चालू घडामोडी - २५ ऑक्टोबर २०१७

Date : 25 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ज्येष्ठ शास्त्रीय आणि ठुमरीसम्राज्ञी गिरिजा देवी यांचे निधन
  • कोलकाता : प्रख्यात शास्त्रीय गायिका तथा ठुमरीसम्राज्ञी गिरिजा देवी यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीतामधील एका सुरेल पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. जमीनदार कुटुंबात ८ मे १९२९ रोजी जन्मलेल्या गिरिजादेवी सेनिया आणि बनारस घराण्याच्या गायिका होत्या.

  • त्यांना १९७२ मध्ये पद्मश्री, १९८९ मध्ये पद्मभूषण व २०१६ मध्ये पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले होते. १९७७ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

  • वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी त्या काळचे ज्येष्ठ गायक व सारंगीवादक सरजू प्रसाद मिश्रा यांच्याकडे ख्याल व टप्पा गायनाचे धडे गिरवले. 

मेट्रो रेल्वे धावणार कल्याण-भिवंडीपर्यंत, मेट्रो-५, मेट्रो-६ ला मंजुरी
  • मुंबई : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो-५ आणि मेट्रो-६ या नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

  • ठाणे, भिवंडी आणि कल्याण या मेट्रो-५मुळे मुंबईतील मेट्रोचे जाळे कल्याणपर्यंत जाणार असून अंधेरी पश्चिम-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६मुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी आणखी एक मेट्रो रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

  • स्वामी समर्थ नगर (अंधेरी पश्चिम)-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६च्या सविस्तर प्रकल्प अहवालास व त्याच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

  • एकूण १४.४७ किलोमीटर लांबीच्या या उन्नत मेट्रो मार्गामुळे स्वामी समर्थ नगर, सीप्झ, एल अ‍ॅण्ड टी यासारखी वाणिज्यिक क्षेत्रे तसेच आयआयटी पवईचा परिसर मेट्रोच्या नकाशावर येणार आहे. २०२१मध्ये ६.५० लाख तर २०३१पर्यंत ७.७० लाख प्रवासी या मार्गाशी जोडले जातील. 

दहावी-बारावी निकालासाठी आधार कार्ड सक्ती, शाळांच्या संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड गरजेचे
  • मुंबई : शाळांच्या संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सक्तीचे केल्यामुळे विद्यार्थी आणि शाळा त्रस्त झाल्या होत्या. त्यातच आता ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही अशा विद्यार्थ्यांना दहावी-बारावीचे निकाल देण्यात येणार नाहीत असा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.

  • दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत अर्ज भरताना ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, त्या विद्यार्थ्यांचेही अर्ज भरून घेतले जात आहेत.

  • पण, हे अर्ज भरून घेताना विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेतले जात आहे. दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांची महत्त्वाची वर्षे असतात. त्यामुळे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, म्हणून हमीपत्राचा पर्याय मंडळाने दिला आहे.

गहू, डाळींच्या आधारभूत किमतींमध्ये केली वाढ, मंत्रिमंडळ समितीचा निर्णय
  • नवी दिल्ली : गहू आणि डाळवर्गीय धान्याच्या किमान आधारभूत किमतींत (एमएसपी) सरकारने मंगळवारी वाढ केली. गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत ११० रुपयांची, तर डाळींच्या किमतीत २०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

  • या पिकांच्या उत्पादनवाढीस प्रोत्साहन देऊन, किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने ही वाढ करण्यात आली आहे.

  • ही वाढ २०१७-१८च्या रब्बी हंगामासाठी आहे. मंत्रिमंडळ समितीने ११० रुपयांच्या वाढीस मान्यता दिल्यानंतर, २०१७-१८च्या रब्बी हंगामासाठी गव्हाची किमान आधारभूत किंमत १,७३५ रुपये क्विंटल झाली आहे.

  • गेल्या वर्षी ती १,६२५ रुपये क्विंटल होती. हरभरा व मसूर डाळीच्या आधारभूत किमतींत २०० रुपये वाढ केल्याने, हरभºयाची किमान आधारभूत किंमत ४,२०० रुपये क्विंटल, तर मसूरची किंमत ४,१५० रुपये क्विंटल झाली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना :

  • १८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.

  • १९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.

  • १९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले.

  • २००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

जन्म :

  • ८४०: सफारीड राजघराण्याचे संस्थापक यकब इब्न अल-लेथ अल-सैफर यांचा जन्म.

  • १८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९२०)

  • १८८१: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)

  • १९३७: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै २०११)

  • १९४५: अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म.

मृत्यू :

  • १६४७: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १६०८)

  • १९५५: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२१)

  • १९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

  • १९८०: शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९२१)

  • २००३: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर१९२०)

  • २००९: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९२३)

  • २०१२: विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.