केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले १० टक्के आरक्षण व राज्य सरकारच्या कायद्यानुसार शैक्षणिक व सामाजिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) अमलात आलेले १२ टक्के आरक्षण यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्याचा विचार करून राज्यातील सर्वच शिक्षण संस्थांमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जागा वाढविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.
या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली एक सचिव समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व शिक्षण संस्थांमध्ये सध्या असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या जागा किती आहेत, वाढीव आरक्षणामुळे त्या किती कमी होतात, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किती शिल्लक राहतात व किती जागा वाढविणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर त्यावर शासनस्तरावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.
राज्य सरकारने गेल्या वर्षी मराठा समाजासाठी शिक्षण व शासकीय सेवेत १६ टक्के आरक्षण लागू करण्याचा कायदा केला. परंतु उच्च न्यायालयाने शिक्षणात १२ टक्के व सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय दिला. त्यानुसार आता शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी १२ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. त्याचबरोबर केंद्र सरकारनेही सर्वच समाजातील आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
राज्यात याआधी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांना ५२ टक्के आरक्षण आहे. त्यानुसार या वर्षी शिक्षण संस्थांमध्ये एकूण आरक्षण ७४ टक्के लागू झाले. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जागा कमी झाल्या. परिणामी या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यातून वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधील असंतोष आणखी वाढू नये, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आता राज्य सरकारने त्यांच्यासाठी जागा वाढविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती समान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड यांनी दिली.
नागपूर : जगभरातील एकूण वाघांपैकी ५६ टक्के वाघ भारतात असले तरी वाघांच्या शिकारीचे सर्वाधिक प्रमाणदेखील भारतातच आहे. व्याघ्र अवयवांच्या जप्तीच्या एकूण घटनांपैकी सुमारे ४०.५ टक्के घटना या भारतातील आहेत. वन्यप्राणी आणि वनस्पतींवर काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘ट्रॅफिक’ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
२००० ते २०१८ या १८ वर्षांच्या काळात जगभरातील ३२ देशांतून दोन हजार ३५९ वाघांच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले. यात प्रामुख्याने हाडे, कातडी याचा समावेश आहे. यापैकी एक हजार ८६ घटना या १३ आशियाई देशातील आहेत. या तेरा देशात दरवर्षी सरासरी ६० जप्तीच्या घटना नोंदवण्यात आल्या. वाघाव्यतिरिक्त अस्वल आणि हत्तीचे अवयव देखील मोठय़ा प्रमाणावर जप्त करण्यात आले. दरवर्षी सुमारे ५८ वाघांची शिकार त्याच्या कातडीसाठी केली जाते. २०१६ पासून हे प्रमाण अधिक वाढले आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत सरासरी वार्षिक ४४ टक्क्य़ांपासून ते ७३ टक्क्य़ांपर्यंत हे प्रमाण वाढले आहे.
वाघांच्या अवयवांच्या तस्करी प्रकरणात एकूण किती आरोपींना पकडण्यात आले आणि त्यापैकी किती आरोपींना शिक्षा झाली याची पूर्ण आकडेवारी नाही. मात्र, अहवालानुसार ५९१ प्रकरणांत सुमारे एक हजार १६७ आरोपींना अटक करण्यात आली. यातील ३८ टक्क्य़ांपेक्षाही अधिक आरोपी भारतातील आहेत. भारतानंतर इंडोनेशिया आणि चीनचा नंबर आहे. अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींपैकी २५९ आरोपींवर तिन्ही देशात खटला चालवण्यात आला. यातील १७.४ टक्के आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.
भारतात वाघांची संख्या अधिक असल्यामुळे शिकारीचे प्रमाणही अधिक आहे. मात्र, वन्यजीवविषयक कडक कायदेही भारतात आहेत. गेल्या एक-दीड दशकात व्याघ्र संरक्षणाचे प्रयत्नही वाढले आहेत. २००८ साली भारतात वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापन करण्यात आल्यानंतर वाघ्र अवयवांच्या तस्करीची प्रकरणे उघडकीस आली असून अनेक मोठय़ा तस्करांना अटक करण्यात आली आहे.
अमरावती हा पुराचा धोका असलेला परिसर असल्याचे दाखवून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकार राज्याची राजधानी अन्यत्र हलविण्याचा कट रचत असल्याचा आरोप तेलुगु देसमने केला आहे. मात्र वायएसआर काँग्रेसने हा आरोप सपशेल फेटाळला आहे.
तेलुगु देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केल्याने राजधानीच्या शहराच्या विकासाबद्दल सरकारच्या हेतूबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने नवा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
तथापि, राजधानी अन्यत्र हलविण्यात येणार असल्याच्या आरोपाचा वायएसआर काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अंबाती रामबाबू यांनी इन्कार केला आहे. राजधानी अन्यत्र हलविण्याबाबत आम्ही कधीही वक्तव्य केलेले नाही. आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात आम्ही अमरावतीला विरोध केला नाही अथवा मान्यताही दिलेली नाही, असे रामबाबू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अमरावती हा पुराचा धोका असलेला परिसर आहे आणि तो पाण्याखाली जाऊ नये यासाठी अनेक कालवे आणि बंधारे बांधावे लागतील, असे वक्तव्य मंगळवारी महापालिका प्रशासनमंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.
अमरावतीमधील जमिनीचा प्रकार पाहता तेथे बांधकामाचा खर्च नेहमीपेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडेल, असेही सत्यनारायण म्हणाले होते. त्यावर चंद्राबाबू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना मोठ्या नाट्यानंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. त्यानंतर आता त्यांच्या संपत्तीबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. चिदंबरम यांच्याकडे केवळ देशातच नाही तर परदेशातही कोट्यवधींची संपत्ती आहे. एफडी आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हेदेखील तब्बल 8.6 कोटी रूपये आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी घोषित केल्याप्रमाणे त्यांच्याकडे सध्या 175 कोटी रूपयांची संपत्ती आहे.
चिदंबरम आणि त्यांच्या पत्नीकडे तब्बल 95 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आपल्यावर 5 कोटी रूपयांचे कर्ज आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर कार्ती चिदंबरम यांच्याकडेही 80 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न 9.75 कोटी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, चिदंबरम यांनी अन्य संस्थांमध्ये 25 कोटी जमा आहेत आणि त्यांच्याकडे पाच लाखांची रोकडही असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्याकडे 13.47 कोटी रुपयांचे शेअर्स, डिबेंचर्स आबेत. तर काही योजनांमध्येही त्यांनी 35 लाखांची गुंतवणूक केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्याकडे दहा लाखांच्या विमा, 85 लाखांचे दागिने आणि 27 लाखांच्या गाड्या, ब्रिटनमध्ये 1.5 कोटी, 7 कोटींची शेतजमीन, 45 लाखांच्या व्यवसायिक इमापकी आणि 32 कोटी रूपयांची घरे आहे.
पी. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांच्याकडे परदेशात 25 संपत्ती असल्याची माहितीही सीबीआयकडून देण्यात आली. तसेच ही संपत्ती कंपनीच्या नावावर खरेदी करण्यात आल्याचेही सीबीआयच्या वकीलांनी सांगितलं. त्याचप्रमाणे ईडीने आतापर्यंत त्यांची 54 कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये भारत, ब्रिटन आणि स्पेनमधील संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये तामिळनाडूतील शेतजमीन, दिल्लीतील बंगला, ब्रिटनमधील कॉटेज आणि घर, स्पेनमधील टेनिस क्लब, चेन्नईच्या बँकेतील एफडीचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन
महत्वाच्या घटना
१८३९: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
१९१४: पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४२: मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग.
१९४२: दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू.
१९६६: लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
१९९०: आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९९१: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
१९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
२००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
२०११: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.
जन्म
१७५४: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १७९३)
१८५२: भारतीय वैद्य आणि दानकर्ते राधा गोबिंद कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१८)
१८७२: भारतीय वकील आणि राजकारणी तांगुतरी प्रकाशम यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९५७)
१८९०: न्यूज-डे चे सहसंस्थापक हॅरी फ्रँक गग्नेहॅम यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७१)
१९१८: श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा धालगल सिंधुदुर्ग येथे जन्म. (मृत्यू: १४ मार्च २०१०)
१९४४: चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांचा जन्म.
१९५१: जॉर्डनची राणी नूर यांचा जन्म.
१९७३: मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा खान यांचा जन्म.
मृत्यू
१३६३: डहाण राजवटीचे संस्थापक चेन ओंलियांग यांचे निधन.
१८०६: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचे निधन. (जन्म: १४ जून १७३६)
१८९२: ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८२७)
१९७१: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४)
१९७४: मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १८९७)
१९७५: नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते पं. विनायकराव पटवर्धन यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १८९८)
१९९४: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९४०)
१९९७: ग्रेनाडा चे पहिले पंतप्रधान एरिक गेयरी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९२२)
२०१३: आर.जे. कॉमन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक रिचर्ड जे. कॉर्मन यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९५५)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.