चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ ऑगस्ट २०१९

Date : 22 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अपॉफिस लघुग्रहाच्या आघाताचा पृथ्वीला धोका :
  • वॉशिंग्टन : अपॉफिस या ‘गॉड ऑफ केऑस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या लघुग्रहाची धडक पृथ्वीला १३ एप्रिल २०२९ रोजी बसण्याची शक्यता असून त्यात पृथ्वीचे मोठे नुकसान होऊ  शकते, अशी भीती अब्जाधीश तंत्रज्ञ उद्योजक व ‘टेस्ला’ तसेच ‘स्पेसएक्स’चे संस्थापक इलन मस्क यांनी व्यक्त केली आहे.

  • हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता असून आता त्याला तोंड देण्याची तयारी करण्यासाठी केवळ दहा वर्षे हातात आहेत, असे सांगून ते म्हणाले, ३४० मीटरचा हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता ४५ हजारांत एक आहे. तो पृथ्वीला धक्का देऊन जाण्याची शक्यता आहे कारण त्या वेळी हा लघुग्रह पृथ्वीच्या तीस हजार किलोमीटर जवळ येणार आहे. मानवी इतिहासात पृथ्वीवर आदळलेल्या लघुग्रहापैकी तो सर्वात घातक ठरू शकतो. सध्या तरी त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याकडे कुठलीच यंत्रणा नाही.

  • या संभाव्य आघाताबाबत त्यांनी भीती व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे, धोका आहे पण बचाव नाही ही सध्याची स्थिती आहे. अमेरिकेच्या नासा या संस्थेने या लघुग्रहाचा अभ्यास सुरू केला असून तो लघुग्रह धोक्याचा असल्याचे त्यातून मान्य केले आहे, असे असले तरी या लघुग्रहापासून बचाव करण्यासाठी नेमकी कशी यंत्रणा असावी हे अजून नासालाही निश्चित करता आलेले नाही. त्याचा मुकाबला करण्यासाठी या वर्षी नासाने ‘दी डबल अ‍ॅस्टरॉइड रिडायरेक्शन टेस्ट’ ही योजना जाहीर केली होती.

ट्रम्प मोदींशी काश्मीर प्रश्नी चर्चा करणार :
  • जी ७ देशांच्या फ्रान्समध्ये  होणाऱ्या बैठकीवेळी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीर प्रश्नावर चर्चा करणार आहेत. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळीत करण्याचा त्यांचा यामागचा हेतू आहे असे सांगण्यात आले.

  • व्हाइट हाऊस येथे मंगळवारी रुमानियाचे अध्यक्ष क्लॉस लोहानिस यांचे स्वागत करताना त्यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर दोन्ही देशात निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी आपण मदत करण्यास तयार आहोत. अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांनी पुन्हा मध्यस्थीचा प्रस्ताव मांडला असून तो भारताने यापूर्वीच फेटाळला आहे. काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न असून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेणे ही अंतर्गत बाब असल्याचे म्हटले आहे.

  • ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी स्वतंत्रपणे दूरध्वनीवर चर्चा केली होती त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, आठवडा अखेरीस फ्रान्समध्ये जी ७ देशांची बैठक होणार आहे त्यावेळी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीर प्रश्नावर चर्चा करू.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नुकतेच भेटून गेले आहेत, दोन्ही नेत्यांशी आपला चांगला संपर्क आहे.

  • काश्मीरमधील परिस्थिती कठीण आहे. भारत व पाकिस्तान हे हॉवित्झर तोफा व इतर शस्त्रांस्त्राचा वापर करीत आहेत.  हे बराच काळ सुरू आहे, त्यामुळे या दोन देशांना हा संघर्ष थांबवण्यासाठी मदत करण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे आपण मध्यस्थी किंवा इतर मार्गाने हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करू. सध्या तरी भारत व पाकिस्तान हे कट्टर शत्रू म्हणून उभे ठाकले आहे त्यामुळे परिस्थिती कठीण आहे, तेथील स्थिती स्फोटकच आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

उल्लेखनीय कार्याबद्दल १६ जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव :
  • प्रशासकीय सेवेचा समाजहितासाठी उपयोग करून परिवर्तन घडविणाऱ्या देशभरातील १६ जिल्हाधिकाऱ्यांचा बुधवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला. यात अकोला, नवी मुंबई, उस्मानाबाद आणि नागपूर येथे कार्यरत असताना दिलेल्या योगदानाबद्दल अनुक्रमे आस्तिक कुमार पांडे, तुकाराम मुंढे, डॉ. प्रशांत नारनवरे आणि माधवी खोडे-चावरे यांनाही सन्मानित करण्यात आले.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवान, रविशंकर प्रसाद, डॉ. जितेंद्र सिंग आणि ‘एक्स्प्रेस वृत्तसमूह’ संचालक मंडळाचे अध्यक्ष विवेक गोएंका हे यावेळी उपस्थित होते.

१४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच झालेल्या पहाणीतनंतर ‘टायटॅनिक’बद्दलचा धक्कादायक खुलासा :
  • महाकाय ‘टायटॅनिक’ जहाजाच्या दुर्घटनेला १०० वर्ष उलटून गेली आहेत. पण आजही या जहाजाबद्दलचे कुतूहल अजिबात कमी झालेले नाही. याच कुतूहलापोटी जवळजवळ १४ वर्षांनंतर पहिल्यांदाच हे जहाज बुडाले त्या ठिकाणी वैज्ञानिकांनी पहाणी केली. ‘टायटॅनिक’चे अवशेष वेगाने नष्ट होत असून लवकरच हे अवशेष कायमचे नष्ट होतील अशी भिती वैज्ञानिकांनी या पहाणीनंतर व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ‘टायटॅनिक’चे खास आकर्षण असणारा डेक, कॅप्टनचा बाथ टब अशा अनेक लोकप्रिय भागांचे मोठे नुकसान झाल्याचे या पहाणीमध्ये दिसून आहे.

  • १९१२ साली टायटॅनिक जहाज जेव्हा आपल्या पहिल्या प्रवासाला निघाले तेव्हा हे जहाज कधीच बुडणार नाही अशी जाहीरात करण्यात आली होती. त्या काळातील ते सर्वात अत्याधुनिक, आलिशान जहाज होते. मात्र ग्रीनलॅण्डमधील ‘जॅकोबश वन’ नावाच्या याच हिमनगाला धडकल्याने टायटॅनिकला जलसमाधी मिळाली. ज्या ठिकाणी ‘टायटॅनिक’ बुडाले त्या ठिकाणी समुद्रतळाची आणि ‘टायटॅनिक’च्या अवशेषांची पहाणी केली. यावेळेस बुडलेल्या जहाजाची मोठी पडझड झाल्याचे दिसून आले. कॅप्टनचा डेकही तुटल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे.

  • अटलांटिक महासागरामध्ये १३ हजार १२५ फूट (चार हजार मीटर) खोलीवर ‘टायटॅनिक’चे अवशेष आहेत. या अवशेषांवर पाण्याचा तसेच इतर अनेक गोष्टींचा परिणाम होत आहे. या ठिकाणच्या पाण्याचे तापमान वर्षातील बराच काळ एक डिग्री सेल्सियस असते. समुद्रातच्या पाण्यातील क्षारांचाही या जहाजाच्या अवशेषांवर परिणाम होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे धातूवर परिणाम करणाऱ्या जिवाणूंमुळे जहाच्या अवशेषांची झीज होत असल्याचे दिसून आले आहे. कॅलॅडॅन ओशनिक या कंपनीच्या माध्यमातून ही पहाणी करण्यात आली आहे.

  • ‘टायटॅनिक’संदर्भातील जाणकार पार्क स्टेफीन्सन यांनी जहाजाच्या अवशेष नष्ट होत असल्याचे समजल्यानंतर धक्का बसल्याचे म्हटले आहे. ‘जहाजाचा संपूर्ण डेकच कोसळत आहे. आलिशान स्टेटरुमचीही मोठी पडझड झाली आहे. आणि भविष्यात या अवशेषांची अजून पडझड होणार आहे,’ असं मत स्टेफीन्सन यांनी व्यक्त केलं आहे. वैज्ञानिक लॉरी जॉन्सन यांनी हे अवशेष कायमचे नष्ट होतील अशी भिती व्यक्त केली आहे. 

'हाऊडी, मोदी' हाऊसफुल्ल, अमेरिकेत मोदींच्या 'शो'साठी ५० हजारांचे बुकिंग :
  • वाशिंग्टन - अमेरिकेतील ह्यूस्टन येथे पुढील महिन्यात होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमाला उंदड प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमासाठी 50 हजार आसनाच्या बैठकीची व्यवस्था केली होती. मात्र, महिनाभरापूर्वीच याचं बुकिंग फुल्ल झालं आहे. त्यामुळे हाऊडी मोदी हा कार्यक्रम हाऊसफुल झाल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक एनजीओ टेक्सास इंडिया फोरम (टीआयएफ) यांनी सांगितलं आहे. यावरुन पंतप्रधान मोदींची लोकप्रियता अमेरिकेतही कायम असल्याचं ते म्हणाले. 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून फॅन फोलोविंग आहे. त्यामुळेच, बेयर ग्रिल्ससोबतचा शो आत्तापर्यंतचा जगातील सर्वाधिक ट्रेंडिंग शो ठरला आहे. तर, यापूर्वीच्याही मोदींच्या अमेरिकीतल कार्यक्रमांना मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

  • अमेरिकत सप्टेंबर महिन्यात हाऊडी मोदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी, सभागृहात 50 हजार आसन व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे बुकिंग अगोदर हाऊसफुल्ल झालं आहे. विशेष म्हणजे, अजूनही बुकिंग सुरूच असून या इच्छुकांना वेटींगवर ठेवण्यात येणार असल्याचं टीआयएफने म्हटलं आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.

  • १८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.

  • १९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.

  • १९०२: मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

  • १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.

  • १९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.

जन्म 

  • १६४७: प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७१३)

  • १८४८: शिकागो डेली न्यूज चे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९२९)

  • १८९३: अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर यांचा जन्म.

  • १९०४: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)

  • १९१५: बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९९७)

  • १९१५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २००७)

  • १९१९: हिंदी कवी गिरिजाकुमार माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९४)

  • १९१८: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै २००४)

  • १९२०: हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली यांचा जन्म.

  • १९३५: कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)

  • १९५५: अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा जन्म.

  • १९६४: स्वीडीश टेनिस खेळाडू मॅट्स विलँडर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३५०: फ्रान्सचा राजा फिलिप (सहावा) यांचे निधन.

  • १६०७: लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल यांचे निधन.

  • १८१८: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १७३२)

  • १९६७: जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९०३)

  • १९७८: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोके न्याटा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९३)

  • १९८०: चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)

  • १९८०: मॅकडोनेल विमानाचे  निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९९)

  • १९८२: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)

  • १९८९: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९३)

  • १९९५: संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक पं. रामप्रसाद शर्मा यांचे निधन.

  • १९९९: मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन.

  • २०१४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.