चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ जुलै २०१९

Date : 22 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
माणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेलीफिश कॅमेरात कैद :
  • इंग्लंडच्या कार्नविलमध्ये दीड मीटर लांब माणसाच्या उंची एवढी जेली फिश आढळली आहे. पाण्यात खोलवर डायव्हिंग करताना ही जेली फिश टिव्ही प्रेझेंटर लिजीने पाहिलं. लिजीनुसार, त्याने पहिल्यांदाच इतकी मोठी जेली फिश पाहिली.

  • मरिन एक्सपर्टनुसार, ही जेली फिश अशी प्रजाती आहे, जी आकाराने सर्वात मोठी असते. याला बॅरेल जेलीफिशही म्हणतात. ही खासकरून ब्रिटनमध्ये आढळते. या जेली फिशचं वजन ४५ किलोग्रॅमपर्यंत असेल आणि रूंदी साधारण ९० सेंटीमीटरपर्यंत असेल.

  • बॅरेल जेली फिश ही सर्वात जास्त ब्रिटनच्या कॉर्नविलमध्ये आढळतात गेल्या १५ वर्षांच्या तुलनेत गेल्या काही दिवसांमध्ये या फिश कॉनवेलमध्ये अनेकदा बघायला मिळाल्या. मात्र, ब्रिटन आढळलेला हा पहिला मोठा समुद्री जीव नाहीये. याआधी ८ फुटाची १३३ किलो वजनी शार्क पोर्टलँडमध्ये आढळली होती. जी ग्रेट व्हाइट शार्कची एक प्रजाती होती.

  • मरिन एक्सपर्टनुसार, बॅरेल जेली फिशचे स्टींग फार कमजोर असतात, त्यामुळे ती मनुष्याला अधिक नुकसान पोहचवू शकत नाही. ही फिश समुद्रातील फार छोट्या जिवांना खाते. ही फिश उन्हाळ्यात ब्रिटनच्या तटावर बघायला मिळते.

  • ही जेली फिश अशी प्रजाती आहे, जी आकाराने सर्वात मोठी असते. याला बॅरेल जेलीफिशही म्हणतात. ही खासकरून ब्रिटनमध्ये आढळते.

रेल्वे अ‍ॅपवर लवकरच मोफत टीव्ही शो, चित्रपट, बातम्या :
  • नवी दिल्ली : रेल्वेची स्थानकांवर वाट पाहणारे किंवा रेल्वेतून जाणारे प्रवासी यांना लवकरच रेल्वेतर्फे विकसित करण्यात येणाऱ्या मोफत अ‍ॅपमुळे रेकॉर्ड केलेले मनोरंजन तसेच वृत्तविषयक कार्यक्रम मोफत पाहता येतील.

  • या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे काम रेल्वे बोर्डाने रेलटेल कॉर्पोरेशनकडे सोपविले आहे. आवडत्या हिंदी मालिका असोत वा रात्री वृत्तवाहिनींवरून प्रसारित होणाºया चर्चा त्या गोष्टी रेल्वे प्रवाशांना पाहता येतील. या अ‍ॅपच्या वापरामुळे रेल्वेला जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूलही मिळण्याची शक्यता आहे. देशभरातील १६०० रेल्वेस्थानकांवर याआधीच वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, उर्वरित ४७०० स्थानकांवर हे काम येत्या आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलवर विविध दूरचित्रवाहिन्यांच्या मालिका, चित्रपट, गाणी, आध्यात्मिक कार्यक्रम, बातम्या, विविध घडामोडींवर वृत्तवाहिन्यांवरून होणाºया चर्चा हे सारे काही रेल्वे प्रवाशांना पाहता येईल.

  • हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी झोनल रेल्वे विभागांकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांना ती पेलता न आल्याने आता ते काम रेलटेल कॉर्पोरेशनकडे सोपविले आहे. तशी माहिती रेल्वे बोर्डाने ११ जुलै रोजी काढलेल्या एका आदेशात देण्यात आली आहे. रेलटेलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष पुनीत चावला यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी रेलटेललाच रेल्वे बोर्डाने प्राधान्य दिले आहे. आता या कामासाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू होईल. देशातील विविध विमानतळांनी आपल्या प्रवाशांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्वत:चे एफएम चॅनल सुरू केले. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांची आवडनिवड लक्षात घेऊन रेलटेल कॉर्पोरेशन या अ‍ॅपद्वारे त्यांना मोफत कार्यक्रम दाखविणार आहे.

  • रेल्वे प्रवाशांना आपल्या मोबाईलवर विविध कार्यक्रम बघण्याची इच्छा असते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानदृष्ट्या रेल्वे यंत्रणा मागे राहू नये म्हणूनही त्याकरिता नवे अ‍ॅप रेलटेलकडून विकसित करण्यात येत आहे. मागणी तसा पुरवठा करण्याचे धोरण अवलंबायला पाहिजे.

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदींकडून खास शुभेच्छा, म्हणाले :
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक, धडाडीचे नेते आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्रात विकासाची नवी उंची गाठली. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरीबांच्या विकासासाठीही चांगले काम केले आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु आहे. त्या वादातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही त्यांनी हजेरी लावली होती.

  • लोकसभा निवडणुकीच्या आधी राम मंदिराचा मुद्दा पुढे आपली वेगळी ताकद निर्माण करणाऱ्याच्या प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबतही शिष्टाई करत युती केली. या त्यांच्या सगळ्या राजकीय कौशल्याचे कौतुक याआधीही झाले आहे. आता त्यांच्या वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देवेंद्र फडणीस हे धडाडीचे नेते आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

देशात सहा महिन्यांत केवळ ३९,८४० परवडणाऱ्या घरांची निर्मिती :
  • केंद्र सरकारने विविध योजनांतर्गत प्राप्तिकरव जीएसटीत (वस्तू व सेवा कर) सवलती दिलेल्या परवडणाऱ्या घरांची निर्मिती या वर्षांतील पहिल्या सहा महिन्यात केवळ २९ टक्के असल्याचे अ‍ॅनारॉक या मालमत्ता सल्लागार कंपनीने म्हटले आहे. सहा महिन्यात एकूण १.४ लाख घरांची निर्मिती झाली  असून यातील ३९८४० घरे ही परवडणाऱ्या घराच्या व्याख्येत बसतात.

  • सरकारने परवडणाऱ्या म्हणजे ४५ लाख रूपये किंमतीच्या घरांवर अनेक सवलती दिल्या आहेत. अर्थसंकस्पात या घरांसाठी घेतलेल्या कर्जाच्या  व्याजात आणखी एक १.५ लाखांची वजावट दिल्याने गृहकर्जावरील एकूण वजावट ३.५ लाखांची झाली होती. परवडणारी घरे जर निर्मितीच्या अवस्थेत असतील तर त्यांच्यावरील वस्तू व सेवा कर केवळ एक टक्का ठेवण्यात आला आहे. यातील घरांच्या ग्राहकांना सरकार व्याज अनुदान देत आहे. अ‍ॅनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, फार थोडे विकसक हे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करतात.

  • २०१९ मधील पहिल्या सहा महिन्यात सात मोठय़ा शहरात एकूण १३९४९० घरे बांधण्यात आली आहेत, त्यातील केवळ ३९८४० घरे ही परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत बसतात. सरकारने अर्थसंकल्पात परवडणाऱ्या घरांवरील व्याजाच्या परतफेडीत आणखी दीड लाखांची वजावट दिली असून आता एकूण वजावट ३.५ लाख आहे. यात हे गृहकर्ज मार्च २०२० पर्यंत घेतलेले असणे आवश्यक आहे. ४५ लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या व ६० चौरस मीटर चटई क्षेत्र किंवा ८५० चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या घरांना परवडणारी घरे म्हणतात. शहरी भारतात १.९० कोटी घरांची कमतरता असून त्यातील आर्थिक दुर्बल व कमी उत्पन्न गटातील लोकांसाठीच्या घरांची एकूण कमतरता ९६ टक्के आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९०८: देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.

  • १९३१: फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला.

  • १९३३: विली पोस्ट या वैमानिकाने ७ दिवस १८ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळेत विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.

  • १९४२: वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.

  • १९४४: पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.

  • १९४६: इर्गुनया दहशतवादी संघटनेने जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्ब हल्ला केला. त्यात ९० ठार.

  • १९७७: चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.

  • १९९३: वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले.

  • २००१: जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प याने ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत ३ मि. ४०.१७ सेकंदांत जिंकली.

जन्म 

  • १८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्तावलुडविग हर्ट्झ यांचा जन्म.

  • १८९८: शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)

  • १९१५: भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि राजनयिक शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २०००)

  • १९२३: हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथूर तथा मुकेश यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६)

  • १९२५: पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म.

  • १९३७: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर २०११)

  • १९७०: महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म.

  • १९९२: अमेरिकन गायक व अभिनेत्री सेलेना गोमेझ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५४०: हंगेरीचा राजा जॉन झापोल्या यांचे निधन.

  • १८२६: इटालियन खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे पियाझी यांचे निधन.

  • १९१८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८९८)

  • १९८४: साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ यांचे निधन.

  • १९९५: इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)

  • २००३: सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९६५)

  • २००३: सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचे निधन. (जन्म: १७ मे १९६६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.