‘आधार’साठी बायोमेट्रिक पद्धतीने माहिती घेणे म्हणजे व्यक्तिगत गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून वैयक्तिक गोपनियता अर्थात राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
संविधानाच्या कलम २१ नुसार असलेल्या जगण्याच्या स्वातंत्र्यातच वैयक्तिक गोपनियतेचा समावेश झाला नऊ सदस्यीय खंडपीठाने सर्वसहमतीने हा निर्णय घेतला आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत, या याचिकांमध्ये आधार कार्डमुळे वैयक्तिक गोपनियतेच्या अधिकाराची पायमल्ली होत असल्याचा दावा करणारी याचिका सर्वात महत्त्वाची मानली जात होती.
रिझर्व्ह बँकेला नव्या नोटा चलनात आणण्याची परवानगी देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केल्यानंतर एक दिवसातच ही नोट आणली जात आहे.
रिझर्व्ह बँक शुक्रवारी २०० रुपयांच्या नोटेचे विमोचन करणार असून छोट्या रकमेच्या नोटांची उपलब्धता वाढावी यासाठी तेजस्वी पिवळ्या रंगातील ही नोट चलनात आणण्यात येत आहे.
महात्मा गांधी मालेतील या नोटेवर गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटले असून आरबीआय, भारत, इंडिया आणि २०० ही अक्षरे सूक्ष्म आकारात छापलेली असतील.
सुरक्षा धाग्यात भारत आणि आरबीआय लिहिलेले असेल. नोट हलविल्यास धागा हिरवा आणि निळा या रंगांत परिवर्तित होईल.
अशी असेल २०० रुपयांची नवी नोट समोरील बाजू नोट प्रकाशात धरल्यास पारदर्शक होऊन २०० हा आकडा दिसेल, देवनागरी लिपीत २०० आकड्याची प्रतिमा नोटेवर असेल. नोटेवर मध्यभागी महात्मा गांधी यांची प्रतिमा असेल, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूस हमी आणि वचनासह गव्हर्नरांची स्वाक्षरी असेल.
नोटेच्या खालच्या बाजूस उजवीकडे रंग बदलणारे रुपयाचे चिन्ह आणि २०० हा आकडा असेल. उजव्या बाजूस अशोक स्तंभाचे चिन्ह असेल, महात्मा गांधी यांचे चित्र आणि इलेक्ट्रोटाइप (२००) जलचिन्ह (वॉटरमार्क) असेल.
महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमारनं आठव्या विकेटसाठी रचलेल्या शतकी भागिदारीनं टीम इंडियासमोरचं पराभवाचं विघ्न अखेर दूर झाले असून भारतानं कॅण्डीच्या दुसऱ्या वन डेत श्रीलंकेवर तीन विकेट्सनी सनसनाटी विजय साजरा केला.
पण श्रीलंकेच्या अकिला धनंजयनं सहा विकेट्स काढून भारताची सात बाद १३१ अशी केविलवाणी अवस्था करून ठेवली होती, त्यामुळं टीम इंडियासमोर पराभवाचं संकट उभं राहिलं होतं.
५ सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली असून या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळं टीम इंडियासमोर विजयासाठी ४७ षटकांत २३१ धावांचं लक्ष्य होतं.
धोनी आणि भुवनेश्वर कुमारनं आठव्या विकेटसाठी अभेद्य शतकी भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं, त्याआधी, जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहल यांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेला ५० षटकांत आठ बाद २३६ धावांत रोखलं होतं.
४१४ कोटी रुपयांच्या या चार प्रकल्प अहवालांना राज्याचे गृहनिर्माण सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीने जून २०१७ मध्ये मंजुरी दिली होती.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ठाणे महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या सुकाणू समितीला सादर केलेल्या एकूण ४१४ कोटी रुपयांच्या ४ प्रकल्पांना बुधवारी मंजुरी मिळाली, यामुळे सर्वांसाठी घरे या योजनेला गती मिळणार असून याअंतर्गत एकूण ३ हजार घरे बांधण्यात येणार आहेत.
ठामपाने बेतवडे, म्हातर्डी आणि पडले अशा शासनाच्या जागेवर चार ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४ प्रकल्प अहवाल सादर केले होते.
या समितीच्या बुधवारी २३ आॅगस्ट २०१७ रोजी आयोजित बैठकीत मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पांना मान्यता मिळाल्याने सर्वांसाठी घरे हा प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे.
या योजनेंतर्गत बेतवडे येथे दोन प्रकल्प, म्हातर्डी आणि पडले येथे प्रत्येकी एक प्रकल्प असे एकूण चार प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. योजनेतील ४० टक्के घरे ही प्रकल्प बाधितांसाठी, ४० टक्के घरे परवडणारी घरे या योजनेखालील असणार आहेत.
मोदी सरकारचे तसे नाही, सरकारने १००० रूपयांची मदत पाठवली तर सर्व पैसे लोकांपर्यंत पोहोचतात, असे सांगून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मोदींची राजीव गांधींशी तुलना केली.
मी एका रूपयाची मदत पाठवली तर त्यामधील १५ पैसेच लोकांपर्यंत पोहचतात, असे खुद्द राजीव गांधी यांनी सांगितले होते, वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाबाबत काँग्रेसचा इतिहास काय राहिला आहे, असा सवाल उपस्थित करून त्यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
गुरूवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते, यावेळी त्यांनी गोपनीयता हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले.
न्यायालयाचा निकाल नीट समजून न घेताच आम्हाला आज सकाळपासून नागरी स्वातंत्र्याचे धडे शिकवले जात आहेत, मर्यादित निर्बंधांसह गोपनयीतेचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत हक्क असल्याची भूमिका सरकारने यापूर्वीच न्यायालयात मांडली होती.
यावेळी रविशंकर प्रसाद यांनी पुन्हा एकदा सरकारच्या आधार सक्तीच्या निर्णयाचे समर्थन केले ‘आधार’ मुळे नागरिकांच्या माहितीचे प्रमाणीकरण झाले त्यामुळे ५७ हजार कोटींची बचत झाली.
सौदी अरेबियाने त्यांच्या निताकत या कामगारविषयक धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला असून, त्यामुळे नोकरीच्या उद्देशाने सौदीमध्ये जाऊ पाहणा-या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत.
सौदी सरकारने नव्या बदलांद्वारे स्थानिकांना नोक-यांमध्ये प्राधान्य देण्याचे ठरविले आहे, सौदीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत लाखो भारतीय नोकरी करत आहेत.
तिथे २०१६ साली नोकऱ्या करणाऱ्या भारतीयांची संख्या २५ लाख होती, मात्र मागील काही महिन्यांत त्यात विविध कारणांमुळे घट झाली असून उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमधून दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण नोकरीसाठी सौदीला जात असतात.
सौदी अरेबियात १ जुलैपासून परदेशी व्यक्तीला दरमहा १०० रियाल म्हणजे सुमारे १७०० रुपये इतका कुटुंब कर लागू झाला आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवू लागले आहेत.
या करामुळे सौदीत राहण्याचा खर्च परवडणे अशक्य झाल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मोहम्मद ताहिरने दिली. ताहिर पेशाने संगणक तज्ज्ञ आहे.
जागतिक दिवस
-
जन्म/वाढदिवस
गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ : २५ ऑगस्ट १९२३
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
कार्ल बार्क्स, अमेरिकन हास्यचित्रकार. ‘डोनाल्ड डक’चे रेखाचित्रकार : २५ ऑगस्ट २०००
डॉ. व. दि. कुलकर्णी (वसंत दिगंबर कुलकर्णी), मराठी समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक : २५ ऑगस्ट २००१
ठळक घटना
गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले : २५ ऑगस्ट १६०९
न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना : २५ ऑगस्ट १७१८
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.