जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखलं जाणारं अॅमेझॉन पर्जन्यवनात भयंकर वणवा पसरला आहे. मागील तीन आठवड्यांपासून हा वणवा धगधगत असून त्याने रौद्ररुप धारण केलं आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या या अॅमेझॉनच्या जंगलामध्ये दहा हजारहून अधिक जागी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत आतापर्यंत हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाले आहेत. या आगीमुळे सर्वाधिक नुकसान ब्राझीलमध्ये झाले असून तेथील २ हजार ७०० किमीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे.
अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन म्हणजेच नैसर्गिक रेन फॉरेस्ट आहे. या जंगलांमध्ये वर्षातील १२ महिने पाऊस पडतो. ही जंगले इतकी घनदाट आहेत की येथे अनेक ठिकाणी सूर्यकिरणे जमीनीपर्यंत पोहचत नाहीत. जगभरातील वनस्पतींपासून तयार होणाऱ्या एकूण ऑक्सिनपैकी २० टक्के ऑक्सिजन या जंगलांच्या माध्यमातून निर्माण होतो.
पृथ्वीवरील ऑक्सिजनचा नैसर्गिक समतोल कायम ठेवण्यासाठी या जंगलांचा मोलाचा वाटा आहे. मात्र आता या जंगलांच्या अस्तित्वालाच या भीषण वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे. जंगलामधील अनेक पक्षी आणि प्राणी जळून खाक झाल्याचे अनेक हृदद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये असून यावेळी त्यांच्यासमोर भारतीयांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केल्याचं चित्र पहायला मिळालं. नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणेशोत्सव लवकरच येत असल्याचा उल्लेख करत गणेशोत्सवात फ्रान्स मिनी इंडिया होतो असं सांगत भारतीयांचं फ्रान्सशी असणारं नातं सागितलं. काही दिवसांनी आपल्याला पॅरिसमध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष ऐकू येईल असं म्हणताच उपस्थित भारतीयांनी जयघोष करण्यास सुरुवात केली.
“गणेशोसत्व पॅरिसच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेचा भाग असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. यादिवशी पॅरिस मिनी इंडिया असल्यासारखा दिसतो. याचा अर्थ एक दिवशी आपल्याला पॅरिसमध्येही गणपती बाप्पा मोऱ्याचा जयघोष ऐकू येईल”, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. यावेळी नरेंद्र मोदींनी भारतीयांना जन्माष्टमीच्याही शुभेच्छा दिल्या.
आज नव्या भारतात भ्रष्टाचार, कुटुंबवाद, भाऊ-पुतण्या वाद, जनतेच्या पैशांची लूट, दहशतवाद या गोष्टींना स्थान नाही. ज्याप्रकारे या गोष्टींना थांबवलं जात आहे ते आधी कधीच झालेलं नाही. नव्या भारतात थकणं आणि थांबण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. “नवं सरकार येऊन जास्त दिवस झालेले नाहीत, फक्त ७५ दिवस झालेले आहेत. १०० दिवसही पूर्ण झालेले नाहीत. या काळात सेलिब्रेशन सुरु असतं. आम्ही मात्र त्या भानगडीत पडलेलो नाही. योग्य धोरणं आणि दिशेने जात आम्ही एकामागोमाग एक मोठे निर्णय घेतले”, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
यावेळी नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्यावरही भाष्य केलं. “तिहेरी तलाक एक अमानवीय कृत्य होतं. पण आम्ही ते संपवून टाकलं. महिलेचा सन्मान करणं गरजेचं आहे. तिहेरी तलाक रद्द केल्यामुळे मिळालेले करोडो महिलांचे आशिर्वाद भारताचं भलं कऱणार आहेत. नव्या भारतात मुस्लिम महिलांसोबत होणारा अन्याय कसा स्विकार केला असता”, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या अमेरिकेबरोबरच्या संयुक्त कवायतीत सहभाग घेतला. दोन्ही देशांतील सागरी सुरक्षा दलांमध्ये सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा हेतू त्यात आहे.
तटरक्षक दलाची जहाजे व विमानांनी बंगालच्या उप सागरातील या कवायतीत प्रात्यक्षिके केली. भारताच्या बाजूने आयसीजी शौर्य व आयसीजडी अभीक ही जहाजे व चेतक हेलिकॉप्टर या सरावात सहभागी झाले होते.
सागरी चाचेगिरीविरोधातील उपायांचा अभ्यास व प्रात्यक्षिकांचा यात समावेश होता. अमेरिकेचे स्ट्रॅटॉन हे जहाज व एक विमान प्रात्यक्षिक व सरावात सहभागी होते.
शुक्रवारी सकाळी सात वाजता सराव व प्रात्यक्षिकास सुरुवात झाली. स्ट्रॅटन या अमेरिकी जहाजाची ही पहिली भारत भेट होती. चेन्नई बंदरानजीक सागरात या संयुक्त कवायती घेण्यात आल्यानंतर आता अमेरिकेचे हे जहाज २७ ऑगस्टला परत जाणार आहे. त्यापूर्वी भारत व अमेरिका यांच्या अधिकाऱ्यांत संवादही होईल.
लोकसभा निवडणुकीत भाजपला नवभारताच्या उभारणीसाठी जनादेश मिळाला असून आमच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार, वशिलेबाजी, लोकांच्या पैशांची लूट, दहशतवाद या सर्व बाबींना कधी नव्हे एवढा आळा घालण्यात यश आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतीय जनसमुदायापुढे बोलताना सांगितले.
युनेस्को मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी यांनी तिहेरी तलाकवर घातलेल्या बंदीसह दुसऱ्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख केला.
कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना त्यांनी सांगितले,की अस्थायी गोष्टींना भारतात स्थान नाही. महात्मा गांधी, गौतम बुद्ध, राम, कृष्ण यांच्या भूमीला जे अस्थायी होते ते काढून टाकण्यास ७० वर्षे लागली, यावर हसावे की रडावे समजत नाही. सुधारणा, कामगिरी व स्थित्यंतर यातूनच देश वेगवेगळी उद्दिष्टे गाठू शकेल.
मोदी हे तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समध्ये आले आहेत. भारत केवळ मोदींमुळे पुढे चाललेला नाही, तर मतदारांनी दिलेल्या जनादेशामुळे प्रगती करीत आहे,असे त्यांनी सांगताच गर्दीतून ‘मोदी है तो मुमकीन है’च्या घोषणा देण्यात आल्या. नवभारतात भ्रष्टाचार, वशिलेबाजी, घराणेशाही, लोकांच्या पैशाची लूट व दहशतवाद याला कधी नव्हे इतका लगाम बसला असल्याचा दावा त्यांनी केला.
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना आता निती आयोगाच्या उपाध्यक्षांनीच अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे. मागील 70 वर्षातील देशातील अर्थव्यवस्थेचा सर्वात कठीण काळ सध्या सुरु असल्याचं निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे
आर्थिक मंदीमुळे देशातील अनेक उद्योग सध्या कठीण प्रसंगाला समोर जात आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील लाखो कामगारांना नोकरी गमवावी लागणार असं चित्र सध्या आहे. अर्थव्यवस्थेच्या या बिकट स्थितीवर आता निती आयोगाच्या उपाध्यक्षांनी भाष्य केले आहे. गेल्या 70 वर्षातील देशातील अर्थव्यवस्थेचा सर्वात कठीण काळ सध्या सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "मागच्या 70 वर्षात देशात इतका चलन तुटवडा पहिल्यांदाच झाला असून सरकारनं परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेत महत्वाची पावलं उचलणं आवश्यक आहे, असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.
सध्या देश आर्थिक मंदीच्या सावटाखाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अतिशय महत्वाचं मानलं जात आहे.
राजीव कुमार यांच्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. 'सरकारच्या आर्थिक सल्लागारांनीच आता अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट असल्याचे मान्य केले आहे', असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.
आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन
महत्वाच्या घटना
१६०८: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.
१६९०: कोलकाता शहराची स्थापना.
१८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
१८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
१९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.
१९३६: ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.
१९६६: रशियाचे लुना-११ हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.
१९६६: विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९९१: युक्रेन सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९९५: मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
जन्म
१८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)
१८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७)
१८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)
१८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९५७)
१८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)
१९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)
१९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.
१९१८: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
१९२७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांचा जन्म.
१९२७: भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म.
१९२९: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)
१९३२: व्यासंगी साहित्यसमीक्षक रावसाहेब जाधव यांचा जन्म.
१९४४: ओडीसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचा जन्म. (मृत्यू: २४ जून १९९७)
१९४५: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक विन्स मॅकमेहन यांचा जन्म.
१९४७: ब्राझीलियन लेखक पाउलो कोएलो यांचा जन्म.
मृत्यू
१९२५: संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८३७)
१९६७: कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक हेन्री जे. कैसर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८२)
१९९३: क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू दि. ब. देवधर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८९२)
२०००: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचे निधन. (जन्म: ३० जून १९२८)
२००८: चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.