पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजप आणि एनडीए घटक पक्षांमधील 18 राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
गांधीनगर : विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा आज शपथविधी होणार आहे. विजय रुपाणी आज दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची वर्णी लागली आहे. रुपाणी यांच्यासोबत 20 आमदारही मंत्रिपदाची शपथ घेतील.
गांधीनगरमध्ये भव्य सोहळा - गांधीनगरमधील सचिवालय इमारतीशेजारील पटांगणावर हा भव्य सोहळा होणार आहे. राज्यपाल ओ. पी. कोहली त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चुडासमा,कौशिक पटेल, सौरभ पटेल, जयेश राधडिया, गणपत वसावा यांच्यासह अनेकांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजप आणि एनडीए घटक पक्षांमधील 18 राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.(source :abpmajha)
नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक कंपन्या येत्या काही वर्षांत आपल्या ताफ्यात ९०० नवी विमाने सहभागी करून घेणार आहेत. यातील सर्वाधिक ४४८ विमाने इंडिगोच्या ताफ्यात येणार आहेत. जगात झपाट्याने वाढणा-या हवाई बाजारांत भारताचे स्थान वरचे आहे. त्यामुळे बहुतांश भारतीय कंपन्यांनी महत्त्वाकांक्षी विस्तार योजना हाती घेतल्या आहेत.
नागरी उड्डयन मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, स्वस्त विमान सेवा देणा-या इंडिगो, स्पाईसजे, गोएअर, एअरएशिया या कंपन्या नवी विमाने आपल्या ताफ्यात आणत आहेत. अन्य काही विमान कंपन्याही विस्तार योजना राबवत आहेत. सर्व कंपन्या मिळून एकूण ९०० विमाने खरेदी करीत आहेत.
इंडिगोच्या ताफ्यात सध्या १५० विमाने आहेत. आणखी ४४८ विमाने आपल्या ताफ्यात आणण्यासाठी कंपनी सज्ज आहे. त्यातील ३९९ विमाने ए३२० आणि ४९ विमाने एटीआर जातीची आहेत. येत्या आठ वर्षांत ही विमाने कंपनीच्या ताफ्यात येतील.
इंडिगोची मुख्य स्पर्धक कंपनी स्पाईसजेटच्या ताफ्यात सध्या ५७ विमाने आहेत. विस्तार योजनेत कंपनी बी७३७-८०० जातीची १०७ विमाने आणि बोम्बार्डिअर क्यू४०० जातीची ५० विमाने खरेदी करीत आहे. २०१८ ते २०२३ या काळात ही विमाने कंपनीच्या ताफ्यात सहभागी होतील. गोएअरकडून ए३२० जातीची ११९ विमाने २०१८-२०२२ या काळात खरेदी केली जाणार आहेत. सध्या कंपनीकडे ३४ विमाने आहेत.(source :lokmat)
मुंबई : सरकारी बँकांच्या वसुली थकलेल्या कर्जाचा (एनपीए) आकडा ७.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यातील बहुतांश एनपीए हा बड्या कंपन्यांकडे थकलेल्या कर्जाचा आहे, असे रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आले.
सरकारी बँकांच्या तुलनेत खाजगी बँकांचा एनपीए फारच कमी सुमारे १.०३ लाख कोटी आहे. जुलै ते सप्टेंबर या काळातील ही आकडेवारी आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबर २०१७ रोजी सरकारी बँकांची सकळ थकीत कर्जाची आकडेवारी ७,३३,९७४ कोटी होती. याच दिवशी खाजगी बँकांची अकार्यरत मालमत्ता १,0२,८0८ कोटी होती. आघाडीच्या औद्योगिक संस्था आणि कंपन्यांकडे यातील ७७ टक्के कर्ज थकलेले आहे.
स्टेट बँक आॅफ इंडियाचा एनपीए सर्वाधिक १.८६ लाख कोटी रुपये आहे. त्याखालोखाल पंजाब नॅशनल बँकेचा एनपीए ५७,६३0 कोटी, बँक आॅफ इंडियाचा ४९,३0७ कोटी, बँक आॅफ बडोदाचा ४६,३0७ कोटी, कॅनरा बँकेचा ३९,१६४ कोटी आणि युनियन बँकेचा एनपीए ३८,२८६ कोटी रुपये आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस खाजगी बँकांत आयसीआयसीआय बँकेचा एनपीए सर्वाधिक ४४,२३७ कोटी रुपये आहे. अॅक्सिस बँकेचा एनपीए २२,१३६ कोटी, एचडीएफसी बँकेचा ७,६४४ कोटी रुपये आहे.(source :lokmat)
चेन्नई - राजकारण माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. मी येत्या 31 डिसेंबरला राजकीय वाटचालीची घोषणा करेन असे सुपरस्टार रजनीकांत यांनी मंगळवारी जाहीर केले.
दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनी चेन्नईच्या श्री राघवेंद्र कल्याण मंडपममध्ये चाहत्यांशी संवाद साधला.
राजकारण माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. मी येत्या 31 डिसेंबरला राजकीय वाटचालीची घोषणा करेन. (सविस्तर माहिती लवकरच).(source :lokmat)
मुंबई : टीम इंडियानं आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. नुकतीच झालेली श्रीलंकेविरुद्धची मालिका भारतानं 3-0 अशी खिशात घालत दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे टीम इंडियानं वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला मागे टाकत 121 गुणांसह क्रमवारीत दुसरं स्थानं गाठलं.
या मालिकेआधी टीम इंडिया क्रमवारीत चौथ्या स्थानावर होती. या यादीत 124 गुणांसह पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानावर कायम आहे.
दरम्यान, कालच्या (रविवार) सामन्यात भारतानं श्रीलंकेवर पाच विकेट्सने विजय मिळवत 3-0 अशी मालिका खिशात घातली.
टीम इंडियाने श्रीलंकेला याअगोदर वन डेत आणि कसोटी मालिकेतही पराभवाची धूळ चारली होती. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला होता. तर तीन सामन्यांच्याच कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेवर 1-0 ने मात केली होती. या मालिकेतील दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले होते.
भारताने 2017 मध्ये श्रीलंकेवर तिन्ही फॉरमॅटमध्ये सलग दोन वेळा विजय मिळवला आहे. श्रीलंकेत झालेल्या तिन्ही फॉरमॅटमधील मालिकेत भारताने 9-0 ने विजय मिळवला होता. तर भारतातील तिन्ही फॉरमॅटमध्ये 6-1 ने विजय मिळवला.(source :abpmajha)
नवी दिल्ली : आधारच्या गोपनीयतेत सुधारणा करण्याच्या सूचनांचे स्वागतच आहे, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. आधार ही विकसित होत असलेली प्रणाली आहे. ती अजून अंतिम नाही, असेही त्यांनी सांगितले.
येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात जेटली यांनी सांगितले की, वैयक्तिक गोपनीयतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निकाली निघाला आहे, अशी अपेक्षा आहे.
आधारच्या गोपनीयतेची चौकट मजबूत करण्याचा मुद्दा मात्र नेहमीच खुला आहे. ही चौकट मजबूत करण्यासाठी न्यायालयाकडून, लोकांमधून अथवा संसदेत एखादी सूचना आल्यास ही बाब आधारसाठी प्रतिकूल मानता येणार नाही, असे मला वाटते. जेटली म्हणाले की, आधार ही विकसित होत असलेली संकल्पना आहे. आधारचा अंतिम शब्द अद्याप लिहिला गेलेला नाही, याबाबत मला खात्री आहे.
आधारला मजबूत करण्याच्या मुद्द्यावर सरकार नेहमीच खुले राहील. आधारच्या सुरक्षेसाठी तुम्हाला पुरेशा ‘फायरवॉल’ उभाराव्याच लागतील. मात्र, त्याचवेळी सार्वजनिक हित हे वैयक्तिक हिताच्या नेहमीच वर राहिले पाहिजे.
वैयक्तिक गोपनीयतेच्या मुद्द्यावर आधारला मोबाइल क्रमांक व बँक खाती जोडण्यास मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकांची सुनावणी सुरू आहे. आधारचा गैरफायदा घेतला जाण्याचा धोकाही दूरसंचार कंपनी एअरटेलने केलेल्या उचापतीच्या प्रकरणानंतर समोर आला आहे. (source :)
महत्वाच्या घटना
१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
१९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली.
१९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
१९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
१९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
१९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.
२००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले.
जन्म
१७८५: बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्लचा यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी१८७१)
१७९१: इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ चार्ल्स बॅबेज यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १८७१)
१८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७६)
१९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)
१९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी२०००)
१९२५: शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक पं. कृष्णा गुंडोपंत तथा के. जी. गिंडे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९९४)
१९३५: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९९९)
१९४८: डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म.
मृत्य
१५३०: पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १४८३)
१९७२: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचे निधन. (जन्म: ८ मे १८८४)
१९८९: व्यंगचित्रकार व लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)
१९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट१९१८)
२०००: नाटककार आणि साहित्यिक प्रा. शंकर गोविंद साठे यांचे निधन.
२०११: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९३३)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.