१ जुलैपासून वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) पहिला रिटर्न दाखल करण्यासाठी सरकारने अडीच महिन्यांची मुदत दिल्यानंतर आता सरकार या प्रकरणात मवाळ झालेले दिसत आहे.
जीएसटीचे नियम शिथिल करताना टीडीएस आणि टीसीएसच्या नियमात सूट देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, सीजीएसटी/ एसजीएसटी कायद्याच्या २०१७ च्या कलम ५१ आणि ५२ ला सद्या स्थगित केले आहे.
जीएसटीच्या कलम २२ व कलम २४ नुसार टीडीएसच्या कक्षेत येणाऱ्या ई कॉमर्सच्या व्यापाऱ्यांना नोंदणीतूनही सूट दिली आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
या माध्यमातून ई कॉमर्सच्या व्यापाऱ्यांना अधिक वेळ देण्याचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात येत असले तरी तज्ज्ञांच्या मतानुसार, विरोध झाल्यानंतर सरकारला यात सूट द्यावी लागली आहे.
व्हाइट हाउसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवादाला लक्ष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या सुरक्षित ठिकाणांचा मिळून खात्मा करण्याचा संकल्प केला असून संयुक्त निवेदनामध्ये इस्लामिक दहशतवाद हा लोकशाहीसाठी खतरा असल्याचे सांगण्यात आले तसेच याचा खात्मा करण्याचे आवाहन करण्यात आले.
संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोदींचा सच्चा दोस्त असा उल्लेख केला. तर, पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचे निमंत्रण दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील शिखर बैठकीपूर्वीच ही घोषणा करण्यात आली आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
सलाहुद्दीनने भारत-पाक चर्चेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे सांगत या हल्ल्याचा संबंध जोडू नये, असेही स्पष्ट केले होते. आम्ही भारताच्या लष्करी संस्थांना लक्ष्य बनविले होते.
पठाणकोट हल्ला हा या कारवाया सुरू ठेवण्याचाच एक भाग होता, असे सलाहुद्दीन याने पाकिस्तानातील वजूद या उर्दू न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले आहेत.
सोमवारी रात्री उशीरा साधारण १ वाजून १० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी भारतात यावं,असं आमंत्रण मोदी यांनी इवांका यांना दिलं आहे.
राष्ट्रपतींनी सहकुटुंब भारतात येण्याचं मी त्यांना निमंत्रण देतो, त्यांचं स्वागत करण्याची मी वाट पाहत आहे, असं म्हणत मोदींनी ट्रम्प यांनाही निमंत्रण दिलं. ट्रम्प यांनी मोदींचं निमंत्रण स्वीकारलं असून अजून नेमकी तारीख नक्की झालेली नाही.
एकपाठी असलेल्या अनेकांनी आपापल्या पद्धतिने विविध विक्रम नोंदविले आहेत. मात्र, वैष्णवीने विशिष्ट्य कॅटॅगरीसाठी "इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस्"कडे अर्ज केला. त्यानुसार चिटणवीस सेंटर येथे तिने या विक्रमासाठी प्रयत्न केला.
दहा मिनिटांत शंभर शब्दांचे पाठांतर करून स्मरणशक्तीच्या जोरावर त्यातील 98 टक्के शब्द सरळ व उलट्या क्रमाने लक्षात ठेवण्याचा राष्ट्रीय विक्रम वैष्णवी मानोहर पोटे या नागपूरकर तरुणीने नोंदवला.
तसेच या अनोख्या विक्रमासाठी तिला इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस्चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून पुढील वर्षीच्या आवृत्तीत त्याची नोंदही घेण्यात येईल.
परीक्षक मनोज तत्ववादी यांनी ऐनवेळी तिला शंभर शब्दांची यादी दिली असून एक ते शंभर या क्रमाने असलेले सर्व शब्द पाठ करण्यासाठी वैष्णवीला दहा मिनिटे देण्यात आली.
बीसीसीआयच्या प्रशासनात लोढा समितीच्या शिफारशी सहजतेने कशा लागू करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
लोढा समितीच्या कठोर शिफारशींपासून बीसीसीआयला आणि संलग्न असोसिएशन्सना वाचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा आटापिटा अजूनही सुरू आहे.
बीसीसीआयशी संबंधित ५-६ सदस्यांचा या समितीत समावेश करण्यात येईल.
लोढा समितीच्या शिफारशींपैकी लागू करण्यास कठीण असलेल्या शिफारशींचा अभ्यास करून, त्याविषयीचा आपला अहवाल १५ दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीला सादर करायचा आहे.
राजगड (जि. अल्वर, राजस्थान) येथील देशबंधू गुप्ता यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्यानंतर राजस्थानमधील बिट आयआयटीमध्ये अध्यापनास सुरवात केली. त्यांचा ओढा व्यवसायाकडे असल्याने त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात पाय रोवले.
औषध निर्मिती क्षेत्रातील जगविख्यात लुपीन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व सेवाव्रती डॉ. देशबंधू प्यारेलाल गुप्ता (वय ८०) यांचे २५ जून रोजी निधन झाले.
लुपीन कंपनीचे देशात १२, तर विदेशात ८ ठिकाणी प्रकल्प आहेत. सर्व प्रकारची औषधे तयार करताना क्षयरोगासंबंधी औषध निर्मितीत ही कंपनी विश्वात पहिल्या क्रमांकाची ठरल्याचे मानली जाते. हजारो हातांना काम देणाऱ्या या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे ४८जार कोटी रुपये आहे.
त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी लुपीन फाउंडेशन, देशबंधू ऍण्ड मंजू गुप्ता फाउंडेशनची स्थापना केली.
‘फक्सिंग’ सीआर४००एएफ मॉडेलची ही गाडी बीजिंग साऊथ रेल्वे स्थानकावरून शांघायसाठी रवाना झाली, त्याचवेळी सीआर४००एएफ ही गाडी शांघाय हॉँगकिओ रेल्वे स्थानकातून बीजिंगसाठी रवाना झाली.
चीनमधील बीजिंग-शांघाय या अत्यंत व्यस्त मार्गावर ४०० कि.मी. प्रतितास इतका वेग असलेली बुलेट गाडी सोमवारी प्रथमच धावली. सदर गाडीची रचना आणि उत्पादन चीनमध्येच करण्यात आले आहे.
शांघायला पोहोचण्यासाठी या गाडीला पाच तास ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
वाटेत ही गाडी १० स्थानकांवर थांबणार आहे. सदर बुलेट ट्रेन ईएमयू म्हणून ओळखली जाते, ती जास्तीत जास्त ४०० कि.मी. प्रतितास वेगाने धावणार आहे, तर ३५० कि.मी. प्रतितास तिचे वेगसातत्य आहे.
जागतिक दिवस
एच.आय.व्ही. चाचणी दिन : अमेरिका
जन्म, वाढदिवस
शिवराम महादेव परांजपे, ‘काळ’ या वृत्तपत्राचे संपादक व प्रखर राष्ट्रीय नेते : २७ जून १८६४
रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी : २७ जून १९३०
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल : २७ जून २००८
रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक : २७ जून १८३९
ठळक घटना
युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी राजीनामा दिला : २७ जून २००७
लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू : २७ जून १९६७
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.