व्हॉट्सअॅप सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजरअॅप आहे. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन फिचर्स देण्यासाठी व्हॉट्सअॅप नेहमी पुढे असतो.
दिवसेंदिवस सोशल मीडिया कंपन्या आपापल्या युझर्सला आकर्षक सेवा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. काहीही करुन आपले युझर आपल्याला सोडून दुसऱ्या सोशल मीडियावर शिफ्ट नाही झाला पाहिजे यावर या कंपन्यांचा कटाक्ष असतो.
आता व्हॉट्सअॅपने त्यांच्या युझर्सला अजून एक नवीन फिचरची भेट दिली आहे. या नवीन फिचर चे नाव आहे पिन चॅट. काही दिवसापूर्वी व्हॉट्सअॅप ने त्यांच्या बीटा युझर्स साठी पिन चॅट टेस्टिंगला दिले होते.
व्हॉट्सअॅप ने पिन चॅट या फीचरची अधिकृत घोषणा करून लेटेस्ट अपडेट मध्ये हे पिन चॅट फीचर अँड्रॉइड युझर्ससाठी उपलब्ध करून दिले आहे. तुम्ही ते अपडेट डाउनलोड करू शकता.
नथुराम गोडसेच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामी ओम यांना गोडसे समर्थकांनी चोपले असून नथुराम गोडसेच्या जयंतीच्या कार्यक्रमात ओम स्वामी यांच्यासारखी व्यक्ती नको असा गोडसे समर्थकांचा आक्षेप होता.
बेताल विधानांमुळे चर्चेत राहणारे स्वामी ओम यांना रविवारी एका कार्यक्रमात बेदम मारहाण करण्यात आली.
दिल्लीतील विकासनगरमधील सत्यम वाटिका येथे नथुराम गोडसेच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वामी ओम यांच्यासारखा स्वयंघोषित आणि ढोंगी बाबाला बोलावून नथुराम गोडसेचा अवमान झाल्याचा आक्षेप काही मंडळींनी घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एका महिलेने स्वामी ओम यांच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती.
स्वामी ओम कार्यक्रमस्थळी दाखल होताच गोडसे समर्थकांचा पारा चढला. वातावरण चिघळण्याची शक्यता दिसताच स्वामी ओम यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. मारहाण का झाली या प्रश्नावर स्वामी ओम यांनी थेट उत्तर देणे टाळले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. पनामा पेपर्सप्रकरणी नवाझ शरीफ यांनी सात दिवसांत राजीनामा द्यावा अन्यथा देशभरात तीव्र आंदोलन करु असा इशारा पाकमधील वकिलांनी दिला आहे.
पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि लाहोर हायकोर्ट बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेने संयुक्त पत्रक काढले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदावर राहणे अयोग्य आहे. त्यामुळे त्यांनी सात दिवसांत राजीनामा द्यावा अशी मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त तपास पथक स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.
१९ मेरोजी वकिलांच्या अधिवेशनात पाकिस्तानमधील सत्ताधारी नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) पक्षाचे समर्थन आणि विरोध करणारे वकील एकमेकांशी भिडले होते.
पीएमएलच्या वकीलांनी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे प्रमुख रशीद रिझवींना लाहोर हायकोर्टाच्या ग्रंथालयात डांबून ठेवले होते.
भारताने जागतिक तिरंदाजी स्पर्धाच्या मालिकेतील कम्पाऊंड विभागातील पुरुष गटात सोनेरी वेध घेतला. भारतीय संघात अभिषेक वर्मा, राजुशिना श्रीधर व अमनजित सिंग यांचा समावेश होता.
त्याच्या शानदार कामगिरीसह भारताने अंतिम फेरीत कोलंबिया संघावर २२६-२२१ अशी मात केली. कोलंबिया संघात कॅमिलो कादरेना, डॅनियल मुनोझ व होजे कालरेस ओस्पिना यांचा समावेश होता.
भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवताना व्हिएतनाम, जागतिक विजेते इराण व अग्रमानांकित अमेरिका यांच्यावर सनसनाटी विजय मिळवला होता.
कोलंबियाने अंतिम फेरीतील पहिल्या टप्प्यात ५८-५७ अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या टप्प्याअखेर भारतीय संघाने ११६-११३ अशी आघाडी मिळवली.
तिसऱ्या टप्प्यात पुन्हा भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी करीत आघाडी गमावली. चौथ्या टप्प्यात भारतीय संघाने ६० पैकी ५८ गुण मिळविले, तर कोलंबियास ५६ गुणच मिळविता आले.
जन्म, वाढदिवस
जगातील सर्वात जास्त उंचीचे माउंट एव्हरेस्ट शिखर प्रथम चढून जाण्याचा मान मिळवणारे शेर्पा तेनसिंग यांचा नेपाळमधील थामी गावी जन्म : २१ मे १९१४
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
इंदिरा गांधीचे सुपुत्र व भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पेरांबुदुर येथे बॉम्बस्फोटात अंत : २१ मे १९९१
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.