विश्वचषकातील भारतीय क्रिकेट संघाचे अपयश चाहत्यांना विसरायला लावणाऱ्या दोन घटना म्हणजे इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील चित्तथरारक पद्धतीने ‘टाय’ झालेला अंतिम सामना आणि हिमा दासची सुवर्णपदकांची लयलूट. विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना हिमाने सुवर्णपदकांचा धडाका लावला होता; पण प्रसारमाध्यमांनी हिमाची म्हणावी तशी दखल घेतली नाही.
उपांत्य फेरीत गारद होणाऱ्या भारतीय संघावर टीकेचा भडिमार करणाऱ्या चाहत्यांनी हिमाला समाजमाध्यमांवर अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. १९ दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पाच सुवर्णपदके जिंकणे, ही किमया आतापर्यंत कुणाही भारतीय अॅथलेटिक्सपटूला साधता आली नाही; पण हिमाचे हे यश खरोखरच अव्वल दर्जाचे आहे का? तर नक्कीच नाही.
देशात क्रीडासंस्कृती फारशी रुजली नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या ताऱ्यालाही क्षणार्धात ध्रुवतारा बनवले जाते. क्रिकेटवेडय़ा भारतात अन्य खेळांचे मूल्यमापनच केले जात नाही. हिमाचे यश गौरवास्पद असले तरी त्याकडे स्पर्धात्मक वास्तववादी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.
हिमा ज्या पाच स्पर्धामध्ये सहभागी झाली, त्या स्पर्धाचे महत्त्व, दर्जा, सहभागी होणारे खेळाडू, त्या खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी हेसुद्धा तपासण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या (आयएएएफ) आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ‘ए’ ते ‘एफ’ या श्रेणीत मोडतात. हिमा सहभागी झालेल्या पाचपैकी फक्त तीन स्पर्धानाच ‘आयएएएफ’ची मान्यता होती. म्हणजेच ‘ई’ किंवा ‘एफ’ श्रेणीत मोडणाऱ्या या स्पर्धा म्हणजे आपल्याकडील राष्ट्रीय स्पर्धेपेक्षा थोडय़ा वरच्या दर्जाच्या.
राज्यभरात शनिवारपासून पावसाचा जोर कायम आहे, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच राज्यातील व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सीईटी सेलच्यावतीने राबविण्यात येत आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड सुरु आहेत.
मात्र मुसळधार पावसामुळे अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र आदीच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतेय. ही बाब ओळखून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीची मुदत दोन दिवस वाढवली आहे.
ट्विटरद्वारे तावडे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत कॅप सेंटरवर जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहेत. दरम्यान, विद्यार्थांना फार्मसी अभ्यासक्रमाचे प्रवेश आज रविवार(28 जुलै ) संध्याकाळपर्यंत निश्चित करता येणार आहेत. अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमाचे प्रवेश सोमवार(29 जुलै )पर्यंत निश्चित करण्यास, मुदत वाढ देण्यात आली आहे.
जगातील बलाढ्य समजले जाणारे आपाचे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात दाखल झाले आहे. पहिल्या ताफ्यातील बोईंग एएच-64 ई आपाचे गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसमध्ये दाखल झाले आहे.
आता हे हेलिकॉप्टर पठाणकोट येथे रवाना केले जाणार आहे. ही हेलिकॉप्टर्स हवाईदलाच्या MI-35 चॉपर्सची जागा घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात बलाढ्य अशी चार आपाचे हेलिकॉप्टर्स भारताच्या ताफ्यात दाखल झाली असून एकूण चार टप्प्यात सर्व हेलिकॉप्टर्स भारताला मिळणार आहेत.
आपाचे हेलिकॉप्टर्सची निर्मिती अमेरिकेत करण्यात आली आहे. भारताने अमेरिकेबरोबर 22 आपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीचा करार केला आहे. यापूर्वी हवाईदलाच्या ताफ्यात चिनूक हेविवेट हेलिकॉप्टर्सही दाखल झाले आहेत.
सध्या हे हेलिकॉप्टर्स केवळ इस्त्रायल, रशिया आणि नेदरलँडकडेच आहेत. दरम्यान, ही हेलिकॉप्टर्स चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे. जंगल आणि डोगराळ भागांमध्ये शत्रूंचा सामना करण्यासाठी या हेलिकॉप्टर्सची मदत मिळणार आहे. आपाचे हेलिकॉप्टर अमेरिकन सैन्याचे अॅडव्हान्स अॅटॅक हेलिकॉप्टर प्रोग्रामचा भाग आहे.
आपल्या आकाशगंगेतील २८ नवे तारे येथील आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. या संस्थेचे संचालक वहाब उद्दीन यांनी सांगितले की, हे या ताऱ्यांची प्रकाशमानता सतत बदलत असते, हे संशोधन ही दुर्मिळ कामगिरी आहे. ग्लोब्युलर क्लस्टर एनजीसी ४१४७ मध्ये हे तारे सापडले असून कोमा बेरनायसेस तारकासमूहात ते आहेत.
संस्थेचे माजी संचालक अनिल पांडे यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले असून त्यांनी सांगितले की, ग्लोब्युलर क्लस्टरची रचना यातून उलगडणार आहे. नवीन ताऱ्यांशिवाय एनजीसी ४१४७ या क्लस्टरची रचनाही त्यात समजणार आहे. यात डॉ. स्नेहलता, डॉ. ए.के.पांडे यांनी एनजीसी ४१४७ ग्लोब्युलर क्लस्टरची फोटोमेट्रिक निरीक्षणे घेतली. त्यासाठी ३.६ मीटरच्या देवस्थळ प्रकाशीय दुर्बीणाचा वापर केला आहे.
ही दुर्बीण नैनीताल येथे २०१६ मध्ये बसवण्यात आली होती. अस्थिर तारे याचा अर्थ त्यांची प्रकाशमानता सतत बदलताना दिसते. यात ताऱ्याला ग्रहणाचा स्पर्ष किंवा ताऱ्यांचे आकुंचन प्रसरण यामुळे त्याची प्रकाशमानता कमी जास्त होते. एनजीसी ४१४७ चा शोध ब्रिटिश खगोलवैज्ञानिक विल्यम हर्शेल यांनी १७८४ मध्ये लावला होता. हे क्लस्टर मोठे, प्रकाशमान आहे. आकाशगंगेतील एकूण क्लस्टर्सपैकी प्रकाशमानतेत ते ११२ व्या क्रमांकावर आहे, असे पांडे यांनी सांगितले.
ग्लोब्युलर क्लस्टर हा ताऱ्यांचा गोलाकृती संच असून तो आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे. ग्लोब्युलर क्लस्टर हे गुरुत्वाकर्षणाने बद्ध असतात. त्यामुळे त्यांना गोलाकार प्राप्त होतो. त्यांची तारकीय घनता जास्त असते. ही क्लस्टर्स आकाशगंगेच्या प्रभामंडळात असतात व त्यात जुने तारे असतात, पण त्यांचा आकाशगंगेच्या उत्क्रांतीतील भाग स्पष्ट झालेला नाही. हे संशोधन अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये ऑगस्ट महिन्यात प्रकाशित होणार आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन झाले आहे. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना न्युमोनिया त्रास होऊ लागला होता. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते मात्र ते अयशस्वी ठरले. जयपाल रेड्डी यांचा जन्म १६ जानेवारी १९४२ रोजी तेलंगण येथील माडगूळ गावात झाला होता. एक धडाडीचे काँग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली.
मात्र १९७५ मध्ये जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा त्यांनी काँग्रेस विरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि जनता दलात गेले. १९८५ ते १९८८ हा काळ ते जनता दलाचे सरचिटणीस होते. मात्र ९० च्या दशकात ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले.
माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या कार्यकाळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. तर मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांच्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देऊन त्यांना १९९८ मध्ये सन्मानित करण्यात आले होते.
जागतिक हेपटायटीस दिन
महत्वाच्या घटना
१८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले..
१९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४३: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.
१९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.
१९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.
१९८४: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.
१९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.
२००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
जन्म
१८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.
१९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.
१९८४: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.
१९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.
२००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
मृत्यू
१८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १७६८)
१९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८७९)
१९७५: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ – फोंडा, गोवा)
१९७७: गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन.
१९८१: नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)
१९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊत हत्या.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.