देशभरातील वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुढील वर्षापासून सर्व भाषांमध्ये एकसारख्याच असतील व त्यात भाषेगणिक वेगवेगळे प्रश्न असणार नाहीत.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले की, सन २०१८ पासून ‘नीट’ परीक्षेच्या इंग्रजीखेरीज इतर भाषांमधील प्रश्नपत्रिका वेगळ््या असणार नाहीत तर त्या मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे फक्त साधे, सरळ भाषांतर असेल.
यंदाच्या ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदीमध्ये एकसारखी होती.
इतर भाषांमधील प्रश्नपत्रिकांमध्ये त्याहून वेगळे आणि काही ठिकाणी अधिक कठीण प्रश्न होते. यावरून वाद झाला होता व मद्रास उच्च न्यायालयाने यावरून निकालास अंतिम स्थगिती दिली होती.
सरकारी हॉस्पिटलमध्ये रूग्णांची संख्या ही नेहमी जास्त असते त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला वाचवणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तेथिल डॉक्टर काम करत असतात.
बऱ्याचदा रूग्णांचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळत नाही, असं असतानाही विविध मुद्द्यावर प्रबोधन करण्याचं काम हे डॉक्टरांकडून केलं जातं.
यामधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अवयवदान करणं. हॉस्पिटल्समध्ये अनेक रुग्ण हे ब्रेनडेड अवस्थेमध्ये असूनही त्यांचं अवयवदान करायला नातेवाईक तयार नसतात.
पण मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये रविवारी पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाच्या नातेवाईकांच्या संमतीने प्रत्यारोपणासाठी अवयवदान करण्यात आलं.
जळगावातील राजेश महाजन यांनी आपली पत्नी संगीता हिचं अवयवदान केलं' राजेश हे १० वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता.
इस्रोचे माजी अध्यक्ष प्रोफेसर उडुपी रामचंद्र राव (यू.आर. राव) यांचे निधन झाले आहे. ते ८५ वर्षाचे होते, प्रोफेसर राव यांनी १९७२ साली भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदारी घेतली होती.
उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म कर्नाटकातील अदमारू या खेडेगावात १० मार्च १९३२ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता.
प्रोफेसर राव यांचा आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने प्रतिष्ठित 'द २०१६ आईएएफ हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश केला होता.
२०१३ मध्ये वॉशिंग्टन येथे 'सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल' या संस्थेत समावेश झालेले ते पहिले भारतीय आहेत.
१९८४ ते १९९४ या काळात त्यांनी देशाच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले असून दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते.
'आर्यभट्ट'नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली 'भास्कर', 'अॅपल', 'रोहिणी', 'इन्सॅट' आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध २६ जुलैपासून प्रारंभ होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी दुखापग्रस्त कर्णधार दिनेश चंदीमलच्या स्थानी अष्टपैलू धनंजय डिसिल्वाचा समावेश केला आहे.
दुखापतीमुळे चंदीमल पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे, श्रीलंकेने फिरकीपटू मालिंदा पुष्पकुमार व वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप यांना संघात स्थान दिले आहे.
संघ : रंगना हेराथ (कर्णधार), उपुल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, कुसाल मेंडिस, अँजेलो मॅथ्युज, असेला गुणरत्ने, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्वा, धनुष्का गुणतिलक, दिलरुवान परेरा, सुरंगा लखमल, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, मालिंदा पुष्पकुमार आणि नुवान प्रदीप.
शिर्डी आणि पंढरपूर संस्थांचे अध्यक्षपद युतीमध्ये भाजपाकडे असून, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेच्या कोट्यात आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे असून 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले बांदेकर यांचे नाव ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुचवले होते.
भाजपा-शिवसेना आघाडीचे सरकार येऊन पावणेतीन वर्षे झाली; तरी सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेला काही कायदेशीर अडचणींमुळे मिळू शकलेले नव्हते. बांदेकर यांच्या नियुक्तीने तो मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय संघातील १५ खेळाडूंपैकी १० क्रिकेटपटू रेल्वेत आहेत. त्यात कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांचादेखील समावेश आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय महिला वर्ल्डकप संघातील जे खेळाडू रेल्वेत आहेत अशांसाठी पदोन्नतीची घोषणा केली आहे.
तसेच वेळेआधी पदोन्नती देण्याशिवाय या क्रिकेटपटूंना रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
मिताली राज आणि हरमनप्रीत यांच्यासह रेल्वेत असणाऱ्या एकता बिष्ट, पूनम राऊत, वेदा कृष्णमूर्ती, पूनम यादव, सुषमा वर्मा, मोना मेश्राम, राजेश्वरी गायकवाड आणि नुजहत परवीन या भारतीय संघात आहेत.
अनेक देश आपली सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी घातक शस्त्रास्त्रांची निर्मिती करत असून यंदाच्या वर्षी रशिया आणि चीन या दोन देशांनी अनेक घातक शस्त्रास्त्रांची निर्मिती केली.
चीनने स्वदेशी बनावटीचे फायटर जेट, अत्याधुनिक पाणबुडी, विमानवाहू युद्धनौकेचा आपल्या ताफ्यात समावेश केला.
रशियानेही वेगवेगळया क्षेपणास्त्र चाचण्या केल्या. पण अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर, अमेरिका या स्पर्धेत सर्वात पुढे आहे.
अमेरिकेने असे शस्त्रास्त्र बनवले आहे की, त्याच्या पल्ल्यातून काहीही सुटू शकत नाही, अमेरिकेने मागच्या सात महिन्यात या शस्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.
लॉजला विकसित करण्यासाठी तब्बल २६० कोटी रुपये खर्च झाला आहे. या क्षेपणास्त्रातून सोडल्या जाणा-या प्रत्येक लेजर किरणावर ६५ रुपये म्हणजे १ डॉलरचा खर्च येतो.
जागतिक दिवस
बाल दिन : व्हानुआतु.
जन्म, वाढदिवस
अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती : २४ जुलै ४५
फ्रीडरिक शॉटकी, जर्मन गणितज्ञ : २४ जुलै १८५१
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
मार्टिन व्हॅन ब्युरेन, अमेरिकेचा ८ वा राष्ट्राध्यक्ष : २४ जुलै १८६२
पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती : २४ जुलै १९७०
ठळक घटना
सफल चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले : २४ जुलै १९६९
लान्स आर्मस्ट्रॉँगने आपली सातवी टुर दि फ्रांस ही सायकलशर्यत जिंकली : २४ जुलै २००५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.