चालू घडामोडी - २६ ऑक्टोबर २०१७

Date : 26 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींच्या 'मेक इन इंडिया'ला धक्का, भारताला 'बाय बाय' करत 'टेस्ला' चीनमध्ये
  • नवी दिल्ली - अमेरिकी कार निर्मिती क्षेत्रातील अव्वल कंपनी  टेस्लाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया अभियानाला जोरदार धक्का दिला आहे.

  • टेस्लाचे प्रमुख अॅलन मस्क यांनी आपल्या कंपनीचा अमेरिके बाहेरील पहिला कारखाना चीनमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. द वॉल स्ट्रीट जनरलच्या वृत्तानुसार, शांघायमध्ये उत्पादन केंद्र सुरु करण्याची त्यांनी तयारी केली आहे.

  • यापूर्वी भारतात उत्पादन प्रकल्प सुरु करणार असल्याचे टेस्लाने म्हटले होते पण आता त्यांनी चीनसोबत करार केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या  मेक इन इंडिया अभियानाला हा जोरदार धक्का मानला जात आहे. 

दहशतवाद्यांना अभय देणे खपणार नाही, अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावलं
  • नवी दिल्ली : दहशतवाद्यांची आश्रयस्थळे खपवून घेतली जाणार नाहीत, अशा कणखर शब्दांत भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यास ठणकावले.

  • या दहशतवादी संघटनांमुळे पाकिस्तानच्या स्थैर्याला आणि सरकारला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा पाकिस्तानने दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर पावले उचलावीत.

  • भारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे विदेशमंत्री रेक्स टिलरसन यांनी एच-१-बी व्हिसा, अफगाणिस्तानमधील स्थिती, भारत-अमेरिका सुरक्षा सहकार्य आणि भारत-प्रशांत विभाग व उत्तर कोरिया या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर व्यापक चर्चा केल्यानंतर, घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून पाकिस्तानला उपरोक्त तगडा संदेश दिला.

‘आधार’ जोडणीसाठी मुदतवाढ, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
  • नवी दिल्ली : विविध सरकारी योजनांचे लाभ व अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थींनी ‘आधार कार्ड’ काढून त्याची जोडणी करून घेण्यासाठीची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले.

  • ‘आधारसक्ती’च्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी प्रलंबित याचिका सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे आली, तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी ही माहिती दिली.

  • ते म्हणाले की, आधी ही मुदत डिसेंबरअखेर संपणार होती, परंतु ती पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढविण्याची सरकारची तयारी आहे.

  • मात्र, ज्यांनी अद्याप ‘आधार’ क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही व ज्यांची तसे करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ लागू असेल, असे ते म्हणाले.

  • म्हणजेच या वाढीव मुदतीनंतरही ज्यांच्याकडे ‘आधार’ नसेल, त्यांना सरकारी योजनांचे लाभ बंद करणार का, याचा खुलासा त्यांनी केला नाही.

अनिल अंबानींची RCom बंद करणार वायरलेस सेवा
  • नवी दिल्ली - अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन  (आरकॉम)  कंपनी वायरलेस बिजनेस सेवा बंद करणार असल्याचं वृत्त आहे. 30 नोव्हेंबरपर्यंतच तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहात अशी माहिती आरकॉमने आपल्या कर्मचा-यांना केली आहे असं वृत्त इकोनॉमिक टाइम्सने दिलं आहे.

  • या रिपोर्टनुसार विविध कारणांव्यतिरिक्त मुकेश अंबानींच्या जिओद्वारे मोफत कॉलिंग आणि स्वस्त इंटरनेटचा आरकॉमच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचं कंपनीने म्हटलंय. 

  • वायरलेस बिझनेस बंद करण्याचा निर्णय कंपनीला घ्यावा लागत आहे असं 24 ऑक्टोबरला आरकॉमचे सीईओ आणि कार्यकारी निदेशक गुरदीप सिंह यांनी कर्मचा-यांना सांगितलं.

  • आजपासून तीस दिवसांत वायरलेस बिझनेस बंद होईल , सर्व प्रयत्न करूनही आपण 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस हा बिझनेस सुरू ठेवणं शक्य नाही असं ते म्हणाले.

दिनविशेष 

महत्वाच्या घटना :

  • १८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.

  • १९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.

  • १९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.

  • १९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.

  • १९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.

  • १९६२: रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

  • १९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.

  • १९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.

जन्म :

  • १२७०: संत नामदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १३५०)

  • १८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)

  • १८९१: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६४)

  • १९००: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९९३)

  • १९१६: फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)

  • १९१९: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८०)

  • १९३७: संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.

  • १९४७: अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म.

  • १९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)

  • १९७४: अभिनेत्री रवीना टंडन यांचा जन्म.

मृत्यू :

  • १९०९: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८४१)

  • १९३०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १८६०)

  • १९७९: अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन.

  • १९९१: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)

  • १९९९: भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर१९१०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.