चालू घडामोडी - २५ एप्रिल २०१८

Date : 25 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर, सर्व्हेतून दावा :
  • नवी दिल्ली- जागतिक नकाशावर भारताने सहिष्णूचेच्या बाबतीच चौथं स्थान पटकावलं आहे. सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत कॅनडा, चीन, मलेशियानंतर भारताचा क्रमांक लागतो. इप्सॉस मॉरी यांच्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. 

  • यावर्षाच्या सुरूवातीला इप्सॉस मॉरी यांनी बीबीसीसाठी 27 देशांचा सर्व्हे केला. त्यामध्ये सुरूवातीला त्यांनी 20 हजार लोकांनाच्या मुलाखती घेतल्या. लोकांच्या मते समजाचं विभाजन करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहे? याबद्दल माहिती गोळा करण्यात आली.

  • सर्व्हेनुसार 63 टक्के भारतीय लोक विविध संस्कृती, दृष्टीकोनाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असल्याने ते  भारताला सहिष्णू देश मानतात. दुसरीकडे हंगरीमधील लोक त्यांच्या देशाला सर्वात कमी सहिष्णू देश मानतात. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्राझिलचा क्रमांक लागतो. 

  • भारतीय समाजात राजकीय विचारातील मतभेद तणावाचं कारण बनत असल्याचं 49 टक्के लोकांना वाटत असल्याचं सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 48 टक्के लोक धर्मालाही जबाबदार धरतात तर 37 टक्के लोकांना सामाजिक-आर्थिक दरी तणावाचं कारण वाटते. दुसऱ्या संस्कृतीच्या, पार्श्वभूमीच्या लोकांशी मिळून-मिसळून राहिलं की आदर व सन्मानाची भावना निर्माण होते असं 53 टक्के लोकांना वाटत असल्याचं सर्व्हेमध्ये सांगितलं आहे. 

रघुराम राजन पुन्हा गव्हर्नर होणार :
  • लंडन: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर लवकरच इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर होण्याची शक्यता आहे. राजन यांचं नाव इंग्लंडच्या गव्हर्नर पदाच्या शर्यतीत आहे. बँक ऑफ इंग्लंड ही अतिशय प्रतिष्ठित संस्था मानली जाते. इंग्लंडमधील सर्व बँकांचं नियंत्रण या बँकेकडून केलं जातं. 

  • लंडनमधील प्रमुख्य वृत्तपत्र असलेल्या फायनान्शियल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेनं नव्या गव्हर्नरचा शोध सुरू केला आहे. नवे गव्हर्नर पुढील वर्षापासून बँकेची सूत्रं हाती घेतील. सध्या मार्क कार्ने इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहात आहेत. त्यांचा कार्यकाळ जून 2019 ला संपेल. कार्ने यांनी 2013 मध्ये मध्यवर्ती बँकेची धुरा खांद्यावर घेतली होती. कार्ने यांच्या निमित्तानं गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच बँकेची जबाबदारी परदेशातील व्यक्तीकडे गेली. 

  • इंग्लंडचे अर्थमंत्री फिलिप हेमंड यांनी गव्हर्नरपदावर नव्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचे संकेत  दिले आहेत. कार्ने यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असून ती व्यक्ती परदेशीही असू शकते, असं हेमंड यांनी म्हटलं आहे. बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी रघुराम राजन यांच्यासोबतच मूळचे भारतीय असलेल्या सृष्टी वाडेरादेखील शर्यतीत आहेत.

  • मेक्सिकोच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सचे नवे व्यवस्थापक ऑस्टिन कार्स्टन्स यांच्याऐवजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना बँक ऑफ इंग्लंडची जबाबदारी दिली जाऊ शकते, असं फायनान्शियल टाईम्सनं एका लेखात म्हटलं आहे. 

आधारसाठी बारिकसारीक माहिती का लागते :
  • नवी दिल्ली : आधार कार्ड देण्यासाठी नागरिकांचा सर्व वैयक्तिक बारीकसारीक तपशील (मेटा डेटा) गोळा करण्याची काय गरज? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडिया (युआयडीएआय)ला विचारला.

  • आधारविषयीच्या याचिकांची एकत्रित सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. ए. के. सिक्री, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू आहे.

  • युआयडीएआय व गुजरात सरकारतर्फे युक्तिवाद करताना अ‍ॅड. राकेश व्दिवेदी यांनी सांगितले की, मेटा डेटा या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. त्यामुळेच आधारला विरोध केला जात आहे. युआयडीएआयकडून मर्यादित स्वरुपात नागरिकाची वैयक्तिक माहिती गोळा केला जाते.

  • युआयडीएआचे नागरिकांच्या वैयक्तिक बारीकसारीक माहितीवर इतके नियंत्रण आहे की ते तिच्या आधारे नागरिकांवर पाळतही ठेवू शकतात असाही आरोप केला जातो.

  • आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ अ‍ॅड. व्दिवेदी यांनी विदेशातील काही निवाड्यांचे दाखलेही दिले. खाजगीपणाच्या मुद्द्याबाबत काही वेळेस अपवाद करता येतो असेही ते म्हणाले. व्यक्ती या समुदायामध्ये राहतात. सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांमुळे व्यक्तिचा विकास होत असतो.

  • खाजगीपणा जपणे महत्त्वाचे असले तरी काही वेळा त्याबाबत अपवाद करण्यासाठी नियम बनविले जातात. नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी होईल ही शक्यता गृहित धरुनही आधार कायदा रद्द करण्याची मागणी करणे योग्य ठरणार नाही. आधारशी संबंधित नियमांचा ज्यांनी भंग केला आहे त्या अ‍ॅक्सिस बँक व एअरटेलला युआयडीएआयने दंड ठोठावला आहे, अशी माहितीही अ‍ॅड. व्दिवेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

‘गूगल’वर नोकरी शोधा :
  • नवी दिल्ली : कुठलीही माहिती शोधण्यासाठी आपण ‘गूगल’चा उपयोग करतो. हेच ‘गूगल’ आता नोकरीही शोधून देत आहे. खास भारतीय तरुणांसाठी गूगलने हे ‘जॉब सर्च’ इंजिन आणले आहे.

  • स्मार्ट फोनमुळे ‘गूगल’ प्रत्येकाची गरज झाले आहे. हवी ती माहिती काही सेकंदात गूगलद्वारे उपलब्ध होते. याच गूगलवर आता नोकरीची माहितीही काही सेकंदातच शोधता येते. ‘गूगल’च्या टूल बारमध्ये ‘गुगल जॉब्स’ असा सर्च देताच नोकरीचे अनेक पर्याय दिसतात. अकाऊंटंटपासून ते व्यवस्थापक, डिजिटल मार्केटिंग, सीनिअर अ‍ॅनालिस्ट्स, क्लाऊड सल्लागार, भागीदार, व्यावसायिक, सॉफ्टवेअर या २१ श्रेणीतील नोकऱ्या गूगलने उपलब्ध केल्या आहेत.

  • आपण राहत असलेल्या ठिकाणापासून २, ५, १०, ५०, १०० ते ३०० किमी अंतरावरील नोकरी शोधण्यासाठी स्वतंत्र पर्याय आहेत. तसेच देशभरात हव्या त्या ठिकाणच्या नोकरीचा शोधही घेता येतो. नोकरीचा प्रकार, कंपनी, मालक या पर्यायांद्वारेही नोकरी शोधता येते.

  • २०२० पर्यंत भारत जगातील सर्वात तरुण देश होत आहे. तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गूगलने ही सेवा सुरू केली आहे. त्यासाठी लिंक्डइन, क्विकआर जॉब्स, शाइन डॉट कॉम, मायजॉब्स डॉट कॉम या कंपन्यांकडील नोकरीची माहिती गूगलशी संलग्न केली आहे.

  • गूगलवर ‘जॉब सर्च’ करताच या अन्य वेबसाइटवरील नोकरीच्या संधी युझर्सला एकाच ठिकाणी पाहता येतात. त्यासाठी त्या-त्या वेबसाइटावर जाण्याची गरज नाही, हे या सेवेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

चीनमध्ये भारताने केली पाकिस्तानवर टीका :
  • बीजिंग : दहशतवाद्यांना पोसणाºया व त्यांना आर्थिक रसद पुरविणाºया देशांना पायबंद घातला पाहिजे. त्या देशांच्या कारवायांचा खंबीरपणे मुकाबला करायला हवा अशा शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर टीका केली. शांघाय को-आॅपरेशन आॅर्गनायझेशनने (एससीओ) आयोजिलेल्या विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मुहम्मद असीफ हेही उपस्थित होते.

  • संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन याही चीनमध्ये असून, त्यांनी चीन व भारतातील मतभेदांचे रूपांतर वादामध्ये होऊ नये असे मत व्यक्त केले. चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंघ यांची त्यांनी भेट घेतली. डोकलामच्या संदर्भात सीतारामन यांचे मत महत्त्वाचे आहे.

  • मोदी-शी भेट महत्त्वाची - पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात २७ एप्रिलपासून होणारी दोन दिवसीय बैठक ही भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी व चीनचे नेते डेंग शीआओपिंग यांच्यात १९८८साली झालेल्या बैठकीइतकीच महत्त्वाची ठरेल, असे चिनी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

  • डोकलाम प्रश्नावरून भारत व चीनमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे त्यावर नेमका काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, राजीव गांधी व डेंग शीआओपिंग यांच्या बैठकीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांना नवे वळण मिळाले होते. तसेच चित्र यावेळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील :
  • मुंबई : बहुप्रतिक्षीत मुंबईचा विकास आराखडा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी मुंबई डीपी प्लॅन 2034 च्या छाननी समिती अहवालाला हिरवा कंदील दाखवला. समितीकडून या नव्या डीपी प्लॅनची घोषणा आज मंत्रालयात होण्याची शक्यता आहे.

  • मुंबईचा डीपी प्लॅन खुल्या जागेचं आरक्षण, शाळा आणि बागेचे भूखंड, हेरिटेज वास्तू वगळण्यात येणं, खाजगी भूखंडांवरुन सार्वजनिक रस्ते अशा विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे त्याचा अंतिम आराखडा तयार होण्यास विलंब होत होता.

  • मुंबई डीपी प्लॅन 2034 ची काही वैशिष्ट्ये :- मुंबईत परवडणाऱ्या घरांना (Affordable housing) जागा उपलब्ध करण्यासाठी  'नो डेव्हलपमेंट झोन'चं आरक्षण हटवण्यात येणार

  • मुंबईत कमर्शियल FSI वाढवण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिक बांधकामांना प्रोत्साहन मिळणार असून रोजगार वाढीसाठी याचा फायदा होईल.

  • डीपी प्लॅनमध्ये पहिल्यांदाच मुंबईच्या प्रत्येक वॉर्डत सामाजिक आरक्षण (Social reservation) ठेवण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये वृद्धाश्रमे, महिलांसाठी हॉस्टेल्स, सुलभ शौचालये यासाठी राखीव जागा ठेवण्याचा विचार करण्यात आला आहे.

  • मुंबईतल्या अनाधिकृत फेरीवाल्यांची समस्या लक्षात घेता मोबाईल हॉकिंग झोन किंवा फिरते फेरीवाले क्षेत्र निर्माण करण्यावर भर असणार आहे. मुंबईतल्या नाईट लाईफला चालना देण्यासाठी हा निर्णय पोषक ठरु शकतो.

  • मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित आरेमधल्या 33 हेक्टर जागेवरचं 'नो डेव्हलपमेंट झोन' आरक्षण हटवण्यात आलं होतं. मात्र ग्रीन झोनचं आरक्षण सर्वत्र आरेमध्ये कायम ठेवण्याची काही पर्यावरण संस्था आणि शिवसेनेची मागणी होती. मात्र नव्या डीपी प्लॅनमध्ये आरक्षण हटवण्यावर शिक्कामोर्तब झालं असून मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिनविशेष :
  • जागतिक मलेरिया दिन

महत्वाच्या घटना

  • १८५९: सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.

  • १९०१: स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.

  • १९५३: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.

  • १९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

  • १९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.

  • १९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.

  • २०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.

  • २०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.

जन्म

  • १२१४: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)

  • १८७४: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९३७)

  • १९१८: हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३)

  • १९४०: हॉलिवूडमधील अभिनेते अल पचिनो यांचा जन्म.

  • १९६१: अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.

  • १९६१: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.

  • १९६४: भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.

मृत्यू

  • १९९९: साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.

  • २००२: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९९)

  • २००३: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)

  • २००५: भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.