चालू घडामोडी - २५ जुलै २०१७

Date : 25 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
१४ वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज शपथविधी :

भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज पदाची शपथ घेणार असून देशाचे मुख्य न्यायाधीश जे एस खेहर नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शपथ देतील.

राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे खासदार उपस्थित राहतील. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल.

काय आहे राष्ट्रपती कोविंद यांचा कार्यक्रम

  • सकाळी १०.३० वाजता राजघाटावर दर्शन

  • सकाळी ११.१५ वाजता राष्ट्रपती भवनात आगमन

  • सकाळी ११.४५ वाजता संसदेकडे रवाना

  • पाच खुर्च्यांपैकी मधल्या खुर्चीवर प्रणव मुखर्जी, दुसऱ्या खुर्चीवर कोविंद तर तिसऱ्या खुर्चीवर खेहर बसतील

  • दुपारी १२.१५ वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात

युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सचिन सिवाचला सुवर्णपदक :
  • २३ जुलै रोजी संपलेल्या या स्पर्धेत भारताने चार सुवर्ण, एक रौप्य आणि सहा कांस्य पदकांची कमाई केली.

  • युवा विश्व चॅम्पियन सचिन सिवाचने अपेक्षित कामगिरी करताना लाइटफ्लाइवेट (४९ किलो) गटात वेल्सच्या जेम्स नॅथन रॉबर्टला धक्का देत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

  • भारताने चार सुवर्णपदकांसह एकूण ११ पदकांची कमाई करत सहाव्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सातवे स्थान पटकावले.

  • स्पर्धेच्या पहिल्याच दिवसी १८ जुलै रोजी ज्यूडो खेळाडूंनी भारताच्या खात्यात चार पदकांची नोंद केली. सोनीने ७३ किलो वजनी गटात बाजी मारताना ऑस्ट्रेलियाच्या उरोस निकोलिकला नमवून भारताच्या खात्यात पहिले सुवर्ण टाकले.

आर. आश्विनचे कसोटीचे अर्धशतक :
  • श्रीलंकेविरुद्ध गाले मैदानावर जेव्हा रविचंद्रन आश्विन उतरणार तेव्हा तो आपला कारकिर्दीतील ५० वा कसोटी सामना पूर्ण करणार.

  • तुम्ही कधी स्वत:च्या पुढे जाऊ शकत नाही, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक दिवशी सर्वाेत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट बऱ्याच समस्यांनी भरले असून जर तुम्ही भूतकाळातील गोष्टी घेऊन बसलात तर तुमच्यासाठी ते कठीण होत जाते.

  • कधी कधी कॉफी पिताना जुन्या गोष्टींवर नजर टाकता येईल. मात्र, त्याचा सातत्याने विचार करणेही योग्य नाही. पुढे जाणे..रोज चांगले प्रदर्शन करणे यावर अधिक लक्ष द्यायला हवे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. यशपाल कालवश :
  • प्रा. यशपाल यांच्या कार्याची दखल घेत १९७६ साली पद्मभूषण व २०१३ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. यशपाल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.

  • तसेच १९८३-१९८४ दरम्यान ते योजना आयोगाचे मुख्य सल्लागार होते, १९८६ ते १९९१ पर्यंत त्यांनी यूसीजीचे अध्यक्षपद भूषवले आहे.

  • शिवाय दूरदर्शनवरील विज्ञानासंबंधी कार्यक्रम 'टर्निंग पॉईंट'चे त्यांनी सूत्रसंचालन केले आहे.

प्रकाश कांकरिया यांना 'बेस्ट आय सर्जन' पुरस्कार :
  • मुंबई येथे आयोजित 'नवभारत हेल्थ केअर समीट' या कार्यक्रमात 'बेस्ट आय सर्जन' हा पुरस्कार अहमदनगरचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांना व 'बेस्ट आय हॉस्पिटल' हा पुरस्कार पुण्याच्या एशियन आय हॉस्पिटलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

  • नवभारत समूहातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संरक्षण राज्यमंत्री व प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. सुभाष भामरे तर विशेष अतिथी म्हणून आरोग्यमंत्री दीपक सावंत, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, एएफएमसीच्या डीन मेजर जनरल माधुरी कानिटकर उपस्थित होत्या.

  • मुंबईचे कॅन्सरतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. अडवाणी, बेस्ट न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वलसंगकर, हृदयरोगातील विशेष योगदान डॉ. परवेझ ग्रँट, बेस्ट मेडिकल कॉलेज आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज, बेस्ट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल, तर इतर मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

आम्ही पुढच्या पिढीसाठी व्यासपीठ तयार केले आहे : कर्णधार मिताली राज
  • भारतीय संघाला दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली असली तरी कर्णधार मिताली राजच्या मते भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे.

  • भारतीय संघ लॉर्ड्सवर रविवारी इंग्लंडविरुद्ध एकवेळ प्रथमच विश्वविजेतेपद पटकावण्याच्या स्थितीत असल्याचे दिसत होते, पण २८ धावांमध्ये ७ विकेट गमावल्या.

  • एकवेळ भारताची ३ बाद १९१ अशी दमदार स्थिती होती, पण २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव ४८.४ षटकांत २१९ धावांत संपुष्टात आला. पराभवानंतरही भारतीय कर्णधार मितालीला भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल भासत आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • संविधान दिन : पोर्तोरिको.

  • प्रजासत्ताक दिन : ट्युनिसीया.

जन्म, वाढदिवस

  • सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी : २५ जुलै १९२९

  • लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी : २५ जुलै १९७८

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • लुई स्टीवन सेंट लोरें, कॅनडाचा १२ वा पंतप्रधान : २५ जुलै १९७३

ठळक घटना

  • प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी : २५ जुलै २००७

  • के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी : २५ जुलै १९९७

  • सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर : २५ जुलै १९८४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.