चालू घडामोडी - २८ जुलै २०१७

Date : 28 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूला २ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता :
  • बिहारमध्ये झालेल्या सत्तातंतानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळातही थोडे बदल होण्याची शक्यता असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅबिनेट मंत्रिमंडळात जेडीयूला स्थान मिळू शकते.

  • बिहारमध्ये जेडीयू-भाजप सत्तेत आल्यानंतर आता केंद्रातही जेडीयूला मंत्रिपदं मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयूला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्य मंत्रिपद केंद्रात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय येत्या दोन ते तीन आठवड्यात घेतला जाऊ शकतो.

  • दरम्यान बिहारमध्ये सत्तातंरानंतर जेडीयू दुपारी अडीच वाजता पाटन्यात प्रेस कॉन्फरन्स होणार आहे.

व्हॉट्सअॅपचं लवकरच आणखी एक अॅप लॉन्च होणार : 
  • सोशल मीडियात महत्त्वाचं अॅप मानलं जाणारं व्हॉट्सअॅप लवकरच आपलं नवीन अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

  • व्हॉट्सअॅपनं लॉन्चिंगनंतर अद्याप कोणतही शुल्क आपल्या वापरकर्त्यांकडून आकारलं नाही मात्र हे नवीन अॅप केवळ व्यावसायिक वापरासाठी असेल अशी माहिती मिळत आहे.

  • ट्विटरवरील @WABetaInfo या अकाऊंटनं दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप आता मध्यम आणि लहान व्यावसायिकांना लक्ष्य करत त्यांच्यासाठी व्यावसायिक सुविधा पुरवण्याच्या तयारीत आहे.

  • व्हॉट्सअॅपचं हे नवं अप अँड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध असेल. आपल्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी यूझर्सना वेगवेगळे फीचर्सही देण्यात येणार आहेत.

'दूरदर्शन' अर्थात 'डीडी' आपला लोगो नव्या रूपात सादर करणार
  • सरकारी वृत्तवाहिनी 'दूरदर्शन' अर्थात 'डीडी' आपला लोगो नव्या रूपात सादर करणार असून यासाठी सर्व भारतीयांना संधी देण्याची योजना डीडीने आखली आहे.

  • सध्याचा दूरदर्शनचा लोगो हा ५८ वर्षे जुना लोगो आहे, त्यामुळे आता नव्या लोगोसाठी स्पर्धा घेण्याचे डीडीने जाहीर केले आहे यासाठी तब्बल १ लाख रूपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

  • डीडीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दूरदर्शनच्या लोगोसोबत अनेक वर्षांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. खासगी वाहिन्यांच्या तुलनेत तरूणांच्या नव्या पिढीला याच्याशी जोडले जाणे आवश्यक आहे.

  • डीडी सर्व भारतीयांना या स्पर्धेसाठी आंमत्रित करीत आहेत यामध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला १३ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

बीसीसीआयच्या बैठकीत राहुल जोहरींना नो-एन्ट्री, प्रशासकीय समिती नाराज :
  • बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना बीसीसीआयच्या विशेष बैठकीत उपस्थित राहू न दिल्याबद्दल प्रशासकीय समितीने बीसीसीआयला नोटीस पाठवली आहे.

  • बोर्डाचे हंगामी अध्यक्ष सी.के.खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनाही सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने नोटीस धाडल्याचं कळतंय.

  • प्रशासकीय समितीच्या कार्य अहवालानूसार राहुल जोहरी हे बीसीसीआयचे अधिकारी आहेत, आणि बोर्डाच्या विशेष बैठकीत त्यांना हजेरी लावण्याचा अधिकार आहे.

  • मात्र अमिताभ चौधरी यांनी राहुल जोहरी यांना आपल्या स्टाफसोबत सभेतून बाहेर पडण्याला सांगितलं.

अ‍ॅक्सिसच्या सीईओपडी पुन्हा शिखा शर्मा :
  • अ‍ॅक्सिस बँकेने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचीच त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी नेमणूक केली. त्यामुळे बँकेला नवा सीईओ मिळेल व शर्मा कदाचित टाटा समूहाकडे जातील या अटकळींना पूर्णविराम मिळाला.

  • शिखा शर्मा यांची या पदावरील सध्याची मुदत जून २०१८ मध्ये संपत आहे. त्यानंतर आणखी तीन वर्षांसाठी त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला.

  • नियामक संस्थांच्या संमतीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर ही फेरनियुक्ती लागू होईल.

  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल विमा कंपनीतून आठ वर्षांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेत आल्यापासून शर्मा तेथे या पदावर आहेत.

सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदावर नियुक्त : नितीश कुमार 
  • बिहारची राजधानी पाटणा येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांच्या पाठोपाठ त्यांचे आतापर्यंतचे कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली हे या समारंभाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.

  • लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला धक्का देत महाआघाडीतून अचानक बाहेर पडत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

  • बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला २६ जुलै रोजी निर्णायक वळण मिळाले.

  • तसेच भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स :

पासपोर्टसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भराल?

  • www.passport.gov.in वर जाऊन सर्वात आधी नोंदणी करावी लागेल, नोंदणीसाठी वैध इमेल आयडी, मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे.

  • पासपोर्टसाठी वेबसाईटवर अकाऊंट बनवल्यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.

ऑनलाईन डेटा एन्ट्री

  • ऑनलाईन डेटा अपलोड करुन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे चांगलं इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. कारण फॉर्म भरताना नेट बंद झाल्यास तुम्हाला संपूर्ण फॉर्म पुन्हा भरावा लागेल.

ऑफलाईन डेटा एन्ट्री

  • ऑफलाईन डेटा पीडीएफमध्ये भरुन सेव्ह केल्यावर एक्सएमएल फाईल तयार होते, जी अपलोड केल्यावर आपला डेटा वेबसाईटवर अपलोड होतो.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : पेरू

जन्म, वाढदिवस

  • ह्युगो चावेझ, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष : २८ जुलै १९५४

  • पॉल स्ट्रँग, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू : २८ जुलै १९७०

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ : २८ जुलै १९६८

ठळक घटना

  • आल्बेर्तो फुजिमोरी तिसर्‍यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी : २८ जुलै २०००

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.