चालू घडामोडी - २६ जून २०१७

Date : 26 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
व्हाईट हाऊसमध्ये आज मोदी-ट्रम्प भेट !
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज भेट होणार आहे, या भेटीदरम्यान महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.

  • पंतप्रधान मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यावर स्वत: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांचं स्वागत करतील. यानंतर दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होईल.

  • व्हाईट हाऊसमध्ये आज मोदींच्या सन्मानार्थ ट्रम्प वर्किंग डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात येणारा हा पहिला भोजन समारंभ आहे.

श्रीकांतने पटकाविले ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद :
  • इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने ऑस्ट्रेलियातही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

  • ऑस्ट्रेलियान ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लॉंगचा २२-२०, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.  

  • आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील श्रीकांतचे हे चौथे सुपरसीरिज विजेतेपद आहे. याआधी त्याने २०१४ साली चीन ओपन, २०१५ साली इंडिया ओपन, २०१७ साली इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद त्याने पटकावले होते.

  • तसेच श्रीकांत हा सर्वाधिक सुपरसीरिज विजेतेपदे पटकावणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.
जीएसटीमुळे देशाचा नव्हे तर चीनचा फायदा; स्वदेशी जागरण मंचाचा दावा :
  • वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीसाठी मोदी सरकारने शाही सोहळ्याचे आयोजन केले असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचाने जीएसटीला विरोध दर्शवला आहे.

  • जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असून यामुळे चीनमधून आयातीचे प्रमाण वाढेल अशी भीती स्वदेशी जागरण मंचाने व्यक्त केली आहे.

  • स्वदेशी जागरण मंचाचे सहसंयोजक अश्विनी महाजन यांनी जीएसटीसंदर्भात भूमिका मांडली. १.५ कोटी रुपयांपर्यंत उत्पादन असलेल्या लघु उद्योजकांना अबकारी करातून सूट देण्यात आली आहे.

  • महाजन यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधत जीएसटीतील नियमावलींवर बोट ठेवले. जीएसटीमध्ये २० लाखांपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्यांना जीएसटीसाठी नोंदणी करावीच लागेल असे म्हटल्याचे महाजन यांनी सांगितले.

भारतीय कर्णधार मिताली राजचे नवीन पराक्रम :
  • महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला. या सामन्यात मिताली राजने ७३ चेंडूंत ८ चौकारांसह ७१ धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केली.

  • मिताली राजने सलग सात सामन्यात अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. मितालीने गेल्या सहा वनडे डावांत नाबाद ६२, ५४, नाबाद ५१, नाबाद ७३, ६४ आणि नाबाद ७० धावा केल्या.

  • महिला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी मिताली पहिली क्रिकेटपट्टू ठरली आहे.

  • मितालीआधी एकालाही हा रेकॉर्ड करता आलेला नाहीये. मितालीने ठोकलेल्या सात अर्धशकांमध्ये चार अर्धशतके दक्षिण आफ्रिकेविरोधात तर इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश विरोधात प्रत्येकी एक अर्धशतकी खेळी केली आहे.

भारताचा धावांचा एव्हरेस्ट :
  • पावसामुळे व्यत्यय आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागलानंतर भारतीय संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर निर्धारीत ४३ षटकात वेस्ट इंडिजविरुध्द ५ बाद ३१० धावांचा हिमालय उभारला.

  • पावसामुळे उशीराने सुरु झालेला हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • अजिंक्य रहाणेचे दमदार शतक (१०३) व शिखर धवन (६३), कर्णधार विराट कोहली (८७) यांचे अर्धशतक या जोरावर भारताने विंडिज गोलंदाजांची धुलाई केली.

  • सलग दुसऱ्या सामन्यात रहाणे - धवन यांनी शतकी भागीदारी करताना भारताला ११४ धावांची सलामी दिली. अ‍ॅश्ले नर्सच्या गोलंदाजीवर धवन यष्टीचीत झाला. त्याने ५९ चेंडूत १० चौकारांसह ६३ धावा केल्या.

महाराष्ट्राच्या दिया चितळेला सुवर्ण पदक :
  • इंदोर येथील अभय प्रसाद बंदिस्त स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत दियाने अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या मुनमुन कुंडूचा सहज पराभव केला असून तीने सलग चार गेम जिंकताना ६-११, ११-८, ११-२, ११-४, ११-९ असे दिमाखदार जेतेपद पटकावले.

  • महाराष्ट्राच्या दिया चितळेने चमकदार कामगिरी करताना मध्य विभाग राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या सब ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकावले.

  • त्याचवेळी, प्रिथा वर्तीकर हिला मुलींच्या कॅडेट गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

संजय घोडावत विद्यापीठाचे डॉ.बी.एम. हिर्डेकर कुलसचिव :
  • अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ.बी.एम. हिर्डेकर यांची नियुक्ती झाली. विद्यापीठाचे अध्यक्ष, उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन डॉ. हिर्डेकर यांचे स्वागत केले.

  • संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सची अल्पावधीत झालेली नेत्रदीपक प्रगती, वर्ल्ड क्‍लास इन्फ्रा, नॅककडून 'अ' दर्जा, एनबीए मानांकन, आयएसओ मानांकन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असणारा प्राध्यापक वर्ग यांचे परीक्षण करून शासनाने विद्यापीठाला मान्यता दिली आहे.

  • गेल्या ४० वर्षांपासून डॉ. हिर्डेकर शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक ते प्राचार्य अशा पदांवर काम करत त्यांनी शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिव, परीक्षा नियंत्रक म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे.

चीन-पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी लष्कराकडून १३ उपग्रहांचा वापर :
  • कार्टोसॅट-२ इ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येणा-या उपग्रहांची संख्या आता १३ झाली आहे.

  • इस्त्रोमधील सूत्रांनी ही माहिती दिली असून टेहळणी आणि सीमा भागातील नकाशे रेखांकन करण्याबरोबरच शत्रूच्या जमीन आणि समुद्रातील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहांचा वापर करण्यात येणार आहे. 

  • लष्करी उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणारे हे बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत स्थिर करण्यात आले आहेत.

  • शुक्रवारी प्रक्षेपित करण्यात आलेला कार्टोसॅट-२ मालिकेतील उपग्रह ७१२ किलो वजनाचा असून गरजेनुसार विशिष्ट अशा भागांचे उच्च दर्जांचे फोटो पाठवण्याची क्षमता या उपग्रहामध्ये आहे.

  • कार्टोसॅट आणि रिसॅट मालिकेतील उपग्रह खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येत आहेत. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन : २६ जून 

जन्म, वाढदिवस

  • लॉर्ड केल्व्हिन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ : २६ जून १८२४

  • बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक : २६ जून १८८८

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ : २६ जून १९४४

  • यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता : २६ जून २००४

ठळक घटना

  • युनायटेड नेशन्सची स्थापना : २६ जून १९४५

  • एअर इंडियाचे पहिले बोइंग विमान गौरीशंकर येथे कोसळले : २६ जून १९८२

  • पुणे महापालिकेचा कारभार मराठी भाषेतून करण्याचा ठराव मंजुर : २६ जून १९५८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.