बीजिंग: डोकलाम वाद अतिरंजक स्वरूपात समोर आणला जात असून, चीनसोबतच्या संवदेनशील मुद्यांवर यथास्थिती कायम राहावी, असे भारताचे चीनमधील राजदूत गौतम बम्बावाले यांनी स्पष्ट केले आहे.
ग्लोबल टाइम्स या चिनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, चीन-पाकिस्तान कॉरिडॉरसंबंधी(सीपीईसी)वादासह संघर्षाच्या संपूर्ण मुद्यावर चर्चा व्हायला हवी. ५० अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून हा कॉरिडॉर उभारला जात आहे. डोकलाम वादामुळे दोन देशांचे संबंध बिघडले काय? या प्रश्नावर त्यांनी हा वाद अवास्तव पद्धतीने समोर आणला जात असल्याकडे लक्ष वेधले. द्विपक्षीय संबंध पाहता छोट्या वादांवर मात करण्यासाठी दोन्ही देशातील जनता आणि नेत्यांकडे मोठा अनुभव आणि समजदारी आहे, असे ते म्हणाले. डोकलाममधील घटनेनंतर भारत आणि चीनने नेतृत्वाच्या स्तरावर चर्चा करण्याची गरज आहे. डोकलामजवळ मार्ग तयार करण्यासाठी चीनने प्रयत्न चालविले असल्याच्या वृत्तावर त्यांनी थेट प्रतिक्रिया टाळली.
महत्त्वाच्या संवदेनशील मुद्यांवर स्थिती कायम राहिली जावी, असेही त्यांनी सुचविले. डोकलाम वादात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांचा संबंध असून, दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. दोन देशांमध्ये युद्धाची स्थिती उभी ठाकल्यानंतर चीनने माघार घेत सैन्य परत पाठविले होते. (source : lokmat)
नवी दिल्ली : एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमात प्रवेशासाठी घेण्यात येणा-या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट) बसणा-या विद्यार्थ्यांसाठी यावर्षीपासून प्रश्नपत्रिकेचा एकच संच राहणार असल्याची माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने (सीबीएसई) उच्च न्यायालयात दिली.
संकल्प चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय अरुण मिश्रा आणि एफ. ए. नजीर यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. नीट परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका असावी, अशी मागणी ट्रस्टने याचिकेत केली होती.
सीबीएसईने न्यायालयात सांगितले की, पूर्वी विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजीसह १० भाषांमध्ये ‘नीट’ परीक्षा देण्याची मुभा होती. यापूर्वीही न्यायालयाने वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रश्नपत्रिकांचे वेगवेगळे सेट तयार करण्याला ‘अतार्किक’ म्हटले होते. विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगवेगळे असेल तर त्यांच्या दक्षतेचे मूल्यांकन करणे अत्यंत कठीण होईल, असेही न्यायालयाने म्हटले होते.
सर्व प्रश्नपत्रिकेच्या कठीणतेचा स्तर समान असेल तर परीक्षेत एकरूपतेचा उद्देश पूर्ण होईल आणि प्रश्नपत्रिकेचे अनेक सेट असणे चुकीचे नाही, असे बोर्डाने मांडलेल्या मताला न्यायालयाने फेटाळले होते. सीबीएसईने न्यायालयाच्या सूचनांवर होकार दर्शवीत सध्याच्या शैक्षणिक सत्रापासून प्रश्नपत्रिकेचा एकच संच राहील आणि त्याचा अनुवाद वेगवेगळ्या भाषांमध्ये करण्यात येईल, असे सांगितले.(source :Lokmat)
भंडारा : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारला दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या सैन्य दलाच्या पथसंचलनात भंडारा जिल्ह्यातील सुषमा शिवशंकर कुंभलकर या २६ वर्षीय तरूणीने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. सुषमाला मिळालेली ही संधी भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात सुषमाचा जन्म झाला. आईवडील, दोन भाऊ आणि सुषमा असे पाचजण असलेल्या कुंभलकर कुटुंबाची उपजीविका ही रोजमजुरीवर आहे. अशातच बालपणापासूनच सैन्यात जाण्याची आवड असल्यामुळे सुषमाने पहिल्यांदा धावण्याची आवड स्वत:मध्ये निर्माण केली. पुढे हीच आवड सैन्यात जाण्यासाठी प्रेरणादायी ठरली.
प्राथमिक शिक्षण बेटाळा जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण श्रीराम विद्यालय बेटाळा, महाविद्यालयीन शिक्षण नवप्रभात महाविद्यालय वरठी त्यानंतर भंडारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर पुणे जिल्ह्यात कामाच्या शोधात निघाली. तिथे रांजणगाव येथे नोकरी करीत असताना मित्रमैत्रिणीकडून सैन्यात जाण्याची माहिती घेत राहिली. सैन्यात जाण्याची आवड स्वस्थ बसू देत नसल्यामुळे ड्युटी करून घरी परतल्यानंतर ती शारीरिक व्यायाम व लेखी परीक्षेचा रात्रंदिवस अभ्यास करीत होती. ती २०१४ मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची उतीर्ण झाली.
जिथे जाण्यासाठी तरूणही एकाएकी धजावत नाही, अशा ‘बीएसएफ’मध्ये तिची निवड झाली. आणि उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करून तिने आपले स्वप्न सार्थ ठरविले. आज ती राजस्थान राज्यात बिकानेर येथील १६ बीएन सेक्टरमध्ये कार्यरत आहे. ग्वाल्हेरमधील टेकानपूर बीएसएफ कॅम्पमध्ये तिच्यासह ४७ मुलींना बुलेट स्टंटचे प्रशिक्षण दिले जात आहे. एका ग्रुपमध्ये ४८ मुलींमध्ये महाराष्ट्रातील तीन मुली आहेत. त्यात सुषमा कुंभलकर रा.भंडारा, विजेता भालेराव रा.अमरावती, जयश्री लांबट रा.चंद्रपूर यांचा समावेश आहे.
बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वाचा लिलाव आज शनिवारपासून सुरू होत आहे. दोन दिवसांच्या या प्रक्रियेत रविचंद्रन अश्विन आणि बेन स्टोक्स यांच्यावर मोठ्या रकमेची बोली अपेक्षित आहे. यंदा ५७८ खेळाडू लिलावात सहभागी होत आहेत. त्यातील ३६१ भारतीय आहेत.
भारत आणि जगातील अव्वल १६ खेळाडूंंना एलिट दर्जा बहाल करण्यात आला असून, या खेळाडूंचे आधारमूल्य दोन कोटी इतके आहे. त्यात स्टोक्स, अश्विन, शिखर धवन, मिशेल स्टार्क, ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांचा समावेश होतो. मागच्या सत्रात १४ कोटी ५० लाख रुपये इतकी बोली लागलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याला यंदा यापेक्षा मोठी रक्कम मिळेल, अशी चिन्हे आहेत.
२००८ साली आयपीएलला सुरुवात झाल्यापासून इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीयांवर बोली होण्याची यंदा पहिलीच वेळ असेल. टी-२० प्रकारात धवन आणि अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचा भाग नसले तरी या दोघांना लिलावात मोठी किंमत मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
फलंदाजी, आॅफस्पिन गोलंदाजी आणि आणि यष्टिरक्षण करण्याच्या क्षमतेपोटी केदार जाधव याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पुन्हा एकदा संधी देईल. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या दोन फिरकीपटूंना वाढती मागणी आहे. टी-२० प्रकारात यशस्वी खेळाडू लोकेश राहुल, मनीष पांडे आणि दिनेश कार्तिक या खेळाडूंवर अनेक फ्रेन्चायसींचा डोळा असेल. संघात चांगला फिरकी गोलंदाज असावा, असे फ्रेन्चायसींना वाटत असल्याने अफगाणिस्तानचा राशीद खान यालादेखील मोठा भाव मिळू शकतो.(source :Lokmat)
नवी दिल्ली : सराय काले खांवरू न मेरठपर्यंत जाणाºया ‘हायस्पीड ट्रेन’ने गाजियाबादमधून जवळपास दोन लाख प्रवासी प्रवास करतील. दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम लिमिटेड(डीआयएमटीएस)च्या सर्वेक्षणातून ही प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. या मार्गावर दररोज ७ लाख ५ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. अद्यापही सर्वेक्षण सुरू असल्याने प्रवासांची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्राथमिक आकडेवारी असल्याने प्रवासी संख्येला अंतिम म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. मेट्रो, हायस्पीड ट्रेनपैकी कुणाला अग्रक्रम देणार? यासंबंधी प्रवासांची मते सर्वेत नोंदविण्यात आली. प्रवाशांनी मोठ्या संख्येत हायस्पीड ट्रेनला प्राथमिकता दिली. या ट्रेनच्या भाड्यासंबधी प्रवाशांमधे मात्र अनेक संभ्रम आहेत. मेट्रोतील तिकीट कमी असल्याने काही प्रवाशांनी मेट्रोला अग्रक्रम दिला, अशी माहिती नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट लिमिटेड (एनसीआरटीसी) च्या अधिकाºयांनी दिली. लवकरच अंतिम अहवाल येईल, असा विश्वास अधिकाºयांनी यावेळी व्यक्त केला.
भाडेसंबधी लवकर होणार निर्णय हायस्पीड ट्रेनचे भाडे लवकरच ठरवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली आहे. मेट्रोप्रमाणे या ट्रेनचे भाडे ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. उच्च गुणवत्ता कोच तसेच सामान्य कोचचे भाडे वेगळे असेल. फ्रान्स तसेच स्पेनमधील कंपनी या प्रोजेक्टचे डिझाईन तयार करीत असल्याची माहितीही अधिकाºयांनी दिली.(source : Lokmat)
महत्वाच्या घटना
९८: ट्राजान हे रोमन सम्राट झाले.
१८८०: थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले.
१९२६: जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.
१९४५: दुसरे महायुद्ध – रशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्विच येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.
१९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.
१९६७: केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग लागून त्यात गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी पडले
१९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.
१९८३: जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी) जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.
जन्म
१७५६: ऑस्ट्रियन संगीतकार वूल्फगँग मोझार्ट यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १७९१)
१८५०: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)
१९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे१९९४)
१९२२: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर१९९८)
१९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८६)
१९६७: हिन्दी चित्रपट कलाकार बॉबी देओल यांचा जन्म.
मृत्यू
१५५६: दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १५०८)
१९४७: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८६८)
१९६८: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचे निधन. (जन्म: २६ मे१९०२)
१९८६: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९३१)
२००७: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९३२)
२००८: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचे निधन. (जन्म: ८ जून १९२१)
२००९: भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.