रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब रेल्वे म्हणून ओळखली जाते. मॉस्को ते व्लादिवोस्तोक असा हा मार्ग तब्बल ९२८९ किलोमीटरचा म्हणजेच ५७७२ मैल लांब आहे. हा प्रवास सात दिवसांचा म्हणजे १५२ तासांचा आहे.
त्या रेल्वेचं काम १९ व्या शतकात सुरू झालं होतं आणि त्या रेल्वेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी तेव्हा विशेष मंत्र्याची नेमणूक करण्यात आली होती. पहिल्या आणि दुसºया महायुद्धाच्या काळात या रेल्वेचा प्रचंड उपयोग झाला. आता त्या रेल्वेने खूप कमी स्थानिक लोक प्रवासी करतात. पण पर्यटकांना मात्र ही रेल्वे आजही भुरळ घालते.
दरवर्षी या मार्गावरून तब्बल २ लाख कन्टेनर्स ये-जा करतात. आपल्याला अनेक देशांविषयी फारशी माहितीही नसते. त्यातही आपण अमेरिकेबद्दल जितकी माहिती करून घेतो वा ती आपल्याला मिळते, तितकी रशियाविषयी मात्र नसते. अनेक काळपर्यंत तेथील माहिती मिळतही नसे.
कम्युनिस्ट राजवट असलेल्या आणि पोलादी पडद्यात सारे काही जणू लपून ठेवल्याप्रमाणे असलेल्या या देशाची माहिती सहजपणे मिळतही नसे. पण रशिया हा एकमेव देश आहे की ज्याच्या सीमा तब्बल १४ देशांशी जोडल्या गेल्या आहेत.
नॉर्वे, लाटविया, अॅस्टोनिया, लिथवेनिया, चीन बेलारुस, अझरबैजान, पोलंड, मंगोलिया, उत्तर कोरिया, कजाकिस्तान, यूक्रेन, जॉर्जिया, फिनलँड हे ते देश आहेत. (source : lokmat)
मुंबई : डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटना इत्यादींची आठवण करुन देणाऱ्या गूगलने आज अशा व्यक्तीचं डूडल तयार केलं आहे, ज्या व्यक्तीने भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे. ती व्यक्ती म्हणजे, डॉ. रखमाबाई राऊत.
मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत. ज्या काळात महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते, अशा काळात रखमाबाई राऊत यांनी परिस्थितींवर मात करुन यशाचं शिखर गाठलं.
रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला. रखमाबाई यांच्या आईचा बालविवाह झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी रखमाबाईंच्या आईचं म्हणजे जयंतीबाईंचं लग्न झालं होतं, 15 व्या वर्षी रखमाबाईंच्या रुपाने मुलगी झाली आणि 17 व्या वर्षी त्यांचा पती म्हणजे रखाबाईंच्या वडिलांचे निधन झाले.
अवघ्या 17 व्या वर्षी जयंतीबाई विधवा झाल्या आणि रखमाबाईंच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. पुढे जयंतीबाईंनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरं लग्न केलं. (source : abpmajha)
मुंबई : भारतीयांचे ‘ब्रेन ड्रेन’(विद्वत्ता) देशाबाहेर जात असल्याचा विषय अनेकदा चर्चेत आला असला तरी आता भारतीयांच्या बुद्धिमत्ता व विद्वत्तेवर प्रतिष्ठेच्या आयएमडी जागतिक सर्वेक्षण अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे. जागतिक टॅलेंटमध्ये भारत क्रमांक ५४ वरून ५१ वर आला आहे.
‘आयएमडी वर्ल्ड टॅलेंट’ अहवालानुसार भारतीय टॅलेंट २०१३ पासून सातत्याने सुधारत आहे. भारताचा क्रमांक २०१४ मध्ये केवळ एका पायरीने खाली आला होता. त्यानंतर ५६, मागील वर्षी ५४ व आता ५१ वर आला आहे.
आयएमडीने ६३ देशांची शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक व विकास, शिक्षणाची माहिती व शिक्षणासाठीची तयारी अशा तीन मुख्य श्रेणीत सर्वेक्षण केले. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक व विकास श्रेणीत भारताची स्थिती अद्याप बिकटच असून, त्यामध्ये क्रमांक ६२ वा आहे. शिक्षणासंबंधी माहितीमध्ये ४३ वा तर शिक्षणासाठीच्या तयारी श्रेणीत २९ वा क्रमांक आहे.
एकूण क्रमवारीत भारतीय टॅलेंट ६३ देशांमध्ये ५१ व्या स्थानी आहे. भारतात शिक्षणावर जीडीपीच्या तीन टक्के गुंतवणूक होत असून त्याची क्रमवारी ५८ वी आहे. भारतात प्रत्येक विद्यार्थ्यावर जीडीपीच्या १६.८ टक्के खर्च होत असून, त्यात भारत ४५ व्या स्थानी आहे.
‘ब्रिक्स’ देशांत चौथे स्थान जागतिक स्थिती सुधारली असली तरी ‘ब्रिक्स’ देशांत भारत अद्यापही चौथ्या स्थानी आहे. यात चीन ४०, रशिया ४३, दक्षिण आफ्रिका ४८ व्या स्थानी आहे. ब्राझिल भारताच्या मागे ५२ व्या स्थानी आहे. (source : lokmat)
नवी दिल्ली : पतीने तीन वेळा ‘तलाक’ असे म्हणून पत्नीला तत्काळ घटस्फोट देण्याची मुस्लीम समाजात प्रचलित असलेली प्रथा हा कायद्याने गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करणारे एक विधेयक सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याआधीच तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तसा कायदा करण्यासाठी हे विधेयक आणण्याची सरकारची तयारी सुरू आहे.
केवळ सर्वोच्च न्यायालयाने असा तलाक घटनाबाह्य ठरवून चालणार नाही. जोपर्यंत तसा कायदा होत नाही, तोपर्यंत पोलीस त्याविषयीच्या तक्रारींबद्दल कारवाईच करू शकणार नाहीत. त्यामुळेच त्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
माहीतगार सूत्रांनुसार अशा कायद्याच्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी मंत्र्यांची एक समिती नेमण्यात आली असून हा मसुदा लवकरच सरकारला सादर केला जाणे अपेक्षित आहे.
बंगळुरू: स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगची सेवा देण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केवळ रिलायन्स जिओचं नाव येत होतं. मात्र, आता रिलायन्स जिओलाही टक्कर देत एका नव्या स्टार्टअप कंपनीने सर्वच टेलीकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे.
बंगळुरू येथील वाय-फाय डब्बा नावाची ही कंपनी अत्यंत स्वस्त दरात इंटरनेट सेवा पुरवत आहे. 'भारतात अजूनही इंटरनेट महाग आहे, जिओ लॉन्च झाल्यापासून इंटरनेटच्या किंमती कमी झाल्यात तरीही भारतात किंमती जास्त आहेत.
त्यामुळे इंटरनेट अजून कमी दरात पुरवणं शक्य आहे, अत्यंत स्वस्त दरात इंटरनेट सेवा पुरवण्याचं आमचं लक्ष्य आहे', असं अवघ्या एका वर्षाच्या या कंपनीचं म्हणणं आहे.
वाय-फाय डब्बा ही कंपनी केवळ दोन रूपयात 100 एमबी डेटा, 10 रूपयात 500 एमबी डेटा आणि अवघ्या 20 रूपयात तब्बल 1 जीबी डेटा पुरवत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 तासासाठी आहे. दुसरीकडे जिओ 19 रूपयात 150 एमबी डेटा आणि 52 रूपयात 1.05 जीबी डेटा पुरवते.
महत्वाच्या घटना
१८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.
१९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.
१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.
१९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.
१९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.
१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू.
२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
जन्म
१८०८: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८९२)
१८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)
१८८५: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९५१)
१९०९: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)
१९१३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)
१९१५: चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)
१९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.
१९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.
१९६७: टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म.
१९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.
१९८०: नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.
मृत्य
१९०२: जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)
१९२०: कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.
१९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. (जन्म: २९ मे १९१७)
१९८०: हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती मे वेस्ट यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)
२०००: अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२)
२००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.
२०१६: भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.