चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ ऑगस्ट २०१९

Date : 27 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“पायाभूत सुविधांचा निर्धार कायम ठेवल्यास ५ ट्रिलिअन अर्थव्यवस्थेत राज्याचा मोठा वाटा असेल” :
  • सर्व पायाभूत सुविधांची किंमत अनेक पटींने वाढत आहे. यामागे भूसंपादन करताना अनेक पटींनी देण्यात येणारी किंमत हे महत्वाचे कारण आहे. शेतकऱ्यांना योग्य किंमत द्यायलाच हवी पण त्याबद्दल ठराविक नियम असावेत. पायाभूत सुविधांची निविदा काढण्यापेक्षा निविदा रद्द करणे जास्त कठीण असते.

  • प्रत्येक प्रकल्पाला वाजवी अवाजवी कारणामुळे स्थगिती दिली जाते आणि त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढत जातो. मात्र, निर्धार कायम ठेवला तर पायाभूत सुविधांमध्ये मोठे काम शक्य आहे. या कामांच्या माध्यमातून देशाच्या तीन ट्रिलियन आणि पाच ट्रिलियन इकनॉमिमध्ये महाराष्ट्राचा नक्कीच मोठा वाटा असेल, असे मत मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी म्हटले आहे. ‘पायाभूत सुविधांचे वित्तीय व्यवस्थापन’ या विषयावर लोकसत्ता अॅडव्हान्टेज महाराष्ट्र परिषदेत ते बोलत होते.

  • गगराणी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या ‘वॉररुम’मध्ये नवी मुंबई विमानतळाबाबत १२ परवानग्या एका रात्रीमध्ये मिळवल्या. प्रकल्प करायचा तर त्यामागे अशा प्रकारे राजकीय इच्छाशक्ती हवी. राज्यातील सर्व मुख्य प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजन झाले आहे.

  • राज्यांची महत्वाची महामंडळं अत्यंत सक्षम आहेत. त्यांना हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावी लागत नाहीत. घेतलेले कर्ज हे उत्पादक कामांसाठी कसं वापरता येईल हे पाहणं अधिक महत्वाचं असतं. ४ लाख १२ हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्राने पायाभूत सुविधांसाठी घेतले आहे. मात्र, जीडीपीच्या टक्केवारीत १२ टक्के ते १३ टक्क्यांपर्यंत आहे. कुठल्याही प्रगतशील अर्थव्यस्थेमध्ये इतके कर्ज अधिक नसते, असे यावेळी गगराणी म्हणाले.

आरबीआय केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी देणार :
  • भारतीय रिझर्व बँकेकडून (आरबीआय) केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये दिले जाणार आहे. देशातील संभाव्य आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाने विमल जालान समितीच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत.

  • सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर आरबीयाने म्हटले आहे की, बोर्डाने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामधील १ लाख २३ हजार ४१४ कोटी रुपये ही अधिक्याची रक्कम २०१८-१९ साठी असणार आहे. याशिवाय अधिक्याच्या सुधारित वाटप व्यवस्थेतील तरतुदींनुसार ५२ हजार ६३७ कोटी रुपये दिले जाणार आहे.

  •  

  • समितीकडून आपल्या प्रमुख शिफारशींना कायम ठेवण्यात आलेले आहे व रचनेत केवळ एक बदल करण्यात आलेला आहे. या समितीत सुभाष चंद्र गर्ग यांची जागा अर्थ सचिव राजीव कुमार यांनी घेतली आहे.

  • ही अधिक्याची रक्कम २०१८-१९ मधील जीडीपीच्या १.२५ टक्के आहे. रिझर्व बँकेने मोदी सरकारच्या सल्ल्यानुसार राखीव रकमेपैकी किती रक्कम सरकारला देण्यात यावी याबाबत निकष ठरवण्याकरता माजी गव्हर्नर विमल जालान यांच्या नेतृत्वात समिती नेमली होती.

काश्मीर प्रश्न द्विपक्षीयच :
  • काश्मीर प्रश्न हा केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यापुरता असल्याचे स्पष्ट करीत त्यात त्रयस्थ देशाने मध्यस्थी करण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत सोमवारी सपशेल फेटाळून लावली.

  • आपापसातील प्रश्न भारत आणि पाकिस्तान चर्चा करून सोडवू शकतात. त्यासाठी अन्य तिसऱ्या देशाला नाहक त्रास देण्याची आमची इच्छा नाही, असेही मोदी यांनी नमूद केले. फ्रान्सच्या बिआरित्झ शहरात जी-७ परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली. त्यानंतर उभय नेते पत्रकारांशी बोलत होते.

  • भारत आणि पाकिस्तान १९४७ पूर्वी एकत्र होते आणि आता हे दोन्ही शेजारी देश उभयपक्षी समस्यांवर चर्चा करून त्यातून मार्ग काढू शकतात, असेही पंतप्रधान म्हणाले.

  • निवडणुकीनंतर आपण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संपर्क साधला. पाकिस्तानला गरिबीविरुद्ध लढावे लागेल, भारतालाही त्याविरुद्ध लढावे लागेल. पाकिस्तानला निरक्षरता आणि रोगराईशी लढावे लागेल, भारतालाही त्याविरुद्ध लढावे लागेल. त्यामुळे आपण दोघांनी जनतेच्या कल्याणासाठी एकत्रित काम केले पाहिजे, असे त्या वेळी आपण इम्रान खान यांना सांगितल्याचे मोदी म्हणाले.

  • रविवारी रात्री आपण काश्मीर, व्यापार, लष्करी संबंध आणि अन्य विषयांवर मोदी यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा उत्तम झाली. त्यातून आपल्याला भारताबद्दल अधिक माहिती मिळाली, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

अनुच्छेद ३७०बाबत भाजपकडून जनजागृती :
  • अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कसा योग्य आहे, हे विशेषत जम्मू-काश्मीर तसेच उर्वरित भारतातील नागरिकांना समजावून सांगण्यासाठी भाजपने राष्ट्रव्यापी मोहीम आखली आहे. ही ‘अनुच्छेद ३७० जनजागृती मोहीम’ १ सप्टेंबर रोजी सुरू होणार असून ती माहिनाभर राबवली जाईल.

  • जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, अनंतनाग अशी नऊ शहरे, उर्वरित भारतातील ३५ मोठी शहरे आणि ३७० निमशहरांमध्ये मंत्री, खासदार, भाजपचे पदाधिकारी जनसभा आयोजित करतील. अनुच्छेद ३७० आणि ३५-अ रद्द करणे हा मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासात फारच कमी वेळा मतभेद बाजूला ठेवून लोकांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे हा ऐतिहासिक क्षणांपैकी एक असल्याचा दावा केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान आणि गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला आहे.

  • काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करून, खोऱ्यातील लोकांशी चर्चा न करता जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि विशेषाधिकार काढून घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळालाही श्रीनगर विमानतळावर अडवण्यात आले होते. खोऱ्यातील संपर्क यंत्रणाही २० दिवसानंतर अजून पूर्ववत झाली नसल्याचा दावा केला जातो. काश्मीर संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत तीव्र टीका झाल्यामुळे भाजपच्या वतीने ‘सकारात्मक प्रचारा’चा निर्णय घेण्यात आला आहे.

  • ‘एक देश एक राज्यघटना’ हे गेल्या तीन पिढय़ांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. काश्मीर सचिवालयावर आता फक्त तिरंगा फडवला जात आहे. केंद्र सरकारच्या सर्व जनकल्याण योजना जम्मू-काश्मीरमध्ये लागू होतील. अनुच्छेद ३७० काढून टाकल्याने काश्मिरी जनतेचाच फायदा होणार आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.

  • १९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.

  • १९६६: वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.

  • १९९१: युरोपियन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया लिथुआनिया या देशांच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

  • १९९१: मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

जन्म 

  • १८५४: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान राजकीय नेते दादासाहेब खापर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९३८)

  • १८५९: उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९३२)

  • १८७७: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९१०)

  • १९०८: अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७३)

  • १९०८: ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज क्रमवीर सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१)

  • १९१०: इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४)

  • १९१६: रेंज रोव्हर चे सहरचनाकार गॉर्डन बाशफोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९१)

  • १९१९: संतसाहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल २०१३)

  • १९२५: रहस्यकथाकार नारायण धारप यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट २००८)

  • १९२५: भारतीय कवीजसवंत सिंग नेकी यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर २०१५)

  • १९३१: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००७)

  • १९७२: मल्ल दिलीपसिंग राणा ऊर्फ ग्रेट खली यांचा जन्म.

  • १९८०: भारतीय अभिनेत्री नेहा धुपिया यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७५: बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक विलियम चॅपमन राल्स्टन यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८२६)

  • १९५५: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १८७९)

  • १९७६: हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक मुकेश चंद माथूर तथा मुकेश यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९२३)

  • १९९५: भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मधू मेहता यांचे निधन.

  • २०००:  रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री मनोरमा वागळे यांचे निधन.

  • २००६: चित्रपट दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.