सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून प्रत्येक क्षेत्रात स्त्री आणि पुरुष बरोबरीने काम करताना दिसतात. मात्र असे एक क्षेत्र आहे की ते म्हणजे एसटी महामंडळातील चालकांची जागा, यावर आजवर पुरुषांची मक्तेदारी होती. पण आता याच एसटीच्या चालक म्हणून महिलांच्या हाती स्टेअरींग असणार आहे. असा निर्णय घेणारे देशातील महाराष्ट्र राज्य पाहिले ठरले आहे.
चालक आणि वाहक प्रशिक्षण पदासाठी पात्र ठरलेल्या महिलांचा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यातील काही महिलांशी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने नांदेड येथील रब्बाना ह्यातखान पठाण यांच्याशी संवाद साधला आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी हे गाव तीन हजाराच्या आसपास गावांची लोकसंख्या आहे. या गावांत रब्बाना ह्यातखान पठाण या राहतात. आई वडील शेती करतात. तर चार भाऊ आणि चार बहिणी असे मोठे कुटुंब आहे. त्या घरात मोठ्या असल्याने त्यांचे लहान वयातच लग्न झाले. घरी सर्व काही ठीक चालले असताना त्याच दरम्यान मुलगा झाला. त्यानंतर पतीच्या त्रासामुळे विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि मग पुढे काय करायचा असा प्रश्न निर्माण झाला.
सातवी पर्यंत शिक्षण झाले होते. आता पुढे शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला घरातील सर्वांनी पाठिंबा देखील मग मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून दहावीची परीक्षा दिली. त्यात चांगल्या मार्काने उत्तीर्ण देखील झाल्यावर बीए करण्याचे ठरविले आणि आज बीएच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. संपूर्ण काळ खूप कठिण होता. या दरम्यान शिवणकाम, सेक्युरीटीची काम देखील केले.
कोकणातील तिवरे धरण फुटीमुळे ऐरणीवर आलेला धरण सुरक्षेचा प्रश्न आणि नंतर अतिवृष्टीमुळे राज्यातील बहुतांश भाग जलमय झाल्याने रेल्वे वाहतुकीस बसलेली झळ, या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रशासनाला स्वमालकीच्या सहा जलाशयांचे आरोग्य तपासण्याची उपरती झाली आहे. रेल्वेच्या मुंबई सभोवतालच्या जलाशयांची तातडीने संरचनात्मक तपासणी करावी, यासाठी रेल्वेने येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (मेरी) साकडे घातले आहे.
राज्यातील बहुतांश धरणांची मालकी राज्य सरकार म्हणजे पाटबंधारे विभागाकडे असून काही जलाशय मुंबई, कोल्हापूर महापालिका, रेल्वे, खासगी संस्थांचेही आहेत. राज्य शासनाच्या मोठय़ा, मध्यम प्रकल्पांची तपासणी मेरीच्या अखत्यारीतील धरण सुरक्षितता संघटना करते. मुंबई, कोल्हापूर महापालिकेबरोबर टाटा कंपनीसारख्या खासगी संस्थाही आपल्या धरणांची तपासणी मेरीकडून करवून घेतात. नौदलाच्या आयएनएस शिवाजी संस्थेच्या जलाशयाची तपासणी नियमितपणे होते. तपासणीअंती सुचविल्यानुसार आवश्यक ती दुरुस्ती केली जाते. रेल्वेने मात्र आजवर अशा तपासणीची तयारी दर्शविली नव्हती. धरण सुरक्षितता संघटनेने पाठपुरावा करूनही प्रतिसाद न देणाऱ्या रेल्वेला आता त्याची निकड वाटल्याचे अधिकारी सांगतात.
मुंबई येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने पत्राद्वारे नुकतीच मेरीकडे तशी मागणी केली. मध्य रेल्वेचे मुंबईच्या आसपास विझ जीआयपी, दिघी, पळसदरी, भुशी, रादा, इगतपुरी असे सहा जलाशय आहेत. त्यातील बहुतेक ब्रिटिशकालीन असून त्यांच्या बांधकामाची तातडीने तपासणी करावी, अशी विनंती करण्यात आली. मेरीच्या तज्ज्ञांनी धरणांची प्रत्यक्ष पाहणी करावी. दुरुस्तीची गरज असल्यास त्याचा अंदाजित खर्च सादर करावा, अशी रेल्वेची अपेक्षा आहे. राज्याच्या अखत्यारीतील धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे रेल्वे मार्गाना झळ बसल्याची साशंकता आहे. त्यामुळे रेल्वे मार्ग परिसरातील अशा धरणांचा अभ्यास करावा, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
कच्च्या मालाच्या किमती, मजुरी आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे गणेशमूर्तीच्या किमतीत यंदा १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गणेशमूíतकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा ३० लाख गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातून मागणी होत असते.
पेणमध्ये गणपती बनवणारे ४५० लहान-मोठय़ा कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी साधारणपणे ३५ लाख गणेशमूर्ती बनवल्या जातात. देश-विदेशात या गणेशमूर्तीची विक्री केली जाते. यातून जवळपास ५० ते ६० कोटींची उलाढाल होत असते. यावर्षी देखील पेणमधून ३६ लाख गणेशमूर्ती देश-विदेशात पाठवण्यात आल्या आहेत. यावर्षी अमेरिका, इंग्लड, दुबई, बँकॉक, ऑस्ट्रेलिया, मॉरेशिअस येथे पेणच्या गणेशमूर्ती पाठविण्यात आल्या आहेत.
दरवर्षी गणेशमूर्तीच्या किमतींमध्ये साधारणपणे १० ते १५ टक्क्यांची वाढ होत असते. यावर्षी मात्र ही दरवाढ २० टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. वाहतूक खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. याचा अतिरिक्त फटका गणेशमूर्तीच्या किमतीवर झाला आहे. गणेशमूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने गुजरात, केरळ आणि राजस्थानमधून आणला जातो. यात काथ्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग यांसारख्या घटकांचा समावेश असतो. वाहतूक खर्च वाढल्याने रंग, शाडूची माती, पीओपी आदीच्या किमतीत वाढ झाली आहे.
दुसरीकडे कुशल कारागिरांची कमतरता ही पेणमधील गणेशमूर्ती व्यवसायासमोरील मोठी अडचण असते. त्यामुळे चांगली मजुरी देऊ न कारागीर मिळत नाहीत. जे मिळतात त्यांना दिवसाला चारशे ते पाचशे रुपये घेतात. याचा एकत्रित परिणाम गणेशमूर्तीच्या किमतीवर झाला आहे.
भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने शनिवारी चीनच्या शेन युफेईचा २१-७, २१-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला व वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने सलग तिसऱ्यांदा महिला एकेरीच्या गटात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
सिंधूने प्रतिस्पर्धी युफेईला कुठलीही संधी न देता संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. रॅटचानोक इन्टानोन आणि नोझोमी ओखुरा यांच्यात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. यांच्यातील विजेत्याशी अंतिम फेरीत सिंधूची गाठ पडेल.
काल पी. व्ही. सिंधूनेही ताइ यिंगचा १२-२१ २३-२१, २१-९ असा तीन सेटमध्ये पराभव करुन सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. पी. व्ही सिंधूने गेल्या वर्षी वर्ल्ड टूर फायनलमध्ये ताइवर तीन गेम्समध्ये मात केली होती.
केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते अरुण जेटली यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, अंत्यदर्शनासाठी जेटली यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात ठेवण्यात आले आहे.
दीर्घ काळापासून आजारी असलेल्या अरुण जेटली यांची नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात शनिवारी दुपारी प्राणज्योत मालवली. जेटली यांचे पार्थिव ‘एम्स’मधून त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले होते. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी 11 वाजता दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयात आणण्यात आले असून, दुपारी 1 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता यमुना नदीच्या काठावरील निगमबोध घाटावर अरुण जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२५) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशी संवाद साधला. जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री कृष्ण आणि १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आठवणीने मोदींनी कार्यक्रमाला सुरूवात केली.
यावेळी गांधीजींचं स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करायचंय असं मोदींनी म्हटलं. तसंच, २ ऑक्टोबर रोजी १५० व्या जयंतीनिमित्त गांधींजींना हागणदारीमुक्त भारत समर्पित करु आणि प्लास्टिकच्या विरोधात एका जनआंदोलनाची सुरूवात करु असं मोदी म्हणालेत. एकीकडे देश पावसाचा आनंद लुटत आहे, तर दुसरीकडे देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात सणासुदीची लगबग आहे. दिवाळीपर्यंत देशातील वातावरण असंच राहील, असंही यावेळी मोदी म्हणाले.
जन्माष्टमीचा उल्लेख करताना यावेळी मोदींनी भगवान श्री कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचं उदाहरण दिलं. त्यानंतर सध्या देशात अजून एका उत्साहाची तयारी सुरू असून तो उत्सव म्हणजे महात्मा गांधींची १५० वी जयंती असं मोदींनी नमूद केलं. तसंच, सामान्य व्यक्ती श्रीकृष्णाच्या जीवनातून वर्तमानातील समस्यांवर उपाय शोधू शकतो असंही मोदी म्हणाले. “एकीकडे सुदर्शन चक्रधारी मोहन आहे, तर दुसरीकडे चरखाधारी मोहन (महात्मा गांधी) आहे. सत्यासोबत गांधींचं जितकं अतूट नातं राहिलंय तितकंच अतुट नातं लोकांची सेवा करण्यामध्येही राहिलंय”, असं मोदी म्हणाले.
२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त मोदींनी गांधींजींची आठवण काढताना, आपल्याला गांधीजींचं स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करायचंय असं मोदींनी म्हटलं. आपण सर्वांनी एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळावा असं आवाहन यावेळी मोदींनी देशवासियांना केलं. गेल्या काही वर्षांपासून आम्ही दोन ऑक्टोबरच्या आधी जवळपास दोन आठवड्यापर्यंत देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान सुरू करतो. यंदा हे अभियान ११ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याची माहितीही मोदींनी यावेळी दिली.
बहारिन : जगासमोर भारताने आपले सामर्थ्य दाखवले आहे. भारत आज जगामध्ये चमत्कार करत आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित आहेत. भारताची प्रतिभा ही जागतिक ओळख आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे. मोदींनी आज बहारिनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले.
ते म्हणाले की, पुढच्या पाच वर्षात अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट करायचे भारताने ठरवले आहे. भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला तर प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल. खरेदी करण्याची क्षमता वाढेल. अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला तर प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल. खरेदी करण्याची क्षमता वाढेल, असेही ते म्हणाले. इन्फ्रास्टक्चरचे जाळे उभारण्याचे भारतामध्ये मोठे काम सुरु आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याची भारतामध्ये क्षमता आहे आणि प्लानही आहे, असेही त्यांनी सांगितले.
मोदी पुढे म्हणाले की, भारतातील बहुतांश कुटुंब बँकिंग सेवेशी जोडलेली आहेत. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट आहे. 50 कोटी भारतीयांना देशात मोफत उपचार मिळतात. आता भारतीयांचा आत्मविश्वास उंचावला आहे, असे ते म्हणाले.
बहारिनमध्ये भारतीयांनी त्यांच्या मेहनतीने स्वत:ची जागा बनवली आहे. बहारिनचे सत्ताधारी तुमचे कौतुक करत असताना अभिमानाने माझा ऊर भरुन येत होता. बहारिनला येणारा मी पहिला पंतप्रधान ठरलो हे माझे भाग्य आहे. इथे येऊन मला भारतात असल्यासारखे वाटत असल्याचे देखील ते म्हणाले. बहारिनचे न्यू इंडियामध्ये स्वागत आहे. दोन्ही देशांना परस्पराकडून भरपूर काही मिळाले आहे, असेही ते म्हणाले.
महत्वच्या घटना
१६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८२५: उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.
१९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.
१९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९१: बेलारुस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाले.
१९९१: लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.
१९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.
१९९७: दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
१९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
२००१: सरोद वादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
जन्म
१९२३: साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)
१९३०: जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता शॉन कॉनरी यांचा जन्म.
१९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर २००९)
१९४१: संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म.
१९५२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू दुलीप मेंडिस यांचा जन्म.
१९५७: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज सिकंदर बख्त यांचा जन्म.
१९६२: बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका डॉ. तस्लिमा नसरीन यांचा जन्म.
१९६५: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजीव शर्मा यांचा जन्म.
१९६९: भारतीय क्रिकेटपटू विवेक राजदान यांचा जन्म.
१९९४: भारतीय लेखक आणि कादंबरीकार काजोल आयकट यांचा जन्म.
मृत्यू
१२७०: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १२१४)
१८१९: स्कॉटिश संशोधक जेम्स वॅट यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १७३६)
१८२२: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १७३८)
१८६७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १७९१)
१९०८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८५२)
२०००: डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १९०१)
२००१: संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक डॉ. व. दि. कुलकर्णी यांचे निधन.
२००१: टायरेल रेसिंग चे संस्थापक केन टाइरेल यांचे निधन. (जन्म: ३ मे १९२४)
२००८: उर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९३१)
२०१२: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९३०)
२०१३: भारतीय गायक-गीतकार रघुनाथ पनिग्राही यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३२)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.