नोटाबंदीच्या अनावश्यक निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला असल्याचे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले असून तांत्रिक आणि आर्थिकदृष्या नोटाबंदीची अजिबात आवश्यक नव्हती, असेही त्यांनी म्हटले.
काही लॅटिन अमेरिकेन देशांचा अपवाद वगळता नोटाबंदीचा निर्णय जगभरात कुठेही यशस्वी ठरलेला नाही, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
‘नोटाबंदीचा निर्णय घेण्याची गरज होती, असे मला वाटत नसून हा साहसी निर्णय घेण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती,’ असे मनमोहन सिंग इंडियन स्कूल ऑफ बिझनेस लीडरशिप समीटमध्ये बोलताना म्हणाले.
नोटाबंदीचा निर्णय योग्य होता का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला सिंग यांनी उत्तर दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला.
त्यामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या असून तब्बल ८६ टक्के नोटा चलनातून रद्द झाल्याने देशात अभूतपूर्व चलनकल्लोळ निर्माण झाला होता.
भारतातला सर्वात स्वस्त 4G मोबाईल आज ग्राहकांच्या हाती पडणार असून ज्या ग्राहकांनी दीड हजार रुपयांचं डिपॉझिट भरुन मोबाईलचं आधी बुकिंग केलं होतं, त्यांना आज मोबाईल मिळण्याची शक्यता आहे.
मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला असून केवळ १५०० रुपये अनामत रक्कम भरल्यानंतर रिलायन्सकडून हा मोबाईल दिला जाणार असून विशेष म्हणजे, हे पैसे तीन वर्षांनंतर त्या ग्राहकाला परत देण्याचं आश्वासनही कंपनीतर्फे देण्यात आलं आहे.
म्हणजेच हा 4G फोन अगदी मोफत मिळणार असून जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे.
जिओने १५३ रुपयांचा प्लॅन लाँच केला असून जिओ फोनवर अवघ्या १५३ रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड 4G डेटा मिळणार असून व्हॉईस कॉलिंग, व्हॉईस मेसेज, व्हिडिओ कॉलिंग, इयरफोनशिवाय एफएम ऐकण्याची सुविधा या फोनमध्ये आहे.
हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल, या 4G VoLTE फीचर फोनमध्ये २.४ इंच आकाराची स्क्रीन असेल ५१२ MB रॅम, ४ GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, २ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, 2000mAh क्षमतेची बॅटरी, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.
नागपूर महापालिकेतर्फे रेशीमबाग मैदानावर उभारण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण व कवी सुरेश भट यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण २२ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.
नागपूरचा विकास गतीने होत असून गडकरी व फडणवीस हे दोन्ही नेते त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल उपस्थित होते.
नागपूर स्मार्ट सिटी होणार असून शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार या सर्वच क्षेत्रात नागपूरचा विकास होत आहे, देशाचे हृदयस्थान असलेल्या या शहरात देशाच्या विकासाचे केंद्र होण्याची क्षमता आहे, अशा शब्दात राष्ट्रपती कोविंद यांनी नागपूरचे महत्त्व अधोरेखित केले.
जगभरात सर्वाधिक वापरले जाणा-या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंतांचा बादशाह बिल गेट्स यांना आता एका गोष्टीचा पश्चाताप होतोय.
ती गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर-लॅपटॉपच्या की-बोर्डवर असलेला एक ऑप्शन आहे. कंट्रोल+अल्ट+डिलीट हे तीन बटन एकत्र दाबल्यानंतर कॉम्प्युटर-लॅपटॉप रिस्टार्ट केले जायचे, आता त्यात टास्क मॅनेजर हा ऑप्शन आला आहे.
तोच ऑप्शन आता उतार वयात बिल गेट्सला खटकू लागले असून हावर्ड विद्यापीठात ब्लूमबर्गच्या माध्यमातून एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.
या चर्चासत्रासाठी अनेक अब्जोपतींसह उद्योगपतींना निमंत्रण देण्यात आलं होतं, श्रीमंतांचा बादशाह असलेले बिल गेट्सही स्वतःच्या फाऊंडेशनचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
चर्चेदरम्यान डेव्हिड यांनी बिल यांना प्रश्न विचारला, बिल, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, खरं तर हा प्रश्न मी आधीच विचारायला हवा होता.
तुम्ही कॉम्प्युटर-लॅपटॉप रिस्टार्ट करण्यासाठी CTRL-Alt-Delete या बटनांचा का वापर केला, त्यावर बिल यांनी डेव्हिड यांच्याकडे खंत व्यक्त केली.
दुबईमध्ये स्थिरावलेल्या मराठीजनांनी व्हॅल्यू मॅनेज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश शुक्ल यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली असून दुबईत स्थिरावलेल्या मराठीजनांनी ‘लोकमत’चे स्वागत केले आणि छोटेखानी समारंभ आयोजित करून पाठीवर कौतुकाची थाप दिली.
माणूस कितीही दूर असला, तरी आपली माती, नाती आणि माणसांमधील अंतर कधीच दूर होत नसून याचा सुखद अनुभव लोकमत वृत्तपत्र समूहातील चमूला दुबई भेटीत आला.
ह.भ.प. अॅड. जयवंतराव बोधले महाराज यांच्या माध्यमातून लोकमत चमू आणि दुबईतील मराठीजन एकत्र आले आणि १८ सप्टेंबरच्या सायंकाळी स्नेहसोहळा पार पडला.
लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांनी दुबईत स्थिरावूनही आपली मराठमोळी संस्कृती जपत, महाराष्ट मंडळाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मराठीजनांचे या वेळी कौतुक केले.
‘लोकमत’चे व्हाइस प्रेसिडेंट वसंत आवारे यांनी ‘लोकमत’ हा महाराष्ट्राचा मानबिंदू असून येथील दुबईकरही महाराष्ट्राचे मानबिंदू असल्याचे सांगितले.
एक लाख प्रतींच्या खपाचा विक्रम नोंदविणारे आणि त्याबद्दलचे प्रमाणपत्र राज्यपालांच्या हातून मिळालेला ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ म्हणजे, महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा असल्याची भावनाही आवारे यांनी बोलून दाखविली.
रेस्टॉरंट तर तुम्ही खूप पाहिली असतील अथवा त्याबद्दल तुम्ही ऐकून असाल पण आता जमिनीवरबरोबरच पाण्यातील आणि पाण्याखालील रेस्टॉरंटची माहिती पुढे येत आहे.
पण, तुम्ही असे रेस्टॉरंट पाहिले आहे काय जे हवेत आहे. बेल्जियममधील हे रेस्टॉरंट चक्क हवेत असून नेहमीची गर्दी, ट्राफिक आणि आजूबाजूचा गोंगाट याला कंटाळलेले आणि वेगळा अनुभव घेऊ इच्छिणारे लोक या रेस्टॉरंटमध्ये येतात.
हवेत सेट केलेल्या या खुर्च्यांवर एका वेळी २२ जण बसू शकतात, आपली खुर्ची जागेवर पूर्णत: फिरवू शकतात या रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक दिवसाचे वेगळे दर आहेत.
सायंकाळी ४ ते ७ या वेळेत जेवणासाठी १०९ पाउंड आकारले जात असून शुक्रवार, शनिवारसाठी प्रत्येकी १७५ पाउंड आकारले जातात.
जन्म /वाढदिवस
प्रा. भालबा केळकर - प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक, लेखक : २३ सप्टेंबर १९२०
डॉ. अभय बंग : २३ सप्टेंबर १९५०
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :
भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार : २३ सप्टेंबर १९६४
गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते : २३ सप्टेंबर १९९९
ठळक घटना
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली : २३ सप्टेंबर १८७३
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.