चालू घडामोडी - २७ डिसेंबर २०१७

Date : 27 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीनमध्ये बनलाय जगातील सगळ्यात उंच काचेचा पूल :
  • चीन : जमिनीपासून तब्बल २१८ मीटर उंचीवर तुम्हाला कोणी उभं राहायला सांगितलं तर तुमचं उत्तर काय असेल? जगभर अनेक पुल आहेत जे प्रचंड उंचीवर बांधलेले आहेत. तिथं जाऊन एकदा तरी तो थरार अनुभवण्याची पर्यटकांची इच्छा असते.

  • असाच एक हटके थरार अनुभवण्यासाठी चीनमध्ये एक काचेचा ब्रीज बनवण्यात आलाय. हा ब्रीज जवळपास २१८ मीटर उंच आहे. खाली खोल दरी आणि वर पांढरंशुभ्र आकाश आणि चहूबाजूला निसर्गाचा चमत्कार म्हणावा असं हिरवंगार सौंदर्य.

  • असा नजारा पाहायला कोणाला आवडणार नाही? चीनच्या शिजीयाजूआंग येथे या ब्रीजचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय. जगातला हा सगळ्यात मोठा ब्रीज आहे असंही म्हणण्यात येतंय.

गुगलच्या डूडलमध्ये आज मिर्जा गालिब, शेर-ओ-शायरीच्या बादशाहला मानवंदना :
  • मुंबई- गुगलने शेर-ओ-शायरीचा बादशाहाला अर्थात मिर्जा गालिब यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. मिर्जा गालिब यांची आज 220 वी जयंती आहे. याच निमित्ताने गूगलने खास डूडल तयार करुन मिर्जा गालिब यांना अभिवादन केलं आहे.

  • मिर्जा गालिब यांचं पूर्ण नाव मिर्जा असल-उल्लाह बेग खाँ. 27 डिसेंबर 1797 रोजी आग्र्यातील काळा महालमध्ये गालिब यांचा जन्म झाला. तेव्हा भारतात मुघलांचे राज्य होते.. मिर्जा गालिब यांनी पारसी, उर्दू आणि अरबी भाषेत अभ्यास केला.

  • गुगलच्या डूडलमध्ये मिर्जा गालिब यांच्या हातात पेन आणि कागद दिसतो आहे. त्यांच्या मागे साकारण्यात आलेली इमारत मुघलकालीन वास्तूकलेचं दर्शन घडवते आहे. मुघलकालीन भिंती, त्यावरील आकर्षक रचना, सूर्य आणि पिवळसर प्रकाश अशा पार्श्वभूमीवर मिर्जा गालिब यांचं पूर्ण चित्र डूडलने साकारलं आहे. 

  • अत्यंत हालाखीच्या स्थितीत मिर्जा गालिब यांचं बालपण गेलं. संपूर्ण आयुष्य एका संघर्षाच्या उन्हातच त्यांनी घालवलं. आर्थिक संकटांनी तर त्यांना बेजार केलं. मात्र जगण्यातले चटकेही त्यांनी शब्दबद्ध केले. शायरीतून व्यक्त केले.

डॉर्नियर २२८ विमाने देशांतर्गत उड्डाणांसाठीही :
  • नवी दिल्ली : हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) बनवलेल्या ‘डॉर्नियर २२८’ प्रकारच्या विमानातून देशांतर्गत प्रवास करता येईल. नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) तशी परवानगी दिली आहे. हे विमान १९ आसनी असून आतापर्यंत त्याचा वापर केवळ संरक्षण दलांसाठीच केला जायचा.

  • व्यावसायिक उड्डाणांसाठी देशात बनवलेले हे पहिले विमान असेल. एचएएल ही विमाने आता भारतातील विमान कंपन्यांनाही विकू शकेल व त्या त्यांचा वापर मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उडाण योजनेखाली देशांतर्गत उड्डाणांसाठीही वापरू शकतील, असे डीजीसीएतील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

  • या विमानांच्या वापरासाठी कंपन्यांना काही विशेष लाभ दिले जातील. भारतातील विमान कंपन्यांना ही विमाने विकण्याबरोबरच एचएएल ही विमाने नागरी उड्डाणांसाठी शेजारच्या देशांनाही (नेपाळ, श्रीलंका) विकू शकतील.

पुन्हा ‘रूपाणी’राज; मंत्रिमंडळात पाटीदार, ओबीसींना समान वाटा :
  • गांधीनगर : दीड वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर पुन्हा एकदा गुजरातेत ‘रूपाणी’राज सुरू झाले असून, विजय रूपाणी यांना सलग दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह १८ अन्य मंत्र्यांनीही या वेळी शपथ घेतली. गुजराती जनतेने, पटेल समाजाने दिलेल्या हादºयानंतर भाजपाने मंत्रिमंडळात पाटीदार आणि ओबीसींना समान वाटा दिला आहे.

  • राज्य सचिवालयाजवळ झालेल्या या शानदार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्यपाल ओ.पी. कोहली यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवाय विविध पीठांचे महंतही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • यात रूपाणी, पटेल यांच्यासह ९ कॅबिनेट मंत्र्यांचा आणि १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या वेळी रूपाणी यांनी नारंगी रंगाचे जॅकेट परिधान केले होते.

  • शपथग्रहणापूर्वी रूपाणी आणि पटेल यांनी भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी रूपाणी आणि त्यांच्या पत्नी यांनी पंचदेव महादेव मंदिरात पूजा केली. या कार्यक्रमास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींची उपस्थिती होती.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९११: कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.

  • १९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.

  • १९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.

  • १९४५: कोरिया देशाची फाळणी झाली.

  • १९४९: इंडोनेशिया  देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.

  • १९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.

  • २००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.

  • २००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.

जन्म

  • १५७१: जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ योहान्स केप्लर यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०)

  • १६५४: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)

  • १७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म.

  • १७९७: उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा आग्रा येथे जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)

  • १८२२: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५)

  • १८९८: विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)

  • १९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)

  • १९४४: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)

  • १९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म.

  • १९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म.

मृत्य

  • १९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन.

  • १९२३: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८३२)

  • १९४९: भालकर भोपटकर यांचे निधन.

  • १९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.

  • १९७२: कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते लेस्टर बी. पिअर्सन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८९७)

  • १९९७: मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन.

  • २००२: आसामी लोकगीत गायिका प्रतिमा बरुआ-पांडे यांचे निधन.

  • २००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या. (जन्म: २१ जून १९५३)

  • २०१३: अभिनेता फारुख शेख यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.