भोपाळ: देशभरात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढत आहे. जमावाकडून कायदा हाती घेतला जात असल्यानं सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे.
अशा घटना टाळण्यासाठी मध्य प्रदेश सरकार कठोर कायदा करणार आहे.
कथित गोरक्षकांकडून करण्यात येणाऱ्या हत्या रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कायदा मंजूर करणार आहे. (src : lokmat)
एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत 164 रुपयांवर इतकी झाली आहे.
ही किंमत इंटर बॅंकिंग ट्रेडमध्ये रुपयाची ही किंमत आहे तर खुल्या बाजारातही डॉलर 160च्या वर गेला आहे.
पाकिस्तानमध्ये या आठवड्यात सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. पाकिस्तानात 12 ग्रॅम सोन्याची किंमत 80,500 रुपये इतकी आहे.
पाकिस्तानची परकीय गंगाजळी 7.6 अब्ज डॉलर इतकी आहे.
विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना आज जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिजशी होत आहे.
पहिल्या पाच सामन्यात अपराजित असलेल्या भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं आहे.
विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर असून, भारताच्या खात्यात चार विजय आणि एका रद्द सामन्याचे मिळून नऊ गुण आहेत.
आता विंडीजविरुद्धचा सामना जिंकला की, टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं म्हणायचं.
इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांचं न्यायालयातच निधन झालं. देशाच्या सरकारी वृत्तवाहिनीने ही माहिती दिली.
गुप्तहेरीच्या आरोपाच्या सुनावणीसाठी 67 वर्षीय मोहम्मद मोर्सी न्यायालयात हजर होते. त्यावेळी अचानक ते बेशुद्ध झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
मोहम्मद मोर्सीवर फलस्तिनी इस्लामवादी संघटना हमाससोबत संपर्क असल्याचा आणि गुप्तहेरीचा आरोप होता.
तर 2012 मध्ये आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या हत्येसाठी ते 20 वर्षांची शिक्षा भोगत होते.
३ एप्रिल १९१४ साली सॅम माणेकशा यांचा जन्म अमृतसरमधील एका पारशी कुंटुंबामध्ये झाला.
भारतीय लष्करामध्ये फाइव्ह स्टारपर्यंतची बढती मिळून फिल्ड मार्शल झालेले ते पहिले अधिकारी ठरले
सॅम चाळीस वर्षे भारतीय लष्करात कार्यरत होते
त्यांनी पाच मोठ्या लढाया लढल्या यामध्ये दुसरे महायुद्ध, १९४७चे भारत-पाकिस्तान युद्ध, १९६२चे भारत-चीन युद्ध, १९६५चे भारत- पाकिस्तान युद्ध आणि १९७१चे बांगलादेश स्वतंत्र्य झाला ते भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचा समावेश होतो.
वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात २७ जून २००८ साली न्यूमोनियाच्या उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला
महत्वाच्या घटना
१९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
१९५४: अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओबनिन्स्क येथे सुरू झाले.
१९७७: जिबुटी देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
१९९६: अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.
जन्म
१५५०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १५७४)
१८३८: बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल१८९४)
१८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)
१८६९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.
१८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८९९)
१८८०: अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९६८)
१९१७: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडू रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९८४)
१९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)
मृत्यू
१७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.
१८३९: सिख साम्राज्याचे संस्थापक रणजितसिंग यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)
२०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.
२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णन कंत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)
२००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९१४)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.