चालू घडामोडी - २६ ऑगस्ट २०१७

Date : 27 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गणपतीत ध्वनिक्षेपक वापरात चार दिवस सूट :
  • ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेले आदेश, ध्वनिप्रदूषण २००० मधील नियम ३ व ४ चे पालन, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण नियम २००० च्या अधिसूचनेनुसार पालन करणे संबधितांवर बंधनकारक आहे.

  • मुंबई शहर आणि जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याच्या मर्यादेतून सूट देण्याबाबतचे १५ दिवस मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहेत.

  • २५ ऑगस्ट पासून सुरू होणारा गणपती उत्सव चार दिवस (दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विर्सजन व अनंत चतुर्दशी), नवरात्री उत्सव दोन दिवस (अष्टमी व नवमी) दिवाळी एक दिवस (लक्ष्मीपूजन), नाताळ एक दिवस, ३१ डिसेंबर एक दिवस या दिवसांसाठी श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या ठिकाणी ध्वनिवर्धक सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वापरण्याची सूट असेल.

लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल :
  • आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेश अग्रवाल औरंगाबादेत आले होते. प्रारंभी राजेंद्र दर्डा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले असून नरेश अग्रवाल यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

  • लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांचा शहरवासीय व लायन्स परिवारातर्फे नागरी सत्कार करण्यात आला.

  • २१० देशांमध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सेवाकार्य सुरू आहे. लायन्सने शताब्दी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करून शतकोत्तर पहिल्या वर्षात पाऊल टाकले, या ऐतिहासिकसमयी लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद भूषविण्याचा मान नरेश अग्रवाल या भारतीय उद्योजकांना मिळाला.

  • सत्काराला उत्तर देताना अग्रवाल म्हणाले की, हा नरेश अग्रवाल यांचा सत्कार नव्हे, हा सन्मान भारतीय तिरंगा झेंड्याचा आहे, सव्वाकोटी भारतीयांचा हा सन्मान आहे.

  • मी ज्या देशांमध्ये लायन्सचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जातो तेथे प्रथम आपले राष्ट्रगीत म्हटले जाते. मला अभिमान वाटतो, मी हिंदुस्थानी असल्याचा.

सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत पॅनकार्ड हे आधारला जोडण्याची सक्ती :
  • सरकारी अनुदाने, सामाजिक कल्याण कार्यक्रम व इतर लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड योजना लागू राहणार असून, त्यात आधारकार्ड हे पॅनला जोडण्यासाठी महिनाअखेरीस दिलेली मुदत कायम राहील, असे पांडे यांनी सांगितले.

  • खासगीपणा हा मूलभूत हक्क आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी आधारकार्ड हे पॅनला जोडावेच लागणार असून, त्यासाठी दिलेली कालमर्यादा लागू राहणार आहे, असे 'यूआयडीएआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी सांगितले.

  • आधार कायदा, प्राप्तिकर कायदा व काळ्या पैशाविरोधातील नियम जोपर्यंत लागू आहेत तोपर्यंत यात काही परिणाम होण्याची शक्यता नाही, 'पॅन हे आधारकार्डला जोडावेच लागेल. प्राप्तिकर कायद्यातील दुरुस्तीनुसार ते आवश्यक आहे, त्यात काही बदल होणार नाही.

  • आधी विविध प्रक्रियांसाठी दिलेल्या कालमर्यादा या पाळाव्याच लागतील, खासगीपणाचा किंवा व्यक्तिगततेचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे पण आम्ही आधारकार्डातील माहिती सुरक्षित ठेवली आहे.

इन्फोसिस संचालक मंडळाचे नवे अध्यक्ष : नंदन निलेकणी
  • नंदन निलेकणी यांची संचालक मंडळाचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मात्र विशाल सिक्का, संचालक मंडळाचे अध्यक्ष आर. सेशाशाही, प्राध्यापक जेफ्री लेहमन, आणि प्राध्यापक जॉन इट्‌चेमेंडी यांनी राजीनामे दिले आहेत.

  • इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक आणि आधारकार्ड योजनेचे शिल्पकार नंदन निलेकणी यांनी अखेर इन्फोसिस संचालक मंडळाचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली.

  • मात्र याचवेळी सिक्कासह आणखी तीन संचालकांनी संचालकपदाचे राजीनामे दिले आहेत.

  • निलेकणी योग्य नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी नव्याने भरारी घेईल, असा विश्‍वास व्यक्‍त करत सेशाशाही यांनी निलेकणी यांचे स्वागत केले.

  • विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर आठवडाभरात कंपनीच्या संचालक मंडळाने निलेकणींच्या नियुक्‍तीला मंजुरी दिली.

मेधा पाटकर यांना २३ ऑगस्ट रोजी इंदौर हायकोर्टाने जामीन मंजूर :
  • सरकारी कामात अडथळा आणि सरकारी अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी मेधा पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • मध्य प्रदेशमधील चिखलदा येथे नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी २७ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना २३ ऑगस्ट रोजी इंदौर हायकोर्टाने जामीन मंजूर केला.

  • सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाप्रकरणी मेधा पाटकर यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

  • या गुन्ह्याप्रकरणी मेधा पाटकर यांना सत्र न्यायालयाने जामीन नाकारला होता. शेवटी मेधा पाटकर यांनी इंदौर हायकोर्टात जामीन अर्ज केला होता.

  • सरकारी अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भाजपाची जबाबदारी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे :
  • कर्नाटकात या वर्षीच्या अखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची भाजपाची जबाबदारी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

  • मणिपूर विधानसभा निवडणूक पक्षाला जिंकून दिल्याचे मोठे बक्षीस जावडेकर यांना या जबाबदारीतून दिले गेले आहे.

  • भाजपा नेतृत्वाने कोळसा, खाणी आणि वीजमंत्री पीयूष गोयल यांना कर्नाटकातच जावडेकर यांचे सहप्रमुख बनवण्यात आले आहे.

  • कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सरकारचा पाया बळकट असून, भाजपा मात्र अंतर्गत मतभेदांना तोंड देत आहे. त्यामुळे कर्नाटक हे भाजपासाठी मोठेच आव्हान आहे. पर्यायाने जावडेकर-गोयल यांनाही आव्हान कठीणच आहे.

  • गुजरात विधानसभा निवडणुकीची पक्षाची जबाबदारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे दिली गेली असून चार मंत्र्यांनाही सहप्रमुख बनवण्यात आले.

  • ग्रामीण आणि नागरी विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन, पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंह आणि कायदा राज्य मंत्री पी.सी. चौधरी हे जेटलींसोबत गुजरात विधानसभा निवडणुकीत काम करतील. जेटली चार वेळा गुजरातेतून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • -

जन्म/वाढदिवस

  • मदर तेरेसा, समाजसेविका; 'नोबेल पारितोषिक' आणि 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित : २६ ऑगस्ट १९१०

  • गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ : २६ ऑगस्ट १९२२

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक : २६ ऑगस्ट १९४८

  • अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक : २६ ऑगस्ट १९५५

ठळक घटना

  • रशियाने जॉर्जियाचे अबखाझिया आणि दक्षिण ओसेशिया हे प्रांत स्वतंत्र असल्याचे परस्पर जाहीर केले : २६ ऑगस्ट २००८

  • अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्ती अमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला : २६ ऑगस्ट १९२०

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.