जयपूर- ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये या वर्षी नव्या शब्दाच्या रूपात 'आधार' ला जागा मिळाली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने शनिवारी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान या बद्दलची घोषणा केली. आधार या शब्दाने मित्रों, जुमाला, गोरक्षक, विकास, नोटबंदी आणि भक्त या शब्दांना मागे टाकत ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये जागा बनविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिलं आधारकार्ड 2010मध्ये बनलं. त्याची संकल्पना 2009मध्ये बनली होती. 2017मध्ये सरकारी धोरणांमुळे हा शब्द वर्षभर चर्चेत पाहिला. 2018मध्येही या शब्द चर्चेत राहण्याची शक्यता आहे. इंग्रजीप्रमाणे पहिल्यांदा हिंदीत वर्ड ऑफ इयर घोषित करण्यात आलं आहे. या घोषणेच्या वेळी व्यासापीठावर लेखक अशोक वायपेयी, पत्रकार विनोद दुआ, चित्रा मुद्रल, अनु सिंह चौधरी, पंकज दुबे, सौरभ द्विवेदी उपस्थित होते.
ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, निवड समितीसमोर आलेल्या हिंदी शब्दांपैकी एका शब्दाला निवडण आव्हान होतं. अंतिम निवड झालेल्या शब्दांमध्ये आधारबरोबर नोटबंदी, स्वच्छ, योग, विकास आणि बाहुबलीसारखे शब्दही होते. त्यांनी म्हंटलं, वर्षाचा हिंदी शब्द, एक अशी अभिव्यक्ती आहे ज्याने सगळ्यांत जास्त लक्ष केंद्रित केलं असेल. गेल्या वर्षातील घडामोडी, भाव या सगळ्याचं चित्रण त्या शब्दात असेल.
फेसबुक आणि गुगल या महाकाय कंपन्यांचा विनाश अटळ असल्याचे भाकीत अब्जाधीश समाजसेवक जॉर्ज सोरॉस यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत केले.
सोरॉस फंड मॅनेजमेंट एलएलसीचे संस्थापक जॉर्ज सोरॉस यांनी गुरुवारी दावोस येथील परिषदेत रात्रीच्या मेजवानीप्रसंगी भाषण केले. त्यात त्यांनी सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या भवितव्यावर, समाजमाध्यमांच्या बदलत्या भूमिकेवर आणि त्याच्या लोकशाहीवरील परिणामांवर विस्तृत भाष्य केले. विविध देशांच्या सरकारांकडून आणली जाणारी नियंत्रणे आणि कर व्यवस्था यांमुळे फेसबुक आणि गुगल या कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल, असे भाकीत सोरॉस यांनी केले.
फेसबुक आणि गुगलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या एकाधिकारशाहीमुळे व्यक्तीचे अधिकार, बाजारातील नवे संशोधन आणि लोकशाही यांना धोका उत्पन्न होत आहे. याच्या परिणामांची जाणीव आपल्याला नुकतीच होऊ लागली आहे, असेही सोरॉस म्हणाले. फेसबुक आणि गुगलने मात्र या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) मध्य पूर्वबाबतची चर्चा सुरू असताना पाकिस्तानच्या राजदूतांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अॅण्टोनिओ ग्युटर्स यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीर मुद्दा उपस्थित केला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी मध्य पूर्वेतील अस्थिर स्थितीबाबत चर्चा सुरू असताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला, मात्र लोधी यांना नेहमीप्रमाणे कोणीही पाठिंबा दिला नाही. पॅलेस्टाइनच्या नागरिकांच्या कायदेशीर अपेक्षांना पाकिस्तानचा पाठिंबा कायम असेल, असे सांगताना लोधी यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.
संयुक्त राष्ट्रसंघाने आपली जबाबदारी ओळखून पॅलेस्टाइनबाबत स्वत:च केलेल्या ठरावांची अंमलबजावणी कशी होईल ते पाहावे, त्याचप्रमाणे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या काश्मीरच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे, तसे झाल्यास जगातील जनतेचा संयुक्त राष्ट्रसंघावरील विश्वास उडणार नाही, असे लोधी म्हणाल्या.
त्यापूर्वी, काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळून लावली आणि भारत व पाकिस्तानने दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न चर्चेद्वारे सोडवावे, असे स्पष्ट केले.
मुंबई : लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी पत्रकारिता एक आहे. न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या स्तंभातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही दाद मागण्यासाठी या स्तंभाकडे येऊन आपल्या व्यथा मांडाव्या लागल्या, इतके या स्तंभाचे महत्त्व आहे. हा स्तंभ जर इतका महत्त्वाचा असेल तर या स्तंभातील वृत्तपत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे एकदिवसीय अधिवेशन शनिवारी परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते, या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
फेरीवाला धोरण आले आहे. मात्र फेरीवाला कोण आणि वृत्तपत्र विक्रेते यातील फरक जर राज्यकर्त्यांना कळत नसेल तर त्याला अर्थ नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांचे ऋण माणणाºयांपैकी मी आहे. महापालिका आमच्या ताब्यात आहे. सरकारमध्ये आम्ही अर्धेमुर्धे आहोत. उद्या तुम्ही म्हणाल नाराज आहात तर सरकारमधून बाहेर पडा.
मात्र विचार करून आपण एक भूमिका घेत असतो. ज्या वेळी भूमिका मांडायची त्या वेळी ती मी घेईनच आणि बेधडकपणे घेईन. वृत्तपत्र वाचण्याची सवय पिढ्यान् पिढ्या तशीच आहे. वृत्तपत्रांचे महत्त्व कुणी किती प्रयत्न केला तरी कमी होऊ शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, दांगट न्यूजपेपर एजन्सीचे मालक बाजीराव दांगट, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे हरी पवार उपस्थित होते.
नवी मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर क्रेडाई-बीएएनएमचे १८वे वार्षिक मालमत्ता प्रदर्शन वाशी येथे भरविण्यात आले आहे; परंतु या मालमत्ता प्रदर्शनाने सर्वसामान्य ग्राहकांची पुन्हा निराशा केली आहे. काही लाखांचे बजेट असलेल्या ग्राहकांच्या गृहस्वप्नांना या प्रदर्शनाने या वेळीही हुलकावणी दिली आहे.
एकूणच आयोजनाचा कॉर्पोरेट थाट पाहता, हे प्रदर्शन म्हणजे बीएएनएमने विकासकांच्या स्नेहसंमेलनासाठी केलेली उधळपट्टी असल्याचा आरोप या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.
क्रेडाई-बीएएनएमचे १८वे वार्षिक मालमत्ता प्रदर्शन वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भरविण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते. तर शनिवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. कार्पोरेट थाटात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात जवळपास ७० विकासकांनी आपले गृहप्रकल्प विक्रीसाठी मांडले आहेत. यात टोलेजंग टॉवर्स, आकर्षक बंगलो, रो हाउसेस, पेन्टा हाउसेस आदी प्रकारच्या महागड्या मालमत्ता येथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, कमीत कमी १२ लाखांपर्यंतची घरे येथे उपलब्ध असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र तसा एकही गृहप्रकल्प या प्रदर्शनात दिसत नाही. बजेटमधील बहुतांशी घरांचे प्रकल्प अद्यापि कागदावरच आहेत. विशेष म्हणजे, मागील सहा वर्षांपासून आयोजकांकडून कमीत कमी १२ लाखांपर्यंतच्या घरांची घोषणा केली जात आहे.
महत्वाच्या घटना
१६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.
१९६१: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
१९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
२०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.
जन्म
१४५७: इंग्लंडचा राजा हेन्री (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १५०९)
१८६५: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)
१८९९: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १५ मे१९९३)
१९२५: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर२००४)
१९३०: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. जसराज यांचा जन्म.
१९३७: चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म.
१९५५: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांचा जन्म.
मृत्यू
१५४७: इंग्लंडचा राजा हेन्री (आठवा) यांचे निधन. (जन्म: २८ जून १४९१)
१६१६: संत दासोपंत समाधिस्थ झाले. (जन्म: २४ सप्टेंबर १५५१)
१८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी१७७५)
१९८४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर१८९७)
१९९६: अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९११ – शिकागो, इलिनॉय, यू. एस. ए.)
१९९७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन. (जन्म: २७ जुलै १९११)
२००७: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १९२६)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.