दावोस/ स्वित्झर्लंड : “1997 च्या तुलनेत भारताचा जीडीपी सहा पटीने वाढला आहे. तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा मिळाल्याने हा विकासदर साध्य करता आल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. तसेच, जगापुढे आज शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातील विविध देशातील प्रतिनिधिंना संबोधित केलं.
तीन दिवसाच्या या परिषदेत जगभरातील 350 राजकीय नेते, 60 पेक्षा अधिक देशाचे प्रमुख, जगातल्या महत्त्वाच्या कंपन्यांचे सीईओ, आणि विविध क्षेत्रातील एक हजार पेक्षा अधिक नेते सहभागी झाले आहेत.
या बैठकीचं उद्घाटन केल्यानंतर, जगभरातील प्रतिनिधिंना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी जगासमोरील आव्हानं, आणि त्यावरचे उपाय यावर विस्तृत विश्लेषण केलं. “भारताने नेहमी वसुधैव कुटुंबकम यावर विश्वास ठेवला. याचा अर्थ संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे. पण आज जगातील नैसर्गिक साधनसंपत्तीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही स्थिती अतिशय चिंतेची आहे,” असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
तसेच, आज जगासमोर पर्यावरण बदल, ग्लोबल वॉर्मिंग, अतिवृष्टी, हिवाळ्यात निच्चांकी तापमानाची नोंद ही मोठी संकटं आहेच. पण या संकटावर मात करण्यासाठी किती विकसनशील देश एकमेकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवाय, इंटरनेटचं वाढतं जाळं हे ग्लोबल फ्लोद्वारे अनेक संधी उपलब्ध करुन देत असलं, तरी यातून अनेक आव्हानंही निर्माण होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.(source :abpmajha)
क्विन्सटाउन : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या युवा (19 वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी इंग्लंडवर 31 धावांनी मात केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो युवा लेगस्पिनर लॉइड पोप.
त्याने केलेली कामगिरी 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमधील आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली. त्याच्या या कामगिरीनंतर क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाला नवा शेन वॉर्न मिळाल्याची चर्चा आहे. पोपची शैली महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाचा नवा शेन वॉर्नही म्हटलं जातं आहे.
क्विन्सटाउन येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर केवळ 33.3 षटकांत कांगारूंचा संघ 127 धावांमध्ये गारद झाला. 128 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीविरांनी 7.2 षटकांमध्ये 47 धावा फटकावल्या होत्या. इंग्लंड हा सामना सहज खिशात घालेल असं वाटत असतानाच लेगस्पिनर लॉइड पोप याने पुढच्याच चेंडूवर पहिला बळी मिळवला.
त्यानंतर एकामागोमाग एक 8 विकेट घेत त्याने इंग्लंडचं पार कंबरडं मोडलं. त्याच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचा अक्खा संघ 23.4 षटकातच अवघ्या 96 धावांवर ऑल आउट झाला आणि ऑस्ट्रेलियाने 31 धावांनी विजय मिळवला. पोपने 8 विकेट घेऊन संघाला विजय मिळवून दिला तसंच वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाकडून हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरलं.
नवी दिल्ली - भारतातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच जगातील टॉप कंपन्यांच्या सीईओंचा एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये भारतानं जपानला मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. जगात गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांची एक यादी तयार करण्यात आली असून या यादीत अमेरिकेने पहिले स्थान पटकावले आहे.
चीन या यादीत दुसऱ्या स्थानी असून जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. तर युरोप चौथ्या तर भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. ‘प्राईसवॉटर हाऊस कुपर्स’ या संस्थेने एक अहवाल तयार केला आहे. जगभरातील टॉप कंपन्यांच्या सीईओंची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारत उद्योगस्नेही देश असल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे. जगातील परदेशी गुंतवणुकासाठी फेव्हरेट डेस्टिनेशन कोणते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. अमेरिकेत गुंतवणुकीसाठी पुरेशा संधी आहेत, असे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी अनेक सीईओंनी पसंती दर्शवली आहे.
दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येही मोदींकडून ‘मेक इन इंडिया’चा प्रसार केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडणार आहेत. दावोस येथे कालपासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 48 व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली.
गेल्या 20 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी या परिषदेला हजर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. दावोसमध्ये पोहोचल्यावर मोदींनी जागतिक कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा केली. भारतातील गुंतवणुकीबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिली. भारत हा गुंतवणुकीसाठी पोषक आणि उद्योगस्नेही देश आहे, याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मोदींनी केला.
मुंबई - नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी एक गुड न्यूज आहे. यावर्षी जॉबच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील असे संकेत मिळत आहेत. मोठया बिझनेस स्कूलमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून ज्या ऑफर्स मिळतात त्यामध्ये ब-यापैकी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. टॅलेंटेड उमेदवारांना परदेशात प्लेसमेंट आणि मोठया पगाराच्या ऑफर्स मिळत आहेत.
मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती करणा-या आयटी क्षेत्राला मागच्यावर्षी मरगळ आली होती. यंदा मात्र आयटीमध्ये मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे. आयटी क्षेत्रात दोन लाख नोक-यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे. एमडीआय, एसपीजेआयएमआर आणि आयआयएफटी या प्लेसमेंट कंपन्यांनुसार यंदा नोक-यांच्या जास्त संधी निर्माण झाल्या आहेत.
गुडगावच्या एमडीआय प्लेसमेंट कंपनीने सांगितले कि, यंदा 119 कंपन्यांमध्ये बॅचमधील सर्वांनाच नोकरी मिळाली. मागच्यावर्षी 143 कंपन्या आल्या होत्या पण अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. नोकरीबरोबर उमेदवारांना घसघशीत पगारही मिळत आहे.
मुंबई : सर्व श्रमिक संघाचे नेते, स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते यशवंत चव्हाण यांचे मंगळवारी सकाळी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले, ते ९७ वर्षांचे होते. पार्थिवावर मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा माधव, दोन नातवंडे निमिषा व जॉय असा परिवार आहे.
पुण्यातील रत्न रुग्णालयात सकाळी निधन झाल्यानंतर, पार्थिव अंत्यदर्शनासाठी दादरच्या ‘श्रमिक’ येथे ठेवण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पावर यांच्यासह अनेक राजकीय व कामगार नेत्यांनी त्यांना अखेरचा लाल सलाम केला.
यशवंत चव्हाण यांनी सर्व श्रमिक संघाची स्थापना केली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९४२ साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस. के. लिमये, भाऊ फाटक आणि लक्ष्मण मेस्त्री यांच्यासह त्यांना पक्षाबाहेर पडावे लागले. त्यानंतर, १९६५ साली भाकपमध्ये फूट पडल्यावर त्यांनी लाल निशाण पक्षाची स्थापनाही केली.
मात्र, तब्बल ७५ वर्षांनंतर मतभेदांना तिलांजली देत, वयाच्या ९६व्या वर्षी सहकाºयांसमवेत १८ आॅगस्टला वरळीच्या आदर्शनगर येथील डॉ. खरूडे सभागृहातील विशेष कार्यक्रमात पक्ष व कार्यकर्त्यांसह भाकपमध्ये प्रवेश केला.
देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडविलेले संविधान आतून पोखरण्याचे काम सुरू आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व पुरोगामी, डाव्या, आंबेडकरवादी पक्ष-संघटना संघर्ष आणि प्रबोधनाचे काम करत आहेत. ही एकजूट, श्रमिकांच्या चळवळीला प्रेरणादायी ठरत असताना, चव्हाण यांच्या जाण्याने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शहीदांच्या कुटुंबियांसाठी एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. या कुटुंबियांसाठी मंत्रालयाने ‘भारत के वीर’ या नावाने एक वेबसाइट सुरु केली असून त्याव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वेबसाइटच्या माध्यमातून नागरिकांना दान कऱण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. त्याला सर्व स्तरातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून हजारो जणांनी त्यासाठी तयारी दर्शवली आहे.
नुकतेच या वेबसाइटसाठी एक गीत तयार करण्यात आले. त्याच्या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होता. या कार्यक्रमादरम्याने त्यानेही नागरिकांना शहीदांच्या कुटुंबियांना मदत कऱण्याचे आवाहन केल्यावर अवघ्या एका तासाच्या आत जवळपास १३ कोटींचा निधी जमा झाला आहे.
या वेबसाइटच्या गीताचे उद्घाटन तीन मूर्ती भवनमध्ये आयोजित सोहळ्यात गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू, हंसराज अहिर, अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते. यावेळी बोलताना अक्षय कुमारने जास्तीत जास्त लोकांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन उपस्थितांना केले आणि या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला.
अवघ्या तासाभरात १२.९३ कोटी रुपये मदतनिधीमध्ये जमा झाले. आपल्या आवाहनाला लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आपल्या ट्विटर हँडलवरुन मदत करणाऱ्या सर्वांचे कौतुक करत आभार मानले. यामध्ये अतिशय उत्तम उपक्रमाबद्दल गृहमंत्री राजनाथ सिंह यांचेही त्याने विशेष आभार मानले.
महत्वाच्या घटना
१९६५: दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)
१९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९)
२००५: गोवा मुक्तिसंग्राम अनुताई लिमये यांचे निधन.
२०११: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)
जन्म
१९२४: तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००० – मुंबई)
१९२४: मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१)
१९४३: हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक सुभाष घई यांचा जन्म.
मृत्यू
१९६५: दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)
१९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९)
२००५: गोवा मुक्तिसंग्राम अनुताई लिमये यांचे निधन.
२०११: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.