आज (सोमवार) पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे, मर्यादित भागांच्या ‘केबीसी ९’ या सत्रात नवीन लाइफलाइन्स व आकर्षक बदल दिसणार आहेत.
‘देवीयों और सज्जनों’ आणि ‘लॉक किया जाए’ ही खर्जातली आणि दमदार आवाजातील वाक्य सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून पुन्हा ऐकायला मिळणार आहेत.
कारण बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ हा भव्य कार्यक्रम घेऊन येत आहेत. कार्यक्रमाचे हे ९ वे सत्र असून त्यात स्पर्धकांना सर्वाधिक तब्बल ७ कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
‘जॅकपॉट’चा प्रश्न या वेळी ७ कोटी रुपयांचा असून या वेळी बक्षीसे धनादेशाऐवजी अॅक्सिस बँकेमार्फत थेट विजेत्याच्या खात्यात जमा केली जातील. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी केवळ ७ दिवसांत तब्बल १९.८ दशलक्ष लोकांनी नोंदणी केली आहे.
इंदिरा गांधींच्या रुपाने एक कणखर नेतृत्व देशाला मिळाले. पूर्वी अमेरिकेतून धान्य मागवले जायचे, अन्न धान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे या एकाच भूमिकेतून त्यांनी एकसूत्री कार्यक्रम राबवला.
त्यांच्या व्यापक दृष्टीकोनामुळेच आपला देश आज स्वयंपूर्ण आहे, किंबहुना आज भारत एक पाऊल पुढे आहे. देशातला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन त्यांनी राष्टÑीयकृत बँकांची निर्मिती केली.
पंडित नेहरुंनी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करुन देशाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला असून मोहन प्रकाश यांनी मोदी आणि अमित शहा या जोडगोळीच्या राजकारणावर चौफेर टीका केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, इंदिराजींनी देशाला नवी दिशा दिली. हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले नाही तर ते पूर्णत्वाकडे नेण्याचे काम त्यांनी केले.
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाचा व्यापक विचार करुन अणुचाचणी करुन आपले वर्चस्व दाखवले.
मनोहर पर्रीकर ४ हजार ८०० मतांच्या फरकाने जिंकले ४० सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपचे संख्याबळ आता १४ झाले आहे, पणजीत काॅग्रेसला ५ हजार ६० मते मिळाली.
पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा विजय झाला आहे, तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झाले आहे.
पणजी व वाळपई मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. दोन्ही जागांवर काँग्रेसचा पराभव झाले असून भाजपतर्फे मुख्यमंत्री पर्रीकर सलग सहाव्यांदा पणजीत विजयी झाले आहेत.
त्यानी काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला मंत्री विश्वजित यांनी काँग्रेसचे रॉय नाईक यांना पराभूत केलं.
देशातील उद्योग वृद्धींगत व्हावा याकरिता चतुक्षकोणातील मार्गांना मालवाहू ट्रेनद्वारे जोडण्याचे काम केंद्राद्वारे सुरू आहे.
वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडव्दारे जोडला जाणारा दिल्ली (रेवाळी) वडोदरा मार्गावरील इलेक्ट्रिकल्स आणि मेकॅनिकलचे काम अकोल्याचे मकरंद भाकरे यांचेकडे सोपविण्यात आले.
दिल्ली (रेवाळी) ते वडोदरा मार्गावरील इलेक्ट्रिकल्स बाबतची जबाबदारी वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.च्या प्रोजेक्टनुसार रेवाळी येथे कार्यरत अकोल्याचे मकरंद भाकरे यांचेकडे दिलेली आहे.
त्याकरिता लागणारे पार्ट खरेदीकरण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्याकरिता त्यांना जपान येथे १० दिवसीय दौऱ्यावर पाठविण्यात आले आहे.
पहिल्या फेजमध्ये दिल्ली ते वडोदरा या ९५० कि.मी. मालवाहू रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.
केंद्र सरकारच्या उपक्रमानुसार देशातील मोठ्या शहरांना जसेकी दिल्ली ते कोलकत्ता, दिल्ली ते मुंबई, मुंबई ते मद्रास, मद्रास ते कोलकत्ता या व त्यामार्गे येणाऱ्या शहरांना रेल्वे मार्गांनी जोडून मालवाहू रेल्वेव्दारे उद्योगवृद्धीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि गेल्या साठ वर्षातील थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला यिंगलुक यांचे वडिल लोएट शिनावात्राही थायलंड संसदेचे सदस्य होते.
न्यायालयाची कारवाई आणि संभाव्य कारावास टाळण्यासाठी थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांनी पलायन केले आहे असून कालपासून त्या देशाबाहेर गेल्याची चर्चा होत होती.
आता त्या सिंगापूरमार्गे दुबईला पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे, दुबईमध्ये त्यांचे बंधू आणि थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांनीही आश्रय घेतला आहे.
२०११ साली त्या देशाच्या २८ व्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या होत्या.
आता यिंगलुक इंग्लंडकडे आश्रय देण्याची विनंती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यिंगलुक अशाप्रकारे पळून गेल्यामुळे थायलंडची जनता आश्चर्य व्यक्त करत आहे.
इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचे सैन्यास इराकी सैन्याने पराजित केले असून इराकमधील एक महत्त्वपूर्ण शहर असलेल्या ताल अफारवर इराकी सैन्याने नियंत्रण मिळविल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.
या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये इराकचे सैन्य घुसले असून शहरामधील ऐतिहासिक किल्लाही जिंकण्यात इराकी सैन्यास यश आले आहे.
जुलै महिन्यात मोसूल या इराकमधील शहरामध्ये इसिसविरोधात निर्णायक जय मिळविल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या इराकी सैन्याने उर्वरित देशामध्येही आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या उद्देशार्थ कारवाई सुरु केली आहे.
पश्चिम आशियातील ओटोमान तुर्क साम्राज्य काळात बांधण्यात आलेला हा किल्ला आहे, या किल्ल्यावर पुन्हा एकदा इराकचा झेंडा फडकाविण्यात आला आहे.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांना बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर सोमवारी तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात नेण्यात येणार आहे.
डेराचे मुख्यालय असलेल्या सिरसा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, राज्यात हिंसाचारामुळे आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
पंचकुला, सिरसा, मनेसर या शहरात लष्करास पाचारण करण्यात आले असून ज्या तुरुंगात शिक्षा सुनावण्यात येणार आहे तो सुनारिया तुरुंग रोहतक शहराच्या बाहेरच्या भागात आहे.
रोहतकमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलेले आहे. डेराच्या राज्यातील प्रमुख पदाधिका-यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम सिंग याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआय कोर्टाकडे करण्याची शक्यता आहे.
जागतिक दिवस
-
जन्म /वाढदिवस
एम. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक : २८ ऑगस्ट १९२८
पॉल मार्टिन, कॅनडाचा पंतप्रधान : २८ ऑगस्ट १९३८
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत : २८ ऑगस्ट १९६९
व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार : २८ ऑगस्ट २००१
ठळक घटना
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर : (६ जुलै १९२७ - २८ ऑगस्ट २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.