चीन हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे असा समज होता. पण या आठवड्यात झालेल्या एका रिसर्चने चीनपेक्षा भारताची लोकसंख्या जास्त असल्याचा दावा केला असून चीन हा सर्वाधीक लोकसंख्येचा देश असल्याचा समज चुकीचा आहे, असं या रिसर्चमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
रिसर्चनुसार भारत हा आता जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे. विस्कॉन्सिन मॅडिसन युनिव्हर्सिटीचे रिसर्चर फुक्सियान यांनी चीनच्या पेकिंग युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात हा दावा केला आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चीनमध्ये १९९१ ते २०१६ या वर्षांमध्ये ३७७.६ दशलक्ष मुलांनी जन्म घेतला आहे. खरंतर ४६४.८ दशलक्ष हा अधिकृत जन्मदराचा आकडा आहे. पण रिसर्चनुसार ही माहिती अयोग्य असल्याचं सांगितलं जातं आहे.
लोकसंख्येच्या अधिकृत माहितीनुसार चीनची आत्ताची लोकसंख्या १.३८ अब्ज आहे, पण ही माहिती अयोग्य असल्याचं रिसर्चर फुक्सियान यांचं म्हणणं आहे. खरंतर हा आकडा ९० दशलक्षपेक्षा कमी असायला हवा होता. रिसर्चरनुसार भारताची लोकसंख्या या पेक्षा खूप जास्त आहे.
भारत-चीनपैकी कुणाची लोकसंख्या सर्वात जास्त हा मुद्दा सगळीकडेच चर्चेचा विषय बनला आहे. जर रिसर्चर फुक्सियान यांचा अंदाज खरा ठरला.
गुजरातवर सलग बारा वष्रे एकहाती हुकूमत चालविणारे नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व एव्हाना सर्वानाच माहीतच होते, पण जरा दुरून. २६ मेपर्यंत २०१४ रोजीपर्यंत देशाने त्यांना प्रत्यक्ष अनुभवले नव्हते, त्यांची भलीबुरी कार्यशैली जवळून पाहिली नव्हती.
तीन वर्षांनंतर मोदी राजवटीच्या व्यवच्छेदक लक्षणांची पुरेशी कल्पना देशाला आलीय, असे म्हणता येईल. त्यातील जाणवलेली काही लक्षणे..
वरिष्ठ सहकारी मंत्र्यांवर नव्हे, तर निवडक नोकरशाहीवर सर्वाधिक भिस्त हे मोदीशैलीचे सर्वात महत्त्वाचे लक्षण. एकीकडे कॅबिनेट मंत्र्यांच्या हाती काही ठेवले नसल्याचे चित्र असताना, दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, अतिरिक्त प्रधान सचिव पी. के. मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव अजित सेठ, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, गृहसचिव राजीव मेहरिषी आदी नोकरशहा अत्यंत प्रभावशाली.
पंतप्रधान कार्यालयाचा प्रत्येक गोष्टीतील कथित हस्तक्षेप, तपशिलांवर बारीक नजर यावर काही मंत्री नाराज आहेत. पण त्यांना कोण भीक घालतंय? आणि याविरुद्ध बोलण्याची प्राज्ञा आहे तरी कोणाकडे?
कर्णधार इऑन मॉर्गनच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या वन डेत दक्षिण आफ्रिकेवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना लीड्समधल्या हेडिंग्ले येथे दिवसरात्र खेळवण्यात आला. इंग्लंडनं हा सामना जिंकून, तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या या विजयानं इंग्लंडचं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मनोबल उंचावलं आहे. या सामन्यात अॅलेक्स हेल्सनं ६१, ज्यो रूटनं ३७, इऑन मॉर्गननं 107, बेन स्टोक्सनं 25 आणि मोईन अलीनं नाबाद 77 धावांची खेळी करून इंग्लंडला ५० षटकांत सहा बाद ३३९ धावांची मजल मारून दिली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमला आणि फॅफ ड्यू प्लेसीनं दुसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी रचून ३४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची हिंमत दाखवली. पण त्यानंतर इंग्लंडच्या ख्रिस वोक्सनं चार, तर आदिल रशीद आणि मोईन अलीनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेला २६७ धावांत गुंडाळलं.
जन्म, वाढदिवस
न्विन न्गॉक थो, दक्षिण व्हियेतनामचा पंतप्रधान : २६ मे १९०८
आदोल्फो लोपेझ मटियोस, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष : २६ मे १९०९
यानोस कादार, हंगेरीचा पंतप्रधान : २६ मे १९१२
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
प्रभाकर शिरुर, चित्रकार : २६ मे २०००
ठळक घटना
युरोपमधील देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला : २६ मे १९८६
भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात : २६ मे १९९९
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.