लोकांची दिशाभूल सुरू आहे, असा आरोपही स्वामी स्वरुपानंद यांनी केला. या प्रश्नावर अगदी सुरुवातीपासूनच भाजपकडून लोकांची दिशाभूल सुरू आहे. हे मंदिर बांधण्याचे काम फक्त आपणच करू शकतो, असा समज भाजपने पसरविला आहे, असे ते म्हणाले.
केंद्रातील भाजप सरकार राम मंदिर बांधू शकत नाही. कारण तसे केल्यास तो खासदारांनी संसदेत घेतलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या शपथेचा भंग ठरेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर केवळ धर्माचार्यच या मंदिराची उभारणी करू शकतील, असा दावा त्यांनी केला. बाबराने अयोध्येला कधीही भेट दिली नव्हती. त्यामुळे त्याने तेथे मशीद बांधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या घटना
१८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरि यांचा राज्याभिषेक झाला.
१९२६: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.
१९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.
१९७८: अमेरिकेतील सर्वोच्व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
१९९४: विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.
१९९७: मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेता घोषित करण्यात आले.
१९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
जन्म
१९२१: भारताचे ९वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिम्हा राव यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)
१९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)
१९३४: कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज रॉय गिलख्रिस्ट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २००१)
१९३७: साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक डॉ.गंगाधर पानतावणे यांचा जन्म.
मृत्यू
१८३६: अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५१)
१९७२: प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९३)
१९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.
१९९९: स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार रामभाऊ निसळ यांचे निधन.
२०००: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९२७)
२००६: संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन.
२००९: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे निधन. (जन्म: ५ मे १९५५)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.