मुंबई : नुकताच अपंगांच्या विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसह सर्व क्रीडाप्रेमींसाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा ठरला. २०२१च्या अपंगाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आल्याचे संघ संचालक विनोद देशपांडे यांनी जाहीर केले.
गेल्या महिन्यात अपंगांच्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडलाच ३६ धावांनी धूळ चारून विजेतेपद मिळवले होते. मुंबईत शुक्रवारी या विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी आणि माजी क्रिकेटपटू करसन घावरी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
‘बीसीसीआय’तर्फेही लवकरच विश्वविजेत्यांचा गौरव -एडल्जी : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अपंग क्रिकेट संघाच्या कामगिरीची दखल घेतली असून लवकरच या सर्व खेळाडूंचा रोख पारितोषिके देऊन गौरव केला जाईल, असे डायना एडल्जी म्हणाल्या. ‘‘प्रशासकीय समितीची सदस्य म्हणून मी ‘बीसीसीआय’कडे अपंग खेळाडूंच्या विकासासाठी अर्ज केला होता. त्यामुळे आता सर्व खेळाडूंचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल,’’ असे एडल्जींनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रमच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार असून कमी वयात स्पर्धा परीक्षांची तयारी करून यूपीएससीतील मराठी टक्का वाढण्याच्या आणि उच्च पदी विद्यार्थी पोहोचण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ही माहिती दिली. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आणि निवृत्त आयपीएस अधिकारी जयंत उमराणीकर या वेळी उपस्थित होते. नियमित पदवी अभ्यासक्रमादरम्यानच हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम विद्यार्थी करू शकतील. संध्याकाळी दोन तास मार्गदर्शन केले जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले उत्तरे लिहिण्याचे कौशल्य, निबंध लेखन, इंग्रजीची उत्तम जाण, मुलाखतीचे तंत्र, तज्ज्ञांशी संवाद, व्यक्तिमत्त्व विकास या विषयी मार्गदर्शन केले जाईल.
‘स्वतच्या अनुभवातून या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. पूर्व परीक्षा ते मुलाखत या सर्व टप्प्यांवरील मार्गदर्शन केले जाईल. उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील उमेदवार खूप लवकर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याने कमी वयातच निवडले जातात. तर महाराष्ट्रातील उमेदवार मागे पडतात. ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमाद्वारे केला जाईल,’ असे उमराणीकर यांनी सांगितले.
ट्विटरने हजारो फेक न्यूज अकाऊंट्स बंद केल्याची माहिती AFP या न्यूज एजन्सीने दिली आहे. फेक न्यूज सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून पसरवल्या जाऊ नयेत म्हणून ट्विटरने हा निर्णय घेतला आहे. फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुळसुळाट आहे. अनेकदा आपल्याही फोनवर अशा प्रकारची माहिती येत असते. मात्र फेक न्यूज रोखल्या जाव्यात म्हणून हजारो फेक न्यूज अकाऊंट बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय ट्विटरने घेतला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
फेक न्यूज म्हणजे काय - कोणत्याही माहितीची शहानिशा न करता फेक न्यूज तयार केल्या जातात. दोन धर्मांमधील तेढ वाढवण्यासाठी, आपसातले शत्रुत्त्व वाढवण्यासाठी, दिशाभूल करण्याच्या उद्देशाने फेक न्यूजचा वापर केला जातो. ही माहिती खरी आहे हे दाखवण्यासाठी न्यूज चॅनल्स, वृत्तपत्रं, वेबसाईट यांची बनावट अकाऊंट तयार करुन त्यावरुन ती ट्विट केली जाते. त्यामुळे ही माहिती खरी आहे असे भासवता येते. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इतर सोशल मीडियाचा वापर यासाठी केला जातो. फोटो शॉपचा उपयोग करुन बातमी, फोटो मॉर्फ केले जातात. ते खरे आहे असे भासवण्यासाठी हे केले जाते.
दरम्यान अशा प्रकारच्या फेक न्यूज पसरवणारी हजारो अकाऊंट्स आता ट्विटरने बंद केली आहेत. जगभरातून ही अकाऊंट बंद करण्यात आली आहेत असंही ट्विटरने म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अधिवेशन पुढील आठवडय़ात सुरू होत असून त्यात काश्मीर प्रश्नी चर्चा होण्याची शक्यता आहे. सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी आमसभेच्या निमित्ताने या प्रश्नावर चर्चा घडवण्याचे ठरवले आहे, असे संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
गट्रेस यांचे प्रवक्ते स्टीफनी डय़ुजारिक यांनी गुरुवारी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले, की संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी काश्मीर प्रश्न संवादाच्या मार्गाने सोडवण्याचा आग्रह धरला आहे. काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असून ते टाळण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ते संवादाच्या मार्गाने या प्रश्नावर तोडगा काढावा असे सांगत आहेत. गट्रेस यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी संपर्क साधला असून त्यांनी आमसभेतही या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याचे सूचित केले आहे.
बुधवारी गट्रेस यांनी असे म्हटले होते, की काश्मीर प्रश्नावर भारत व पाकिस्तान यांनी संवादातून तोडगा काढणे गरजेचे आहे. याशिवाय मानवी हक्कांचे पालनही झाले पाहिजे. आम्ही दोन्ही देशात मध्यस्थी करण्यास तयार आहोत, पण त्यांनी ती स्वीकारली तरच त्यात पुढे काहीतरी करता येईल.
एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे पालन झाले पाहिजे व दोन्ही देशांनी या चर्चा करून या द्विपक्षीय प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे.
पणजी : केंद्र सरकारने शुक्रवारी येथे झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेच्या ३७ व्या बैठकीत देशातील आदरातिथ्य क्षेत्राला मोठा दिलासा दिला. या क्षेत्रातील अप्रत्यक्ष कराची मात्रा काही प्रमाणात कमी करताना अप्रत्यक्षरीत्या पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या समितीच्या बैठकीत आदरातिथ्यासाठी असलेल्या खोल्यांच्या भाडय़ावरील वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी कमी करण्यात आला. यानुसार १००१ ते ७,५०० रुपयांपर्यंत प्रति खोली-प्रति रात्र असलेल्या भाडय़ावर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के कर असेल. तर साडेसात हजार रुपयांवरील भाडय़ासाठीचा कर २८ टक्क्यांवरून थेट १८ टक्के करण्यात आला आहे. प्रति खोली, प्रति रात्र १,००० रुपयांपर्यंत भाडे असलेल्या खोल्यांना संपूर्ण करमाफी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर बाटलीबंद कॅफीनयुक्त पेयांवरील जीएसटीत तब्बल ४० टक्के इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे. या पेयांवरील जीएसटी २८ टक्क्यांनी वाढविण्यात आला असून त्यात १२ टक्के अधिभाराची भर घालण्यात आली आहे. सर्व तऱ्हेच्या पॉलिथिन पिशव्यांवर १२ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. बाटलीबंद बदाम दुधावर १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे.
जागतिक अल्झेमर्स दिन / आंतरराष्ट्रीय शांतता दिन
महत्वाच्या घटना
१७९२: अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.
१९३४: प्रभातच्या दामलेंनी सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्रमंदिर या नावाने सुरू केले.
१९४२: दुसरे महायुद्ध – युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.
१९६४: माल्टा हा देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
१९६५: गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९६८: रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.
१९७१: बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९७६: सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९८१: बेलिझे देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
१९८४: ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९९१: आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.
जन्म
१८६६: विज्ञान कथा इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९४६)
१८८२: भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९५३)
१९०२: पेंग्विन बुक्स चे संस्थापक ऍलन लेन यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९७०)
१९०९: घाना देशाचे पहिले अध्यक्ष घवानी एनक्रमाह यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १९७२)
१९२६: पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री नूरजहाँ यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००० – कराची, सिंध, पाकिस्तान)
१९२९: शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८)
१९३९: भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचा जन्म.
१९४४: चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म.
१९६३: वेस्ट इंडीजचा जलदगती गोलंदाज कर्टली अँब्रोस यांचा जन्म.
१९७९: जमैकाचा क्रिकेटपटू ख्रिस गेल यांचा जन्म.
१९८०: अभिनेत्री करीना कपूर यांचा जन्म.
१९८१: अभिनेत्री रिमी सेन यांचा जन्म.
मृत्यू
१७४३: जयपूर संस्थानचे राजे सवाई जयसिंग यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)
१९८२: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन. (जन्म: २१ जून १९२३)
१९९२: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचे निधन. (जन्म: १० मे १९१४)
१९९८: अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९५९)
२०१२: पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९२४)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.