भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो) च्या शास्त्रज्ञांनी आपली दुसरी चांद्र मोहीम ‘चांद्रायन-२’ ला यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत पुढे नेणे सुरू केले आहे. २२ जुलै रोजी अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान (पेरिजी) १७० किमी व कमाल (एपोजी) ४५ हजार १४७५ किमी अंतरावर स्थिरावण्यात आले होते. याच कक्षेत असताना आज दुपारी २ ते २.३० वाजेदरम्यान यात यशस्वीरित्या बदल करण्यात आले. आता याची पेरिजी २३० किमी आणि एपोजी ४५ हजार १६३ किमी करण्यात आली आहे.
आता सहा ऑगस्टपर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूंनी चांद्रयान-२ च्या कक्षेला बदलले जाईल. २२ जुलैनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचण्यासाठी ‘चांद्रयान-२’ चा ४८ दिवसांचा प्रवास सुरू झाला आहे. श्रीहरिकोटा येथून झेपावल्याच्या १६.२३ मिनिटानंतर चांद्रयान -२ पृथ्वीपासून जवळपास १७० किमी उंचीवर जीएसएलव्ही एमके ३’ या प्रक्षेपकापासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरत होते.
चांद्रयान -२ अंतराळात २२ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूंनी फिरत राहील. यानंतर १४ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत चंद्राकडे जाणाऱ्या लांब कक्षेतील प्रवास करेल. २० ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या कक्षेत पोहचेल. यानंतर ११ दिवस म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत ते चंद्राच्या चारही बाजूंनी फिरत राहील. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी विक्रम लॅण्डर ऑर्बिटरपासून वेगळे होईल आणि चंद्राच्या दक्षिणी ध्रुवाच्या दिशेने वाटचाल सुरू करेल. पाच दिवसांच्या प्रवासानंतर ६ सप्टेंबर रोजी विक्रम लॅण्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल, यानंतर चार तासांनी रोवर प्रज्ञान लॅण्डरपासून निघून चंद्राच्या पृष्ठभागावर विविध प्रयोग करण्यासाठी उतरेल.
ब्रिटनचे माजी परराष्ट्र मंत्री आणि लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटन यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. बोरिस यांच्या मंत्रीमंडळाचीही घोषणा झाली असून त्यामध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे.
बोरिस यांच्या मंत्रीमंडळात प्रीती पटेल यांना गृहमंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. गृहमंत्री पदी विराजमान होणाऱ्या पटेल या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. विशेष म्हणजे पटेल यांच्या नियुक्तीमुळे ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एक गुजराती व्यक्ती गृहमंत्री झाली आहे.
ब्रेग्झिटवरुन ब्रिटन सरकारवर उघडपणे टिका करणाऱ्या पटेल या बोरिस यांच्या समर्थक आहेत. पटेल या कंझर्वेटीव्ह पक्षाच्या ‘बॅक बोरिस’ मोहिमेच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होत्या. बोरिस यांना पाठिंबा देणाऱ्या पटेल यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती.
‘नवे मंत्रीमंडळ हे आधुनिक ब्रिटन आणि कंझर्वेटीव्ह पक्षाच्या आधुनिक धोरणांचा पुरस्कार करणारे असावे,’ असं मत पटेल यांनी मंत्रिमंडळाची घोषणा होण्याच्या काही तास आधी केली होती. मूळच्या गुजराती असणाऱ्या पटेल या ब्रिटनमधील भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतीयांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना पटेल आवर्जून उपस्थित राहतात. पटेल या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या समर्थक आहेत.
नवी दिल्ली : भारताने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वास्तव्याची माहिती मिळण्यासाठी रशियाला अनेकदा विनंत्या केल्या असून तेथील अभिलेखागारात कुठलीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे त्यांनी कळवले आहे, अशी माहिती लोकसभेत बुधवारी देण्यात आली.
एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे की, भारताने नेताजी सुभाषचंद्र बोस हे ऑगस्ट १९४५ पूर्वी किंवा नतर रशियात होते की, नाही याबाबत रशियाकडे माहिती मागितली होती. बोस यांच्या वास्तव्याची माहिती रशियाकडे असण्याची शक्यता गृहित धरून २०१४ पासून अनेकदा विनंत्या करण्यात आल्या, त्यानुसार शोध घेतला असता त्यांना रशियातील अभिलेखागारात कुठलीही कागदपत्रे सापडेलेली नाहीत.
सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये केली व जपानी लष्कराच्या पाठिंब्याने त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला. नेताजींचा मृत्यू तैवान येथील अपघातात १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाला होता.
नवी दिल्ली : माहितीच्या अधिकाराचा कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून प्रवर समितीत सखोल चर्चा केल्याशिवाय या कायद्यात दुरुस्ती होऊ दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका राज्यसभेतील विरोधी पक्षांनी घेतली. राज्यसभेत विरोधी पक्षाचे बहुमत असल्याने केंद्र सरकारने माहिती अधिकारात दुरुस्ती करणारे विधेयक बुधवारी मांडले नाही.
लोकसभेत चार तासांच्या चर्चेनंतर मंगळवारी हे विधेयक मंजूर करण्यात आले. ते बुधवारी राज्यसभेत मांडले जाणार होते. राज्यसभेत सत्ताधारी ‘एनडीए’कडे ११६ खासदारांचे संख्याबळ असून त्यांना बहुमतासाठी आणखी पाच खासदारांची गरज आहे. राष्ट्रीय तेलंगण समिती आणि बिजू जनता दल हे दोन्ही पक्ष विषयानुरूप केंद्र सरकारला पाठिंबा देतात. माहिती अधिकारातील दुरुस्तीला या दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतलेला आहे.
‘यूपीए’च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने माहिती अधिकाराचा कायदा बनलेला होता. सोनिया गांधी यांनी या कायद्यातील दुरुस्तींना विरोध दर्शवला असून त्यांनी जाहीर निवेदनही प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे बुधवारी राज्यसभेतील काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या दालनात विरोधी पक्ष नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हे दुरुस्ती विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेत हे विधेयक मांडले तर तातडीने संमत होण्याची शक्यता नसल्याचे दिसल्यानंतर केंद्र सरकारने हे दुरुस्ती विधेयक मांडण्याचे टाळले.
पणजी : उपसभापती असलेल्या मायकल लोबो यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्या नंतर रिक्त झालेल्या गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी काणकोणचे आमदार इजिदोर फर्नाडिस यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदासाठी भाजपातर्फे फर्नांडिस यांनी एकट्यानेच उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या नावाची घोषणा उद्या गुरुवारी (25 जुलै) होणार आहे.
अलीकडे 10 काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरा नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मायकल लोबो यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला व ते मंत्री बनले. लोबो यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्या नंतर भाजपने उपसभापतीपद स्वीकारण्यास नीळकंठ हळर्णकर यांना सांगितले होते. मात्र हळर्णकर यांनी त्याला नकार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर फर्नांडिस यांच्या नावाचा विचार झाला. फर्नांडिस यांनी उपसभापतीपद स्वीकारणे मान्य केले. इजिदोर फर्नांडिस यांनी काही काळ मंत्री म्हणून काम केले होते.
गोवा औद्योगिक विकास महामंडळाचेही ते एकदा चेअरमन झाले होते. फर्नांडिस यांना आता प्रथमच उपसभापतीपद प्राप्त झाले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस किंवा इतर कुठल्याच पक्षाच्या आमदाराने उमेदवारी सादर केली नाही. यामुळे फर्नांडिस हे बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. सभापती राजेश पाटणेकर गुरुवारी त्यांच्या नावाची घोषणा करतील असे अपेक्षित आहे. उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास बुधवारी (24 जुलै) मुदत होती.
लंडन : इंग्लंडच्या नव्या पंतप्रधानपदी बोरिस जॉनसन विराजमान झाले आहेत. बोरिस यांचे भारताशी एक अनोखे आणि जवळचे नाते आहे. बोरिस हे भारताचे जावई आहेत. प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार खुशवंत सिंह यांची पुतणी मारियाशी बोरिस यांनी लग्न केलं होतं. दोघांना चार मुलं देखील आहेत. 1993 साली लग्न झालेल्या बोरिस आणि मारिया यांचा चार मुलं झाल्यानंतर घटस्फोट झाला आहे.
मागील वर्षी 2018 मध्ये बोरिस आणि मारिया 25 वर्ष संसार केल्यानंतर विभक्त झाले. बोरिस अनेकदा भारतामध्ये अनेकदा येऊन गेले आहेत. बोरिस यांनी अनेकदा आपल्या भाषणात बोलताना मी भारताचा जावई आहे असा उल्लेख केला आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारतासोबत संबंध सक्रिय आणि मजबूत करण्याबाबत भाष्य केलं आहे. प्रधानमंत्री मोदी आणि भारतासोबत माझे खाजगी संबंध आहेत. भारत आणि ब्रिटनच्या संबंधांवर बोरिस नेहमीच सकारात्मक राहिले आहेत. जेव्हा मी पंतप्रधान मोदींसोबत असतो तेव्हा मी ब्रिटन आणि भारत या दोन आधुनिक लोकशाही देशातील संबंधावर चर्चा करतो. दोन्ही देशातील व्यापार आणि समृद्धीचा प्रचार करण्यासाठी, जागतिक सुरक्षा आणि आणखी काही महत्वाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करावे, असेही ते म्हणाले.
बोरिस यांची घटस्फोटित पत्नी मारिया यांची आई दीप सिंग यांनी बीबीसीचे प्रसिद्ध पत्रकार चार्ल्स विलर यांच्याशी लग्न केले होते. 2008 साली या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर दीप यांनी खुशवंत सिंग यांचे धाकटे बंधू दिलजीत सिंग यांच्याशी लग्न केले. पत्नी मारिया आणि आपल्या तीन मुलांबरोबर बोरिस हे मागील वर्षी भारतामध्ये रणथंबोर अभयारण्य पाहण्यासाठी आले होते, अशी माहिती खुशवंत यांचे पुत्र राहुल सिंग यांनी दिली आहे.
महत्वाच्या घटना
१८९४: पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
१९०८: किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
१९१७: कॅनडात आयकर लागू झाला.
१९७३: सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित.
१९७८: जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
१९९२: स्पेनमधील बार्सिलोना येथे २५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
१९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
१९९७: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना नेहरू पुरस्कार जाहीर.
१९९७: के. आर. नारायणन भारताचे १०वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती.
१९९९: लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
२००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनल्या.
जन्म
११०९: पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म.
१८७५: ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)
१९१९: गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००२)
१९२२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)
१९२९: लोकसभेचे सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म.
१९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म.
मृत्यू
१४०९: सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन.
१८८०: समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८२८)
१९७३: कॅनडाचे १२वे पंतप्रधान लुईस स्टिफन सेंट लोरें यांचे निधन.
१९७७: महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक कॅ. शिवरामपंत दामले यांचे निधन.
२०१२: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.