मतदानोत्तर कल चाचण्यांच्या अंदाजानुसार विद्यमान चॅन्सलर अँगेला मर्केल यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) पक्ष आणि बव्हेरियातील ख्रिश्चन सोशल युनियन (सीएसयू) पक्ष यांच्या युतीला सर्वाधिक म्हणजे ३४ ते ३७ टक्के मते मिळून मर्केल पुन्हा चॅन्सेलर बनतील अशी आशा आहे.
जर्मनीत रविवारी संसदेचे (बुंडेस्टाग) प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान झाले असून त्या खालोखाल सोशल डेमोक्रॅट्स (एसपीडी) या डाव्या पक्षाला २१ ते २२ टक्के तर मुस्लीम निर्वासितांना विरोध करणाऱ्या आल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाला १० ते १३ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
एएफडीच्या रूपात कट्टर उजव्या पक्षाला गेल्या कित्येक दशकांनंतर संसदेत या वेळी प्रथमच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मर्केल यांनी स्थैर्य व विकास या मुद्दय़ांवर निवडणूक लढवली असून ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर (ब्रेक्झिट) युरोपच्या मुक्त व संयुक्त बाजारपेठेचे भवितव्य, जागतिक मंदीच्या काळात जर्मनीची प्रगती कायम ठेवणे, सीरियामधील निर्वासितांच्या येण्याने निर्माण झालेल्या सामाजिक तणावाला तोंड देणे असे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे बनले होते.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस हे या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत असून या दौऱ्यादरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
समुद्री सीमांवर नजर ठेवण्यासाठी भारत या ड्रोनचा वापर करण्याची शक्यता आहे, जर या योजनेला मंजुरी मिळाली तर भारतीय नौदलाकडे जगातील सर्वात प्रगत शैलीचे ड्रोन असतील यात शंकाच नाही.
या ड्रोनद्वारे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या कारवायांना उत्तर देणे शक्य होणार असून ड्रोनची ताकद भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यात हातभार लावणार आहे. त्याचमुळे मॅटिस आणि मोदी यांच्या भेटी दरम्यान काय होईल याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
जेम्स मॅटिस यांच्या दौऱ्यादरम्यान सागरी सीमेची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे अशी माहिती ‘एनडीटीव्ही’ने दिली असून भारताच्या समुद्री सीमारेषांवर चीनने नजर ठेवण्यास सुरूवात केली आहे, त्याचमुळे मॅटिस यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ड्रोन कराराला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
दोन्ही देशांमधील सुरक्षा करार वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने जेम्स मॅटिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होणार असून इतकेच नाही तर २२ मानवरहित ड्रोन खरेदीच्या योजनेलाही या दौऱ्यादरम्यान मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघानं आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत नंबर एक स्थान मिळवले आहे.
कसोटीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने एकदिवसीय प्रकारातही अव्वल स्थान मिळवले असून याआधी दक्षिण आफ्रिका प्रथम क्रमांकावर होती.
ऑस्ट्रेलियावरील विजयाबरोबर भारतानं आफ्रिकाला मागे टाकत पहिला नंबर पटकावला असून दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत भारत सध्या प्रथम क्रमांकावर असून टी २० मध्ये पाचव्या स्थानावर आहे आयसीसी वनडे क्रमवारीत भारत १२० गुणासह प्रथम क्रमांकावर आहे.
द. आफ्रिकेच्या नावावर ११९ गुण असून ऑस्ट्रेलियाला मात्र ३ गुणांचे नुकसान झालं आहे, ११७ वरुन त्यांचे गुण ११४ गुण झाले असून भारताविरोधातील तीन पराभवामुळे त्यांची क्रमवरीत घसरण झाली आहे. चौथ्या स्थानावर इंग्लंड असून त्यांच्या नावार ११३ गुण आहेत .
‘मन की बात’या कार्यक्रमावर टीका करणा-यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले असून हा कार्यक्रम म्हणजे जनतेच्या भावना, इच्छा, तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ आहे.
‘मन की बात’ला तीन वर्ष पूर्र्ण झाले. या कार्यक्रमाबद्दल ते म्हणाले की, ‘मन की बात’ही सकारात्मक शक्ती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकांच्या यावर प्रतिक्रिया येत असतात आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला.
स्वच्छता अभियान, विविधतेतून एकतेचे महत्व आदी विषयावर त्यांनी मत व्यक्त केले असून शहीद सैनिकाच्या पत्नी लेफ्टनंट स्वाती आणि निधी सैन्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी म्हणाले की, खादी एक वस्त्र नाही तर एक विचार असून खादीमुळे गरीबांच्या घरात थेट रोजगार पोहोचत आहे.
तरुण पिढीत खादीचे आकर्षण वाढत असून खादीची विक्री वाढत आहे, खादीचे वस्त्र खरेदी करून, गरिबांच्या घरात दिवाळीचा दिवा पेटवा असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई ते अहमदाबाद या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा उलट राज्याच्या तिजोरीवर खर्चाचा बोजा पडणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प स्वीकारायच्या आधी विचार करायला हवा होता, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली असून पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, मोठा गाजावाजा करून मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
बुलेट ट्रेनला आमचा विरोध नाही परंतु या ट्रेनचा मुंबईसह महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नसून सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून ३५ हजार कोटी जाणार आहेत.
अहमदाबादपर्यंत या ट्रेनचे एकूण ११ स्टेशन असून त्यातील केवळ चारच महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत, त्यामुळे या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ गुजरातलाच होणार आहे.
बुलेट ट्रेन करायचीच होती, तर ती मुंबई-दिल्ली अथवा चंद्रपूर-पुणे-मुंबई अशी केली असती, तर त्याचा राज्याला लाभ झाला असता असे पवार म्हणाले.
जागतिक दिवस
जागतिक हृदय दिन
जन्म /वाढदिवस
गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार : २५ सप्टेंबर १८८१
बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी : २५ सप्टेंबर १९२६
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक : २५ सप्टेंबर १९९८
अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी : २५ सप्टेंबर २००४
ठळक घटना
रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली : २५ सप्टेंबर १९१९
प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला : २५ सप्टेंबर १९४१
अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर : २५ सप्टेंबर १९९९
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.