नवी दिल्ली: दिव्यांग जवानांना मिळणाऱ्या पेन्शनवर कर आकारण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. तिन्ही दलांसाठी हा नियम लागू असेल. याआधी सैन्य दलातून कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या जवानांना मिळणारी पेन्शन करमुक्त होती. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. या संदर्भातली अधिसूचना अर्थ मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे.
1922 च्या कायद्यानुसार सैनिकांना मिळणारी पेन्शन करमुक्त होती. अधिकाधिक जणांनी ब्रिटिशांसाठी लढावं या हेतूनं पेन्शनवर कर आकारला जात नव्हता. तोफखाना विभागात आणि हवाई दलात वैमानिक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. मात्र यातील मोजकेच जवान सेवा निवृत्त होतात. सेवा निवृत्त झालेल्या जवानांना आणि दिव्यांग जवानांना मिळणाऱ्या पेन्शनवर सध्या कर लागत नाही. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.
तिन्ही दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 25 लाखांच्या घरात आहे. या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते. आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केलेल्या अनेक जवानांना आणि अधिकाऱ्यांना अपंगत्व आलं आहे. या निवृत्त जवानांना आणि अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनवर यापुढे कर आकारला जाईल. या पेन्शनचा दुरुपयोग होत असल्याचे आरोप झाले होते. सरकारनं चालू वर्षात जवानांच्या पेन्शनसाठी 1 कोटी 12 लाख 80 कोटींची तरतूद केली आहे.
लंडन : ऑस्ट्रेलियानं लॉर्डसवरच्या सामन्यात इंग्लंडचा 64 धावांनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. यंदाच्या विश्वचषकात उपांत्य फेरीचं तिकीट मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला.
ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला हरवून सात सामन्यांमधल्या सहाव्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियानं सहा विजयांच्या बारा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. इंग्लंडची तिसऱ्या पराभवामुळं गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्थान राखायचं, तर इंग्लंडला अखेरच्या दोन सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंडसारख्या तगड्या प्रतिस्पर्धी संघांना हरवावं लागणार आहे.
ऑस्ट्रेलियानं या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 286 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ऑस्ट्रेलियाच्या प्रभावी आक्रमणासमोर इंग्लंडचा अख्खा डाव 221 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरनडॉर्फनं 44 धावांत पाच आणि मिचेल स्टार्कनं 43 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं 89 धावांची झुंजार खेळी केली.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेची करोडो रुपयांची फसवणूक करुन फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. अँटिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. मेहुल चोक्सीचं अँटिग्वाचं नागरिकत्व मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.
"मेहुल चौक्सीचं नागरिकत्व रद्द केलं जाणार आहे आणि त्याचं भारतात प्रत्यार्पण केलं जाणार आहे. आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला येथे सुरक्षित जागा उपलब्ध करुन दिलेली नाही, जो मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील गुन्हेगार आहे", असं अँटिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन म्हटलं आहे.
"सर्व कायदेशीर प्रक्रिया पार केल्यानंतर आम्ही याबाबत परवानगी देऊ. हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे प्रत्येक आरोपीला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे", असं गेस्टन ब्राऊन यांनी म्हटलं.
'मला भारतापर्यंतचा प्रवास झेपणार नाही, तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनीच अँटिंग्वाला चौकशीसाठी यावे, अथवा व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे चौकशी करावी', असा कांगावा मेहुल चोक्सीने केला होता. त्यानंतर प्रकृती अस्वास्थामुळे भारतात येण्यास नकार देणाऱ्या मेहुल चोक्सीसाठी 'एअर अँब्युलन्स' पाठवण्याची तयारीही तपासयंत्रणेनं दर्शवली.
एकूण आरोग्य कामगिरीत देशात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून बिहार व उत्तर प्रदेश सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. निती आयोगाने आरोग्य निर्देशांक क्रमवारी जाहीर केली आहे.महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.
आरोग्य निर्देशांकाची दुसरी फेरी ही २०१५-१६ पायाभूत वर्ष व २०१७-१८ संदर्भ वर्ष मानून तयार केली आहे. अहवालात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. ‘दी हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसिव्ह इंडिया’ नावाचा अहवाल निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी जाहीर केला.
आरोग्य निर्देशांकात २३ आरोग्य निकषांचा विचार करून क्रमवारी तयार केली आहे, त्यात वेगवेगळ्या घटकांवरचा भर ठरलेला आहे.
हरयाणा, राजस्थान, झारखंड या तीन मोठय़ा राज्यांची क्रमवारी खालावली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये पहिल्या फेरीचे आरोग्य निर्देशांक जाहीर करण्यात आले होते. ते वार्षिक व वर्धित कामगिरीच्या आधारे २०१४-१५ हे पायाभूत वर्ष व २०१५-१६ संदर्भ वर्ष मानून तयार केले होते. आरोग्य मंत्रालय व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक बँकेच्या तांत्रिक सहकार्याने ही क्रमवारी तयार केली आहे.
वंदे मातरम म्हणत नुसरत जहाँ रूही जैन यांनी लोकसभेतील सदस्य म्हणून शपथ घेतली. शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय हिंद, वंदे मातरम आणि जय बांगला अशा तिन्ही घोषणा दिल्या. पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या. मात्र कोलकाता येथील व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत त्यांनी काही दिवसांपूर्वीच टर्कीमध्ये लग्न केले.
सर्वात सुंदर खासदार असा किताब सोशल मीडियाने त्यांना दिला आहे. त्या लग्नासाठी टर्कीमध्ये असल्याने लोकसभेत खासदार जेव्हा सदस्यत्त्वाची शपथ घेत होते तेव्हा त्या तिथे हजर नव्हत्या. त्यांनी आज लोकसभेत हजेरी लावली. ज्यावेळी कामकाज सुरू करण्यापूर्वी त्यांनी सदस्यत्त्वाची शपथ घेतली. ही शपथ घेताना त्यांनी वंदे मातरम, जय हिंद आणि जय बांगला अशा तिन्ही घोषणा दिल्या.
लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपा आणि एनडीएचे ३५० पेक्षा जास्त खासदार लोकसभेत आहेत. त्यामुळे शपथविधी सोहळ्या दरम्यान जय श्रीराम, वंदे मातरम या घोषणा दिल्या गेल्या. जय श्रीरामच्या घोषणेला नवनीत कौर राणा यांनी विरोध दर्शवला तर असदुद्दीन ओवेसी यांनी वंदे मातरमच्या घोषणांना विरोध दर्शवला. यावेळी लोकसभेतील खासदारांनी जो सदस्यत्त्वाची जी शपथ घेतली तो सोहळाही गाजला.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन.
महत्वाच्या घटना
१७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.
१९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.
१९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.
१९६०: सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९६०: मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७४: ओहायो अमेरिका येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
१९७४: नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला.
१९७५: सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.
१९७७: एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.
१९७९: मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.
१९९९: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.
१९९९: शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे चलनात आले.
जन्म
१६९४: स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म.
१७३०: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)
१८२४: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)
१८३८: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक व सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचा कंतलपाडा परगणा बंगाल येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)
१८७३: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)
१८७४: राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९२२)
१८८८: विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै१९६७)
१८९२: अमेरिकन कादंबरीकार पर्ल एस. बक यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९७३)
१९१४: इराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)
१९५१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गॅरी गिल्मोर यांचा जन्म.
मृत्यू
१८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.
१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६८)
१९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.
२००१: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३२)
२००४: भारतीय चित्रपट निर्माता यश जोहर यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)
२००८: जनरल माणेकशाॅ यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.