चालू घडामोडी - २१ सप्टेंबर २०१७

Date : 22 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जीडीपीची घसरण ‘तांत्रिक’ नाही, सार्वजनिक खर्चात वाढ आवश्यक :
  • भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आली असून, तसे होण्यास कोणतेही तांत्रिक घटक कारणीभूत नाहीत, असेही एसबीआय रिसर्चने अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे.

  • सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) घसरणीस तांत्रिक घटक जबाबदार असल्याचा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेला दावा एसबीआय रिसर्चने पूर्णपणे अमान्य केला आहे.

  • अमित शहा यांनी जीडीपीच्या घसरणीला केंद्र सरकार नव्हे, तर तांत्रिक घटक जबाबदार असल्याचा दावा केला असून जीडीपी ५.७पर्यंत खाली आल्यानंतर अमित शहा यांनी तसे म्हटले होते.

  • त्यांचा उल्लेख एसबीआय रिसर्चच्या अहवालात नाही. मात्र अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली असून, ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारला सार्वजनिक खर्चात वाढ करावी लागेल, असे एसबीआय रिसर्चने अहवालात म्हटले आहे.

  • केंद्रीय सांख्यिकी विभागाने मध्यंतरी आर्थिक तिमाहीतील जी आकडेवारी जाहीर केली, त्यात जीडीपीत मोठी घसरण झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. त्यानंतर अमित शहा यांनी त्यास केंद्र सरकार जबाबदार नाही, अन्य तांत्रिक घटक कारणीभूत आहेत, असे म्हटले होते.

  • सप्टेंबर २०१६पासूनच भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आली असून पहिल्या तिमाहीत मंदावलेली अर्थव्यवस्था तांत्रिक नाही आणि तात्पुरती क्षणिक तर अजिबातच नाही.

नवरात्रीचे नऊ दिवस नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा उपवास :
  • आजपासून देशभरात नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. गुरूवारी सकाळपासूनच घरोघरी घटस्थापना केली जाते आहे तसंच मंडळांमध्ये आणि मंदिरांमध्ये देवीच्या मुर्तीची स्थापना केली जाते आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा देवीच्या उपासनेसाठी नऊ दिवस उपवास करणार असून आजपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव २९ सप्टेंबरला संपणार आहे.

  • नवरात्रीचे हे नऊ दिवस सगळ्यांसाठीच महत्त्वाचे असतात, या नऊ दिवसात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने देवीची पूजा करतो. विशेष म्हणजे या नऊ दिवसांमध्ये अनेकजण प्रथेप्रमाणे उपवास करतात.

  • आजपासून त्या उपवासालाही सुरूवात झाली असून त्यानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जाईल. 

  • नरेंद्र मोदी हे गेल्या २८ वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात, पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवासात फक्त पाणीच पितात.

तीन भारतीयांचा समावेश जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांच्या यादीत :
  • ‘१०० ग्रेटेस्ट लिव्हिंग बिझनेस माईंडस’ 100 Greatest Living Business Minds या नावाने ही विशेष यादी प्रसिद्ध करण्यात आली असून लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला अशी या तीन व्यावसायिकांची नावे आहेत.

  • ‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली असून यामध्ये भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे.

  • यापैकी लक्ष्मी मित्तल हे ‘आर्सेलो मित्तल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असून रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. तर विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टमचे सह-संस्थापक आहेत.

  • ‘फोर्ब्स’ने त्यांचा उल्लेख ‘विक्रेता आणि विशेष गुण असलेला रिंगमास्टर’ असा केला असून याशिवाय, यादीमध्ये अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन, बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफे, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेटस आणि न्यूज कॉर्पोरेशनचे कार्यकारी अध्यक्ष रुपर्ट मरडॉक यांचाही समावेश आहे.

  • ही यादी तयार करताना ‘फोर्ब्स’कडून काही निकष डोळ्यांसमोर ठेवण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रात नवनवीन कल्पना राबवणाऱ्या आणि जगावर दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा विचार करण्यात आला. 

२०२३ चा विश्वचषक देखील खेळेल महेंद्रसिंह धोनी  :
  • ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या मते, भारताचा महान फलंदाज महेंद्रसिंह धोनी हा २०२३ चा देखील विश्वचषक खेळू शकतो. तेवढी क्षमता त्याच्यात आहे. 

  • धोनी २०१९ चा विश्वचषक खेळू शकेल का? या प्रश्नावर बोलताना क्लार्कनं ही प्रतिक्रिया दिली.

  • यावेळी क्लार्क म्हणाला की, ‘तुम्ही मला हे नका विचारु की धोनी २०१९ चा विश्वचषक खेळू शकतो की नाही तो २०२३ चा विश्वचषक देखील खेळेल.’

  • २०११ च्या विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं विश्वचषक पटकावला असून सध्याही धोनी फॉर्मात आहे, नुकत्यातच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे धोनीनं त्याची चुणूक दाखवली आहे.

  • मोक्याच्या क्षणी ७९ धावा करुन त्यानं संघाला तारलं होतं. त्याच जोरावर टीम इंडियानं पहिल्या वनडेत कांगारुंवर विजय मिळवला.

अनिल नाईक एल अँड टीच्या नोकरीच्या अर्जातही माझ्या स्पेलिंगच्या सात चुका :
  • बहुतांश लोक चुकांना घाबरुन प्रयत्न करायचेच टाळतात मात्र चुकांना सुधारुन पुढे जातात तेच खरे यशस्वी होत असतात याचं आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे एलअँडटी कंपनीचे गेली १८ वर्षे अध्यक्ष असणारे अनिल मणिभाई नाईक.

  • आपल्या आयुष्यातील चढउताराचा, यशापयाशाचा लेखाजोखा सीएनबीसी टीव्ही १८ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मांडला.

  • गेली ५५ वर्षे एलअँटी कंपनीत सेवा बजावणारे नाईक यांनी त्या नोकरीसाठी केलेल्या अर्जातही आपण सातवेळा स्पेलिंग चुकलो होतो असे विनम्रपणे या मुलाखतीत सांगितले. 

  • नाईक म्हणाले, 'मुलाखतीच्या वेळेसही मला धड बोलता येत नव्हतं तेव्हा मुलाखत घेणारे मँनेजर तुझं इंग्रजी अधिक चांगलं होऊ शकतं असं वाटत नाही का असे म्हणाले होते, तेव्हा मी होय असं उत्तर दिलं कारण नोकरीच्या अर्जातही मी स्पेलिंगच्या सात चुका केल्या होत्या.'

  • अनिल नाईक आँक्टोबर महिन्यात निवृत्त होत आहोत, त्या निमित्ताने त्यांनी या मुलाखतीत एलअँडटीमधील प्रवास उलगडून सांगितले असून आयआयटीचे विद्यार्थी नसल्याने त्यांना एलअँडटीने मुलाखतीला बोलावलेच नव्हते.

  • "एलअँडटी तेव्हा फक्त आयआयटीयन्सना बोलवत असे, म्हणून मला मुलाखतीला बोलावल नसून मग मी नेस्टर बाँयलरमध्ये १८ महिने काम केल्यावर या नोकरीसाठी पात्र झालो.

  • अनिल नाईक यांच्या आयुष्याची पहिली काही वर्षे खेड्यात गेल्यामुळे त्यांना मुंबईत आल्यावर इंग्रजी बोलायला भिती वाटत होती ' मी एका खेड्यातून आलो, माझं शिक्षण गुजराती माध्यमात झालं होत वडिलांनी मला वल्लभ विद्यानगर काँलेजात जाण्यास सांगितलं तिथे २५% मुले बाहेरची होती तरीही सगळे गुजरातीतच बोलायचे.

दिनविशेष :

जन्म /वाढदिवस

  • पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार : २१ सप्टेंबर १९३२

  • करीना कपूर, भारतीय अभिनेत्री : २१ सप्टेंबर १९८०

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

  • पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक : २१ सप्टेंबर १९९९

  • पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन : २१ सप्टेंबर २०१२

​​​​​​ठळक घटना

  • रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली : २१ सप्टेंबर१९६८

  • आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला : २१ सप्टेंबर १९९१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.