नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित साहित्य सादर करा, असे आवाहन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने केल्यामुळे सारेच जण चक्रावून गेले.
मुख्य म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित पुस्तके पाठवण्याचे आवाहन मात्र केले गेले नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या डॉ. बी. आर. आंबेडकर सेंट्रल लायब्ररीने सहभागी प्रकाशकांना १० नोव्हेंबर रोजी एक मेल पाठविला आहे.
त्यात पं. दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कधीही प्रकाशित झालेली आणि २०१६-१७मध्ये प्रकाशित झालेली अन्य पुस्तके सादर करण्यात यावीत, असे कळविण्यात आले.
जेएनयूने १४ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचे पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. मात्र प्रकाशकांना याबाबत काही निर्देश दिल्याचे वृत्त ग्रंथपाल रमेश सी. गौर यांनी फेटाळले.
ग्रंथालयाचे सहायक ऋषभ जैन यांनी जारी केलेल्या पत्रात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दीनदयाल उपाध्याय यांच्याशी संबंधित कधीही प्रकाशित झालेली पुस्तके सादर करण्यात यावीत, असा उल्लेख होता.(source :lokmat)
चेन्नई : येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या ‘आयआयटी मद्रास’च्या प्लेसमेंट्समध्ये जागतिक कीर्तीची अमेरिकी कंपनी अॅपल तसेच नॅसडॅक व भारतीय आधार प्राधिकरण यासारख्या नामांकित संस्था पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. जागतिक पातळीवरील इतरही अनेक मान्यवर कंपन्या विद्यार्थ्यांना नोकºया देण्यास उत्सुक आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
आयआयटी मद्रासच्या यंदाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी नोंदणी करणाºया कंपन्यांत १५ टक्के कंपन्या येथील प्लेसमेंट प्रक्रियेत पहिल्यांदाच सहभागी होत आहेत.
पहिल्यांदाच कॅम्पसमध्ये येत असलेल्या अन्य कंपन्यांत यूबीएस एजी, नॅसडॅक स्टॉक मार्केट, अलवरेज अँड मार्सल इंडिया, कंट्री गार्डन, हलमा इंडिया, रुब्रिक आणि सेकिसुई केमिकल्स यांचा समावेश आहे. यंदा कॅम्पसमध्ये सहभागी कंपन्यांची संख्याही वाढली आहे.
४०० पेक्षा जास्त जॉब प्रोफाइल्ससाठी यंदा २७० कंपन्यांनी कॅम्पससाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१६-१७ मध्ये एवढ्याच जॉब प्रोफाइलसाठी २५० कंपन्यांनी नोंदणी केली होती. २०१७-१८ च्या प्लेसमेंट प्रक्रियेचा पहिला टप्पा १ ते १० डिसेंबर या काळात होईल. यात ५ डिसेंबर रोजी एक दिवसाचा विश्राम असेल.(source :lokmat)
पनवेल तालुक्याच्या वेशीवरील रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल कंपनी (एचओसी) डबघाईस आल्याने या कंपनीचा काही भाग भारत पेट्रोलियम कंपनी व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) देण्याचे केंद्र सरकारने ठरविल्यामुळे इस्रोमधून होणाऱ्या संशोधनानंतर अवकाशोड्डाणात जमिनीवरून सुटणाऱ्या उपग्रहात रसायनी येथून उत्पादन केलेले इंधन भरले जाणार आहे.
यापूर्वी हे इंधन एचओसी कंपनीतून इस्रोला मिळत होते. मात्र इस्रो आता यापुढे स्वत:च या कच्च्या मालाची उत्पादन निर्मिती करून अवकाशोड्डाण करून उपग्रह पाठविणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
एचओसी कंपनीच्या तीनशे एकर जागेवरील कारखान्यातील २० एकर जागेवरील महत्त्वाचा प्रकल्प इस्रोला व भारत पेट्रोलियम कंपनीला उर्वरित ४४२ एकर जागा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
एचओसी कंपनी या प्रकल्पातून फीनोल, अॅसीटोन, नायट्रोबेन्झीन, अॅनीलाइन, नायट्रोटोलीन, नायट्रो सल्फरिक अॅसिड, नायट्रोक्लोरोबेन्झीन ही उत्पादने बनवत होती. त्यापैकी इस्रोच्या उपग्रहातील अवकाशोड्डाणात लागणारा एन २ वो फोर याचा कच्चा माल येथे बनविला जात होता. (source : loksatta)
नवी दिल्ली : २0१९ पर्यंत दूरसंचार क्षेत्रात केवळ तीनच मोठ्या कंपन्या राहतील, असे प्रतिपादन भारती उद्योग समूहाचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी केले आहे. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर दूरसंचार क्षेत्रात मोठ्या उलथापालथी होत आहेत.
छोट्या कंपन्यांना अस्तित्व टिकविणे अवघड झाल्यानंतर अधिग्रहण आणि विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर मित्तल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, दूरसंचार क्षेत्रातील अस्थैर्य संपविणे हे नव्या कंपनीच्या (जिओ) हाती आहे.
त्यांची बॅलन्सशीट मजबूत आहे. तथापि, आम्हीही आमचा अव्वल क्रमांक टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे. कदाचित मार्च २0१८ पर्यंत अथवा खात्रीने म्हणाल तर मार्च २0१९ पर्यंत अस्थैर्य संपून तीनच आॅपरेटर बाजारात शिल्लक राहतील.
मित्तल यांची भारती एअरटेल ही कंपनी सध्या भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी आहे. आयडिया आणि व्होडाफोन यांच्यात सध्या विलीनीकरण प्रक्रिया सुरू आहे. या विलीनीकरणानंत एअरटेलला आपले स्थान गमवावे लागेल का, या प्रश्नावर मित्तल यांनी म्हटले की, कदाचित गमवावे लागणार नाही.(source : lokmat)
स्थानिक खेळाडू अंकुशितासह ज्योती, शशी अंतिम फेरीत यजमान म्हटले की स्थानिक खेळाडूंना हुरूप येणे आणि त्या हुरूपाने आत्मविश्वास उंचावणे हे ओघाने आलेच. मात्र त्याचे अतिआत्मविश्वासात रूपांतर होऊ न देणे आणि लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करणे, ही खरी कसरत आहे.
गुवाहाटी येथे सुरू असलेल्या एआयबीए जागतिक युवा महिला अजिंक्यपद स्पध्रेत भारतीय बॉक्सिंगपटूची अशीच कसरत सुरू आहे. त्यांची घोडदौड विजयी मार्गावर सुरू असली तरी कुठेतरी अतिआत्मविश्वास त्यांना किंचितसा महागात पडत असल्याचे चित्र जाणवले. भारतीयांसाठी सुखद बाब इतकीच की त्याचे अद्याप पराभवात रूपांतर झालेले नाही.
शुक्रवारी ५१ किलो वजनी गटात भारताच्या ज्योतीने प्रेक्षकांची धाकधूक अशीच वाढवली, परंतु त्वरित सावरत तिने कझाकस्तानच्या झांसाया अॅबड्रॅईमोव्हावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
‘‘या विजयाचा आनंद नक्कीच आहे, परंतु दुसऱ्या फेरीत डावपेच चुकल्याचा फटका बसला असता प्रशिक्षकांनी मला पदलालित्याचा कौशल्यपूर्ण वापर करून प्रतिस्पर्धी चकवण्यास सांगितले होते. मात्र, मी एकाच जागी उभी राहत होती आणि त्याचा फायदा उचलताना झांसाया मला मागे जाण्यास भाग पाडून गुण वसूल करत गेली.
दिनविशेष :
जागतिक दिवस
आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन
महत्वाच्या घटना
१६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
१९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
१९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८१: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
१९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
१९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
२०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
जन्म
१८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)
१८७२: ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)
१८७९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)
१८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.
१९२१: नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
१९२६: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)
१९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.
१९३९: मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादकउस्ताद रईस खान यांचा जन्म.
१९७२: भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.
१९८३: भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.
मृत्य
१८८५: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)
१९२२: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४ – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)
१९६०: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)
१९७४: संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९०९)
१९९७: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.
१९९८: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
२०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर१९२०)
२०१६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९२६)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.