नवी दिल्ली : नागरी विमान वाहतुकीच्या बाबतीत जसे ‘खुले आकाश’ धोरण स्वीकारले तसेच रस्त्याने होणा-या प्रवासी वाहतुकीसाठीही ‘खुले रस्ते’ धोरण स्वीकारावे आणि सर्व बस परवाने राष्ट्रीय करून (नॅशनल परमिट) केंद्र व राज्य सरकारांनी त्यांच्यावर समान कर आकारणी करावी, अशी शिफारस राज्यसभेच्या प्रवर समितीने केली आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात दुरुस्त्या करण्यासाठी सादर केलेले विधेयक सविस्तर विचार विनिमयासाठी या समितीकडे पाठविण्यात आले होते. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने अलीकडेच सभागृहात अहवाल सादर केला.
अहवालात म्हटले की, एखाद्या बसला दक्षिणेच्या पाच राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करायची असेल तर त्यासाठी दर वर्षाला ४२ लाख रुपये परवाना शुल्क सर्व राज्यांना मिळून द्यावे लागते. या संदर्भात मंत्रालयाने असे सुचविले की, ‘एक देश, एक परवाना, एक कर’ हे सूत्र राज्यांनी मान्य केले तर राज्यांचा महसूल वाढेल.
शिवाय एकाच वाहतूकदाराने मोजके परवाने घेऊन एखाद्या ठराविक मार्गावर मोठ्या संख्येने बस चालविण्याचे प्रकारही कमी होतील.
नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच पर्वतशिखर म्हणून ओळख असलेल्या ‘माउंट एव्हरेस्ट’ची नव्याने मोजणी करण्यासाठी सहकार्य करण्याचा भारताचा प्रस्ताव नेपाळने अमान्य केला असून हे काम स्वत:च करण्याचे हिमालयातील या देशाने ठरविले आहे.
एव्हरेस्ट शिखर नेपाळ व चीनच्या सीमेवर आहे. सन २०१५ मध्ये नेपाळमध्ये व हिमालयाच्या मोठया परिसरात ७.८ रिश्चर क्षमतेचा प्रलंयंकारी भूकंप झाल्यानंतर त्यामुळे कदाचित एव्हरेस्टही खचले असावे, अशी शंका वैज्ञानिकांच्या वर्तुळात व्यक्त केली गेली. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या ‘सर्व्हे आॅफ इंडिया’ने एव्हरेस्टची एकत्रित फेरमोजणी करण्याचा प्रस्ताव केला होता.
नेपाळच्या सवेक्षण विभागाचे महासंचालक गणेश भट्टा यांनी टेलिफोनवरून सांगितले की, फेरमोजणीच्या कामाच्या संदर्भात अलीकडेच आम्ही काठमांडूमध्ये विविध देशांचे सर्व्हेअर व वैज्ञानिकांची बैठक घेतली. त्या बैठकीला भारताचा प्रतिनिधीही हजर होता व त्याने या कामात मदत करण्याचा औपचारिक प्रस्ताव
दिला. मात्र आम्ही हे काम स्वत:च करणार असल्याचे बैठकीत आम्ही स्पष्ट केले.
या कामी चीनचीही प्रत्यक्ष मदत घेतली जाणार नाही. मात्र यापूर्वी ज्यांनी एव्हरेस्टची मोजणी केली आहे त्यांच्याकडून त्यांचा ‘डेटा’ मात्र आम्ही संदर्भासाठी जरूर घेऊ, असेही भट्टा यांनी स्पष्ट केले.
मुंबई - बँक खातं, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह सर्वच महत्वाच्या ठिकाणांवर आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आता फेसबुकची भर पडली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, फेक अकाऊंटला आळा घालण्यासाठी फेसबुक आधारसक्ती करु शकते.
भारतामध्ये फेसबुकवर नवीन खातं उघण्यासाठी सध्या आधारची माहिती विचारली जात असल्याचे समोर आलं आहे. लवकरच जुन्या वापरकर्त्यांनाही फेसबुक आधारसक्ती करु शकते. नागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी सरकारनं 'युनिक आयडेंटिफिकेशन नंबर' अर्थात आधार कार्ड आमंलात आणलं होतं.
'आधारकार्डवर जे तुमचं नाव आहे. तेच नाव फेसबुकवर खातं उघडताना नाव टाका, जेणेकरुन तुमचे मित्र-मैत्रीणी तुम्हाला सहजपणे शोधू शकतील. अशा पद्धतीचा मेसेज नवीन खातं उघडताना फेसबुककडून येतोय.
फेसबुककडून हा मेसेज फक्त रेडिट वापरकर्त्यांना आला आहे. मोबाइल साईटवर हा मेसेज येण्याच प्रमाण जास्त आहे. दरम्यान, फेसबुकनं दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की, फेसबुक वापरासासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलेलं नाही. वापरकर्त्यांनी फेसबुक आपल्या वास्तविक नावाप्रमाणे वापरावं. हा त्यामागील उद्देश आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर बेफाम आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत माफी मागावी अशी मागणी करणाऱ्या काँग्रेस खासदारांसमोर अखेर भाजपला एक पाऊल मागे घ्यावे लागले.
नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची देशाशी असलेल्या बांधिलकीवर प्रश्न उपस्थित केले नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील प्रचारादरम्यान मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मला पदावरुन हटवण्यासाठी मणिशंकर अय्यर यांनी पाकमधून सुपारी घेतली होती, असा आरोप मोदींनी प्रचारसभेत केला होता.
अय्यर यांच्या घरी पाक अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि दुसऱ्या दिवशी मला हिणवले. गुजरातमध्ये निवडणूक सुरु असताना ही बैठक का घेतली, या बैठकीत मनमोहन सिंग, हमीद अन्सारी आदी मंडळी का उपस्थित होती, याकडेही मोदींनी लक्ष वेधले होते.
ऐतिहासिक रिज मैदानावर हिमाचल प्रदेशचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर यांनी बुधवारी शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ५२ वर्षीय ठाकूर यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. थपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व इतर नेते उपस्थित होते.
हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतलेले ठाकूर यांच्या रुपाने मंडी जिल्ह्य़ाला पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले. ठाकूर यांच्यासह १२ मंत्र्यांनी शपथ घेतली. बिलासपूर व हमीरपूर या दोन जिल्ह्य़ांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही. मंत्रिमंडळात सहा नवे चेहरे आहेत.
राजीव बिंदल हे विधानसभा अध्यक्ष असतील. रोमेश धवला व नरिंदर बरगटा या ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. शपथविधी समारंभाच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नवे मंत्री-मोहिंदर सिंह, कृष्णन कपूर, सुरेश भारद्वाज, अनिल शर्मा, सरवीन चौधरी, रामलाल मकरंद, विपीन परमार, वीरेंद्र कन्वर, गोविंद ठाकूर, राजीव सैझल व विक्रम सिंह
महत्वाच्या घटना
१६१२: गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.
१८३६: स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१८४६: आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.
१८८५: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.
१९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन.
१९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
१९९५: कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
जन्म
१८५६: अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते वूड्रो विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)
१८९९: मराठी पत्रकार आणि साहित्यिक त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)
१९०३: हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन फोन न्यूमन यांचा जन्म.
१९११: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९९४)
१९२२: स्पायडर मॅनचा जनक स्टॅन ली यांचा जन्म.
१९२६: हुतात्मा शिरीषकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)
१९३२: प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेअरमन धीरूभाई अंबानी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै २००२)
१९३७: टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म.
१९४०: भारताचे परराष्ट्रमंत्री ए. के. अँटनी यांचा जन्म.
१९४१: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक इंतिखाब आलम यांचा जन्म.
१९४५: नेपाळचे राजे वीरेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००१)
१९५२: केंद्रीय मंत्री व वकील अरुण जेटली यांचा जन्म.
१९६९: लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक लिनस तोरवाल्ड्स यांचा जन्म.
मृत्य
१६६३: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १६१८)
१९३१: चित्रकार आबालाल रहमान यांचे निधन.
१९६७: अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. गो. कर्वे यांचे निधन.
१९७१: पंजाबी साहित्यिक नानकसिंग यांचे निधन.
१९७७: हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचे निधन. (जन्म: २० मे १९००)
१९८१: हिंदी चित्रपट अभिनेते डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.
२०००: प्रसिद्ध तत्वचिंतक, विचारवंत, विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचे निधन.
२०००: ध्रुपदगायक उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)
२००३: कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाऊ ठाकरे यांचे निधन.
२००६: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.