लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासासाठी ‘आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या’ अशी नवी सेवा सुरु करण्याचं रेल्वेनं ठरविले असून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर तिकिट मिळणार आहे.
डिजिटल पेमेंट स्विकार करणारी ही पहिली सरकारी वेबसाइट आता पूर्णपणे कॅशलेस झाली आहे.
जून महिन्याच्या सुरूवातीला रेल्वेकडून नव्या सुविधेविषयी माहिती देण्यात आली होती. या सुविधेत प्रवासाच्या पाच दिवस आधी तिकिट बुकिंग केल्यानंतर त्या तिकिटाचे पैसे १४ दिवसानंतर देता येणार आहेत. या सेवेसाठी प्रवाशाकडून ३.५ टक्के सेवाकर घेतला जाईल.
या सुविधेसाठी आयआरसीटीसीने मुंबईतील ‘ई-पेलॅटर’ या कंपनीशी सहकार्य करार केला आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
आयआरसीटीसीच्या या सुविधेमुळे तिकिट बुकिंगच्या वेळी तात्काळ पैसे देण्याची प्रवाशांना आता काळजी करावी लागणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौ-यासाठी रवाना झाले आहेत. या दौ-यादरम्यान ते पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँडला भेट देणार आहेत.
नियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. जवळपास ५ तासांची ही भेट असणार असल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही नेते दुपारी ३.३० वाजता भेटतील त्यानंतर मीडियासाठी काही वेळ दिला जाणार आहे.
त्यानंतर प्रतिनिधी पातळी स्तरावरील चर्चा होईल, त्यानंतर आदरातिथ्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे.
या दिवसाचा शेवट रात्री व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभानं होणार आहे. दरम्यान मोदी अमेरिका दौ-यावर जाणारे पहिले परदेशी नेते आहेत जे ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणार आहेत.
१९८४ मध्ये देशातील पहिली मेट्रो धावल्यानंतर कोलकाताने मिळवलेले हे दुसरे महत्वाचे यश आहे.
कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या टीमने ज्यामध्ये परदेशातील अभियंत्यांचाही समावेश आहे, त्यांनी हे अंडरवॉटर टनलचे काम पुर्ण केले आहे'', अशी माहिती कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार यांनी दिली आहे.
हुगली नदीखाली सुरु असलेले बोगद्याचे काम पुर्ण झाले असून लवकरच या मार्गावरुन मेट्रो धावताना दिसणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे.
कोलकातामध्ये ही मेट्रो धावताना दिसणार आहे. या बोगद्याच्या माध्यमातून हावडा आणि कोलकाताला मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. या मार्गावर नदीखालून धावणारी मेट्रो पाहायला मिळणार आहे.
कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या मार्गाचे बंधकाम केले आहे. ''या कामगिरीसोबतच भारत काही ठराविक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
दिव्यांगांना संगणकीय अपंगत्वाचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे, यासाठी राज्यात मिशन 'झीरो पेंडन्सी' अभियान सुरू करणार आहे, तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विशेष महाविद्यालय स्थापन करण्याचा विचार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
राज्यातील दिव्यांगाना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, अंपग वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश डिंगळे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे, डॉ. समीर दलवाई, डॉ. अंजली जोशी आदी या वेळी उपस्थित होते.
अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशदा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित 'आत्ममग्नता जाणीव जागृती कार्यशाळे'चे उद्घाटन बडोले यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त लंडन मराठी संमेलन २०१७ थाटामाटात साजरा करण्यात आला. यात 'महाराष्ट्र मंडळ लंडन' च्या विश्वस्त समितीचे आणि सभासदांचे विशेष आभार मानण्यात आले.
महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र मंडळ लंडनच्या 85व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त, लंडन मराठी संमेलन २०१७ आजोजित करण्यात आले होते.
लंडन मराठी संमेलन (एलएमएस २०१७) ची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने सुरुवात झाली ज्याच्यात १५० होऊन अधिक उद्योजक वेगवेगळ्या देशातून उपस्थित होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये कशी कामगिरी करतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.
भारत विरूद्ध वेस्ट इंडिजमधील पहिला एकदिवसीय सामना अखेर पावसामुळे रद्द झाला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकीच्या जोरावर ३९ ओव्हर्समध्ये ३ विकेट १९९ धावा केले असून नंतर सामन्यामध्ये पावसानं व्यत्यय आणल्यानं उर्वरित सामना होऊ शकला नाही.
पण पहिल्याच सामन्यात पावसाची एंट्री झाल्यानं चाहत्यांची मात्र निराशा झाली.
जन्म, वाढदिवस
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म : २४ जून १८६३
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
आशियातील पहिले ध्वनी वेगी विमान भारतात तयार झाले : २४ जून १९६१
लंडन येथील सेंट थॉमस र्ग्नालयात पारिचारिका प्रशिक्षणाला सुरुवात झाली : २४ जून १८६०
ठळक घटना
आशियातील पहिले ध्वनी वेगी विमान भारतात तयार झाले : २४ जून १९६१
लंडन येथील सेंट थॉमस र्ग्नालयात पारिचारिका प्रशिक्षणाला सुरुवात झाली : २४ जून १८६०
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.