चालू घडामोडी - २४ सप्टेंबर २०१७

Date : 25 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पेट्रोल आणि डिझेलवरील करांमध्ये कपात केली जाणार नाही : धर्मेंद्र प्रधान
  • आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर पुढील काही दिवसांमध्ये दर घसरतील आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घट होईल, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले.

  • पेट्रोल आणि डिझेलवरील करांमध्ये कपात केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील भरमसाठ कर कायम राहणार आहेत अमेरिकेत आलेल्या वादळामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, असे अजब तर्कटही त्यांनी मांडले.

  • ‘येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घट होईल, अशी अपेक्षा आहे,’ असे प्रधान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.

  • ‘अमेरिकेत आलेल्या वादळामुळे इंधनाचे दर वाढले असून हे संकट दूर झाल्यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, मागील दोन दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये १० पैशांची घटही झाली असून दिवसांमध्ये हे दर आणखी कमी होतील,’ असेही त्यांनी  म्हटले.

सुषमा स्वराज आम्ही शास्त्रज्ञ घडवले तर पाकनं दहशतवादी : 
  • दहशतवादाला खतपाणी घालणारा, देश म्हणून जगात कोणता देश असेल, तर तो पाकिस्तान आहे मागील ७० वर्षांमध्ये भारताने विकास साधला आहे.

  • पाकिस्तानने दहशतवादी संघटना, जिहादी आणि दहशतवादी तयार केले असं म्हणत केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील मंचावरून खडेबोल सुनावलेत.

  • आपल्या २२ मिनिटांच्या भाषणात सुषमा स्वराज पाकिस्तानवर ६ मिनिटे बोलल्या यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत स्वराज यांचं स्वागत केलं.

  • सुषमा स्वराज म्हणाल्या की, पाकिस्तानने आम्हाला मानवाधिकाराबद्दल शिकवू नये कारण पाकिस्तानने स्वत: क्रौर्याच्या सर्व सीमा पार केल्या असून पाकिस्तानने स्वत: आत्मचिंतन केलं पाहिजे.

  • पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, एकीकडे भारताला सर्व जगाकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाशक्ती म्हणून गौरवलं जातं आहे तर दुसरीकडे पाकिस्तानची ओळख दहशतवाद्यांचा कारखाना म्हणून होते.

  • त्या पुढे म्हणाल्या की, भारताने आयआयटी, आयआयएम आणि एम्ससारख्या संस्था उभारल्या पाकिस्तानाने एलईटी, जेईएम, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि हक्कानी सारख्या दहशतवादी संघटनांच्या गटांना नेहमी पोसलं आहे.

आॅनलाइन फेस्टिवल आॅफर्सची धूम शॉपिंगसाठी :
  • मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तु व कपडे, चपला, बुट यांपासून चॉकलेट्स व मिठाई व स्कूटर्स-बाइकपर्यंत सर्व वस्तू तिथे अतिशय स्वस्त असल्याने तिथे न वळणा-या ग्राहकांचा ओढा आॅनलाइन शॉपिंगकडे वाढत आहे.

  • सध्या सर्वत्र आॅनलाइन शॉपिंगची धूम सुरू असून, ई कॉमर्स कंपन्यांच्या आॅफर्समुळे खरेदीने भलताच जोर धरला असून सर्व ई कॉमर्स कंपन्यांचे सध्या सेल सुरू असून, काही वस्तू तर पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा कमी दराने उपलब्ध आहेत.

  • या कंपन्यांनी दोन दिवसांपूर्वी सेल जाहीर केले आणि त्या पाहून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडत असतानाही अनेकांनी खरेदी सुरू केली आहे या कंपन्यांचे सेल उद्या, रविवारपर्यंत असून, शेवटच्या दिवशी तिथे झुंबडच उडेल, असे दिसते.

  • या कंपन्या दिवाळीच्या आधी पुन्हा नव्या सवलती व सेलसह ग्राहकांसमोर येणार असून त्यावेळी याच्या चौपट व्यवसाय होण्याचा दावा आहे, नवरात्रौत्सव झाल्यापासून तीन दिवसांत काही हजार कोटींची आॅनलाइन खरेदी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जीएसटी ट्रांझिशन क्रेडिट ५ हजार कंपन्यांकडून मागितला खुलासा :
  • जुलै महिन्याच्या वस्तू व सेवाकरात ट्रांझिशन क्रेडिटचा दावा करणा-या ५ हजार कंपन्यांकडून कर अधिका-यांनी खुलासा मागितला असून खुलासा मागवण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये बीएसई-५०० यादीतील बड्या वस्तू उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.

  • उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क बोर्डाने ११ सप्टेंबर रोजी मुख्य थेट कर आयुक्तांना पत्रे पाठवून १ कोटीपेक्षा जास्त ट्रांझिशन क्रेडिटचा दावा करणा-या कंपन्यांच्या कराची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

  • वाहनांचे सुटे भाग बनविणा-या हरयाणातील एका कंपनीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, कंपनीच्या मुख्य वित्त अधिका-याने अथवा वित्त विभागातील वरिष्ठ कार्यकारीने कर विभागात येऊन इनपुट टॅक्स क्रेडिटच्या आकड्याचे स्पष्टीकरण द्यावे.

  • दावा करण्यात आलेले इनपुट क्रेडिटचे आकडे कसे ठरविले गेले याचे स्पष्टीकरण कर विभागास हवे आहे, आकड्यांचा तपशील सादर केला गेला नाही, तर करविषयक नोटीस बजावली जाईल, असा इशारा अधिकाºयांनी दिला आहे.

  • जीएसटी लागू होण्यापूर्वीच्या वस्तूंच्या साठ्यावर ट्रांझिशन क्रेडिट मिळविण्याची सवलत कंपन्यांना देण्यात आली असून हे टॅक्स क्रेडिट आहे.

  • जीएसटीअंतर्गत भरण्यात आलेल्या करावर हे क्रेडिट कंपन्या मागू शकतील कंपन्यांचा दावा योग्य असल्यास भरण्यात आलेल्या कराची रक्कम कंपन्यांना परत मिळते.

आज तिसरा वन-डे होळकर स्टेडियमवर :
  • वेगवान तसेच फिरकी मा-याचा सुरेख संगम साधून पहिले दोन सामने जिंकणा-या भारतीय संघाने येथील होळकर स्टेडियमवर आज रविवारी पुन्हा आॅस्ट्रेलियाला धूळ चारून मालिका विजयासह नंबर वन होण्याचे लक्ष्य आखले आहे.

  • भारताने चेन्नईत पावसाच्या व्यत्ययात पहिला सामना डकवर्थ-लुईस नियमानुसार २६ धावांनी तसेच कमी धावसंख्या नोंदविल्यानंतर ईडनवर दुसरा सामना ५० धावांनी जिंकल्यानंतर तिस-या सामन्यातही पाहुण्यांना धक्का देत मालिका खिशात घालण्याचा कोहली अ‍ॅण्ड कंपनीचा इरादा आहे.

  • होळकर स्टेडियम तसेही भारतासाठी ‘लकी’ असून येथे भारताने अद्याप नाणेफेकही गमावली नाही आणि सामनादेखील गमावला नाही.

  • पावसाच्या व्यत्ययाचा अंदाज वगळल्यास सर्वच बाबी भारतासाठी जमेच्या ठरत असून आॅस्ट्रेलिया संघ कधीही मुसंडी मारून मालिकेत चुरस आणू शकतो, हे ध्यानात ठेवूनच आत्ममुग्ध न होता भारतीयांनी लढतीला सामोरे जायला हवे.

  • होळकर मैदानावर विजय मिळाल्यास वन-डेत भारत पुन्हा नंबर वन बनेल आहे, कसोटीत नंबर वन असलेला भारतीय संघ द. आफ्रिकेपाठोपाठ वन-डेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. 

दिनविशेष :

जन्म /वाढदिवस

  • इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म : २४ सप्टेंबर १९४०

  • लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म : २४ सप्टेंबर १९२१

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन 

  • बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे याचं निधन : २४ सप्टेंबर १९९८

  • लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी याचं निधन : २४ सप्टेंबर २००२

ठळक घटना

  • होंडा मोटार कंपनीची स्थापना : २४ सप्टेंबर १९४८

  • मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत : २४ सप्टेंबर १९९५

  • कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली टी-२० विश्वकप जिंकला : २४ सप्टेंबर २००७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.