चालू घडामोडी - २२ जुलै २०१७

Date : 22 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आनंदची नजर विश्वचषक स्पर्धेवर :
  • अमेरिकत सेंट लुईमध्ये आयोजित स्पर्धेपूर्वी ४७ वर्षीय आनंद काही कालावधीसाठी विश्रांती घेत असून अमेरिकेत आयोजित या स्पर्धेत सर्वांची नजर महान बुद्धिबळपटू गॅरी कास्परोव्हवर राहणार आहे.

  • माजी विश्वचॅम्पियन विश्वनाथन आनंदबाबत सध्या निवृत्तीच्या चर्चा रंगत आहेत; पण २०१७ मध्ये चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतरही या दिग्गज खेळाडूने सध्या तरी खेळ सोडण्याचा कुठलाही विचार केलेला नाही.

  • कास्परोव्ह सर्वांना चकित करीत पुनरागमन करीत आहे.

  • आनंद सध्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवित असून अलीकडेच त्याने ३६ वर्षींय रॉजर फेडररने आठव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकाविताना बघितले आहे. स्वीत्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू फेडररने अलीकडेच १९ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकाविले. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवी निवृत्तीवेतन योजना :
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक नवी निवृत्तिवेतन योजना (पेन्शन प्लान) आणली असून त्यामध्ये दहा वर्षांच्या कालावधीसाठी आठ टक्क्यांचा (वार्षिक दर ८.३० टक्के) व्याजदर मिळणार आहे. व्याजदरांची घसरण चालू असताना ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक पर्याय देणारी असू शकते.

  • आठ टक्क्यांचा घोषित व्याजदर आणि 'एलआयसी'ला प्रत्यक्षात देता येणारा व्याजदर यांच्यातील फरकाची रक्कम केंद्र सरकार भरणार आहे.

  • एलआयसीच्या कोष्टकानुसार, दरमहा एक हजार रुपये निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी दीड लाख, तर पाच हजार रुपये मिळविण्यासाठी साडेसात लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी ०३ मे २०१८ पर्यंतची मुदत आहे.

  • ही गुंतणवूक ऑनलाइन अथवा ऑफलाइनही करता येईल.

हरमनप्रीतने पुरुषांच्या क्रिकेटमधील विक्रमही मोडला :
  • कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करून, इंग्लंडमधल्या महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली.

  • या उपांत्य सामन्यात नाबाद १७१ धावांची खेळी करणारी हरमनप्रीत कौर भारताच्या विजयाची प्रमुख शिल्पकार ठरली.

  • नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावा (१७१) ठोकण्याचा विक्रम हरमनप्रीतने केला. महिला आणि पुरुष क्रिकेटमधील हा विक्रम आहे, नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावा ठोकणारी हरमनप्रीत पहिलीच भारतीय फलंदाज ठरली आहे.

  • यापूर्वी नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता. गांगुलीने २००० साली १४१वांची खेळी केली होती.

रिलायन्स देणार मोफत मोबाइल, मुकेश अंबानी यांची घोषणा :
  • जिओ मोबाइल सेवा मोफत देण्याची घोषणा करून दूरसंचार क्षेत्राला धक्का देणाऱ्या रिलायन्स आता नवा धमाका केला असून, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा ४ जी फोन बाजारात आणला आहे.

  • रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन तथा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी ‘जिओ इंटेलिजन्ट’ ४जी फोन लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली असून या फोनची प्रभावी किंमत (इफेक्टिव्ह प्राईस) शून्य असणार आहे.

  • रिलायन्सच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारणसभेत ही घोषणा अंबानी यांनी केली. गेल्या वर्षी अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या माध्यमातून मोफत ४जी इंटरनेट सेवा सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी आता मोफत ४जी फोन बाजारात उतरविण्याची घोषणा केली आहे.

  • या फोनवरही १५३ रुपयांत अमर्याद इंटरनेट डाटा ग्राहकांना मिळेल. अंबानी यांनी सांगितले की, हा फिचर असून १५ आॅगस्टपासून त्याच्या चाचण्या सुरू होतील, तर २४ आॅगस्टपासून बुकिंग सुरू होईल.

  • या फोनसाठी १,५०० रुपयांचे डिपॉजिट कंपनी घेईल. ३६ महिन्यानंतर फोन परत करून हे डिपॉझिट ग्राहकास परत घेता येईल.

केंद्र सरकारमार्फत देशात ४२ मेगा फूड पार्क मंजूर :
  • देशामध्ये एकूण ४२ मेगा फुड पार्क मंजूर करण्यात आले असून त्यापैकी नऊ प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. तर ३३ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर बादल यांनी दिली.

  • केंद्रीय मंत्री कौर म्हणाल्या की, आपला देश अन्न धान्य आणि दूध उत्पादनात जागतिक स्तरावर अग्रेसर आहे.

  • देशात सुमारे एक लाख कोटी रुपयांचे अन्न वाया जात असून ही खेदाची बाब असून अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून किसान संपदा योजना तयार करण्यात आली आहे.

  • केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागामार्फत नवी दिल्ली येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०१७ दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे.

शिपायाने पक्षाच्या खात्यात जमा केला एक कोटींचा निधी : 
  • राजकीय पक्षांना मिळणा-या निधीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून यावेळी बिजू जनता दल चौकशीच्या घे-यात अडकण्याची शक्यता असून पक्षाला करोडो रुपयांचा निधी मिळाला असून हा सर्व निधी बेनामी असल्याचा संशय आहे.

  • धक्कादायक बाब म्हणजे पक्षाच्या खात्यात करोडो रुपये जमा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून एक शिपाई असून बिजू जनता दलाने मात्र आपल्यावरील आरोप तथ्यहीन आणि खोटे असल्याचा दावा केला आहे. 

  • टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, रिपोर्टमध्ये बँकेतील कागदपत्रांचा दाखला देण्यात आला आहे.

  • त्यानुसार बिजू जनता दलाच्या मुख्यालयात काम करणा-या पूर्ण चंद्र पाढी नावाच्या शिपायाने पक्षाच्या खात्यात एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. 

राम जन्मभूमी प्रकरणी लवकरच सुनावणी, सुप्रीम कोर्टाची तयारी :
  • सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी निकाल देण्याची तयारी दर्शवली असून या सुनावणीसाठी लवकरच तारीख निश्चित होणार असल्याचीही माहिती आहे.

  • २०१० सालापासून राम जन्मभूमीचा वाद प्रलंबित आहे. २०१० साली अलाहाबाद उच्च न्यायालयानं या संदर्भात निर्णय दिला होता.

  • याच वर्षी मार्चमध्ये सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राम जन्मभूमी प्रकरणी लवकर निकाल द्यावा, असा अर्ज दाखल केला होता.

  • त्यावर सुप्रीम कोर्टानं या निकालावर कोणतीही घाई करता येणार नाही, असं म्हटलं होतं.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • पाय दिन. (२२/७ = पाय)

जन्म, वाढदिवस

  • मुकेश, पार्श्वगायक : २२ जुलै १९२३

  • देवेंद्र गंगाधर फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे आमदार व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष : २२ जुलै १९७०

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ईंद्रलाल रॉय, भारतीय वैमानिक : २२ जुलै १९१८

ठळक घटना 

  • वायली पोस्टने ७ दिवस १८ तास ४५ मिनिटांत विमानातून सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली : २२ जुलै १९३३

  • अलेक्झांडर मॅकेंझी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोचणारा पहिला युरोपीय झाला : २२ जुलै १७९३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.