जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत भारत यंदाच्या वर्षी (२०१८) चीनलाही मागे टाकून पुढे जाणार आहे. इतकेच नव्हे तर एका अहवालानुसार यावर्षी इक्विटी मार्केटमध्येही भारत जगातील पाचवा सर्वांत मोठा देश होईल. सँक्टम वेल्थ मॅनेजमेंट अहवालानुसार, ज्यावेळी जगातील इतर देश आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी झुंज देत असतील तेव्हा भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल.
चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असेही या अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर भारताचा इक्विटी मार्केटही जगात पाचव्या क्रमांकावर असेल. अशावेळी जेव्हा विकसित देश २ ते ३ टक्क्यांनी प्रगती करत असतील तेव्हा भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्के वेगाने विकास करेल.
त्याचबरोबर इतर उभरत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत वेगाने विकास करेल. महत्वाचे म्हणजे यंदा चीनच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावणार आहे.
इक्विटीजच्या माध्यमातून मिळणारे परतावेही ६ ते ८ टक्केपर्यंत असेल, असे या अहवालात म्हटले आहे. साधारणात: निश्चित उत्पन्नातच हे शक्य होते. जर भारतात महागाई वाढली तर किंमतींमध्ये वाढ होईल आणि मार्केटमधील वेग त्याप्रमाणात होणार नाही. शेअर बाजारात यंदाच्यावर्षी तेजी पाहायला मिळेल. या अहवालानुसार निफ्टीने ५० अंकाने उसळी घेतली आहे. सध्या १०,४९० ते १०,५८० पर्यंत आहे. जो यंदाच्या वर्षाअखेर ११,२०० ते ११,५०० पर्यंत जाऊ शकतो.
नवी दिल्ली : देशातील जवळपास तीन चतुर्थांश (73 टक्के) संपत्ती केवळ एक टक्के श्रीमंतांकडे एकवटल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे, 2017 या वर्षात भारताला नवे 17 अब्जाधीश मिळाले आहेत, तर दुसरीकडे अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या संपत्तीत फक्त एका टक्क्याने वाढ झाली आहे. म्हणजे श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत, तर गरीबांच्या संपत्तीत वाढ झालेली नाही.
'ऑक्सफेम'च्या 'रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ' या अहवालात हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. ऑनलाईन सर्वेक्षण आणि प्रमाणित आकड्यांच्या आधारे हा अहवाल काढण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये होणाऱ्या विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
भारतीयांच्या संपत्तीशी निगडीत रंजक गोष्टी - 2017 मध्ये भारताला 17 नवे अब्जाधीश मिळाले. अब्जाधीशांची संख्या 101 वर. 2000 साली भारतात केवळ 9 अब्जाधीश होते.
अब्जाधीशांची संपत्ती 4 हजार 891 अब्ज रुपयांनी वाढून थेट 20 हजार 676 अब्ज रुपयांवर पोहचली आहे. 4 हजार 891 अब्ज रुपये हे सर्व राज्यातील शिक्षण आणि आरोग्य विभागांच्या बजेटच्या 85 टक्के आहे.
देशातील एकूण संपत्तीच्या तब्बल 73 टक्के रक्कम ही फक्त 1 टक्के श्रीमंतांच्या खात्यात आहे. दुसरीकडे, लोकसंख्येचा 50 टक्के भाग असलेल्या 67 कोटी गरीब जनतेच्या एकूण संपत्तीत केवळ 1 टक्क्याने वाढ झाली आहे.
37 टक्के अब्जाधीशांना वारसाहक्काने संपत्ती मिळाली आहे. अब्जाधीशांकडे असलेल्या एकूण संपत्तीपैकी 51 टक्के रक्कम 'या' (वारसाहक्काने अब्जाधीश झालेल्या 37 टक्के) श्रीमंतांकडे आहे. महिला अब्जाधीशांची संख्या फक्त 4 असून त्यापैकी तिघींना वारसाहक्काने संपत्ती प्राप्त झाली आहे.
नवी दिल्ली- जगभरातल्या अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षी चांगली प्रगती करत असून, भारतीय अर्थव्यवस्थाही 2018 या आर्थिक वर्षात चीनला पछाडत पुढे जाणार आहे. सँक्टम वेल्थ मॅनेजमेंटनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जागतिक भांडवली बाजारात भारतीय अर्थव्यवस्थाही पाचव्या स्थानी राहणार आहे. त्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था जलद गतीनं प्रगती करत चीनलाही मागे टाकणार असल्याचं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
तसेच इक्विटी बाजाराच्या माध्यमातूनही भारताला चांगला परतावा मिळणार आहे. इतर विकसित देश जेव्हा 2 ते 3 टक्क्यांनी प्रगती साधतील त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्था ही 7.5 टक्क्यांच्या वेगानं प्रगतिपथावर असेल. इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था वेगानं प्रगती साधेल.
विशेष म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था प्रगतिपथावर असताना चीनच्या अर्थ व्यवस्थेचा वेग धिमा होणार आहे. इक्विटी बाजाराच्या माध्यमातून भारताला जवळपास 6 ते 8 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारतात महागाईत मोठी वाढ झाली तरी त्याचा बाजारावर कोणताही परिणाम होणार नाही. शेअर बाजारही यंदा नवे उच्चांक गाठणार असून, निफ्टीमध्ये 50 अंकांची वाढ नोंदवली गेली आहे, असंही अहवालात देण्यात आलं आहे. सद्यस्थितीत निफ्टी हा 10,580 पर्यंत पोहोचलेला आहे. येत्या काही दिवसांत हा निफ्टी 11500पर्यंत जाण्याचाही अंदाज या अहवालात मांडण्यात आला आहे.(source : )
नवी दिल्ली : जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच ‘इंजिन’ आहे, असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १३० सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ सोमवारी डाव्होसला (स्वित्झर्लंड) रवाना होत आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी त्यामध्ये भारताची आर्थिक भूमिका मांडतील.
जागतिक आर्थिक फोरमची (डब्ल्यूइएफ) ४८ वी बैठक आल्प्स गिरीशिखरांच्या कुशीत वसलेल्या डाव्होसमधील एका रिसॉर्टमध्ये होत आहे. डब्ल्यूईएफचे अध्यक्ष क्लाऊस श्वॉब हे सोमवारी त्याचे उद्घाटन करतील. मात्र पाच दिवस चालणाºया या परिषदेत पंतप्रधान मंगळवारी विषय मांडतील. त्याआधी सोमवारी सकाळी सहा केंद्रीय मंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन डाव्होसला रवाना होत आहेत.
सोमवारी रात्रीच पंतप्रधान मोदी यांनी विदेशातील ४० कंपन्यांचे सीईओ व २० भारतीय कंपन्याचे सीईओ आणि अध्यक्षांसाठी विशेष मेजवानी डाव्होसमध्ये आयोजित केली आहे. या मेजवानीदरम्यान जागतिक गुंतवणुकीसाठी भारतीय अर्थव्यवस्था खुली असल्याची चर्चा केली जाईल.
मंगळवारी होणा-या मुख्य भाषणात मोदी हे तरुण व आधुनिक भारताचे चित्र मांडणार आहेत. भारतातील उद्योगाभिमूख वातावरणासाठी उचलण्यात आलेली पावले, भ्रष्टाचारावर आणलेला आळा, काळ्या पैशांविरुद्धची मोहिम, कर संरचनेचे सुलभीकरण व यामार्फत विकासाला मिळणारी गती, हा विषय पंतप्रधान मोदी मांडतील, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.(source :Lokmat)
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातून एकूण १० हजार ५९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अधिसभेवर प्राचार्य गटातून १० सदस्य, अध्यापक गटातून १० सदस्य, विद्यापीठ अध्यापकांतून ३ सदस्य व प्रत्येक अभ्यास मंडळावर ३ विभागप्रमुख निवडून द्यावयाचे आहेत. प्राचार्य गटातून खुल्या गटातील ५ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात
आहेत. तर राखीव जागांपैकी अनुसूचित जाती या संवर्गातून दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. अन्य इतर मागास प्रवर्ग, महिला, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती या संवर्गातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्राचार्य गटासाठी ३०३ मतदार आहेत.
अध्यापक शिक्षक संघातून १० जागांसाठी मोठी चुरस आहे. या जागांसाठी स्पुक्टो-पुटा पॅनल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ पॅनल यांनी उमेदवार उभे केले आहेत. खुल्या गटातील ५ जागांसाठी ११ उमेदवार आहेत. तर अनुसूचित जाती संवगार्तून एका जागेसाठी ६, अनुसूचित जमाती गटातून एका जागेसाठी २ उमेदवार, डीटीएनटी गटातून एका जागेसाठी ३ उमेदवार, इतर मागास प्रवगार्तून एका जागेसाठी २, तर महिला गटातून एका जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. अध्यापक गटासाठी १० हजार २९१ मतदार आहेत.
विद्या परिषदेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि मानवविज्ञान विद्याशाखा या गटातून उमेदवार निवडणूक लढवित आहेत. विद्यापीठ अध्यापक गटातील ३ जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा केला जात आहे. विद्यापरिषदेसाठी ५ हजार ३७२ मतदार आहेत.
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा, सणसवाडी व अन्य ठिकाणच्या नुकसानीचे साडेदहा कोटींचे पंचनामे करण्यात आले असून, आॅडिटनंतर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार आहे. दंगलीतील कारवाईत निर्दोषांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसल्याचे सांगत गावातील सामाजिक सलोख्याबाबत ग्रामास्थांवर कौतुकाची थाप जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी टाकली.
तर पोलीस प्रशासन संवेदनशील व मानवी दृष्टिकोन ठेवून काम करत असल्याने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तपासासाठी ताब्यात घेतले म्हणजे गुन्हेगार नव्हे, असे ग्रामस्थ व महिलांना सांगत अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आश्वासित केले.
कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील ग्रामस्थांना भेट देत श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील संभाजीमहाराज समाधीस्थळ व गोविंद गायकवाड यांच्याही समाधीस्थळाची जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पाहणी केली.
या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे आदींसह घोडगंगाचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, राष्ट्रवादीचे नारायणराव फडतरे, अशोक गव्हाणे, विक्रमराव गव्हाणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, पी. के. गव्हाणे, सरपंच संगीत कांबळे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, साहेबराव भंडारे, अंकुश शिवले, सरपंच रेखा शिवले, संतोष शिवले, सचिन भंडारे, सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते, गटविकास अधिकारी संदीप जठार, माजी सरपंच अजित दरेकर आदी उपस्थित होते.
या वेळी कोरेगाव भीमा येथे उपस्थित शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमोर दंगलीच्या व पोलीस अटकसत्राबाबत व्यथा मांडल्या.(source :lokmat)
महत्वाच्या घटना
१९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.
१९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
१९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
१९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
१९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
२००१: आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
२०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
जन्म
१५६१: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)
१८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
१९०१: भारतीय मानवशास्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म.
१९०९: संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यू. थांट यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)
१९१६: गुजराथी लेखक आणि कवी हरीलाल उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)
१९१६: बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९३)
१९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.
१९२२: मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.
१९३४: हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
१९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.
मृत्यू
१२९७: योगी चांगदेव यांनी समाधी घेतली.
१६६६: ५ वे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन. (जन्म: ५ जानेवारी १५९२)
१६८२: समर्थ रामदास स्वामी यांचे निधन.
१७९९: ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे यांचे निधन.
१९२२: शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बायर फिद्रिक यांचे निधन.
१९६७: क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)
१९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)
१९७३: अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
१९७८: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)
१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांची ओदिशाच्या केओंझोर जिल्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.