नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या उद्गागारांनी माझ्या कलेचं चीज झालं. आमचे पूर्वज महाराजांच्या दरबारी होते, आज आपल्यालाही तो मान मिळाला, केवळ या एका भावनेनं आमचं सगळं कुटुंब समाधानी आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिलेल्या शिवरायांच्या प्रतिमेचे चित्रकार महेश लाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
शिवरायांच्या या प्रतिमेनं राष्ट्रपती भवनात जी कमतरता जाणवत होती, ती पूर्ण झाली, असे भावनिक उद्गार काल राष्ट्रपतींनी दिल्लीतल्या भव्य शिवजयंती सोहळ्यात काढलेले होते. या सोहळ्यात शिवरायांची भव्य प्रतिमा भेट दिल्यानंतर कृतार्थतेनं त्यांनी या भावना व्यक्त केल्या होत्या. अतिशय उच्च प्रतीचं हे तैलचित्र राष्ट्रपती भवनाची शोभा वाढवत राहील, असेही राष्ट्रपती म्हणाले होते.
घटनात्मक दृष्टीनं देशात सर्वोच्च प्रतिष्ठा असलेल्या वास्तूत त्यामुळे पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांचं तैलचित्र लागणार आहे. हे तैलचित्र ज्या कलाकाराच्या हातून साकार झालं, त्या महेश लाड यांच्याशी 'एबीपी माझा'नं एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.
"राष्ट्रपतींच्या या उद्गागारांनी माझ्या कलेचं चीज झालं. आमचे पूर्वज महाराजांच्या दरबारी होते, आज आपल्यालाही तो मान मिळाला या केवळ एका भावनेनं आमचं सगळं कुटुंब समाधानी आहे" अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रपतींसाठी चित्र बनवायला सांगितलं, यापेक्षा जे चित्र बनवत आहोत, ते महाराजांचं आहे, याच भावनेनं आनंदून गेलो होतो असं लाड यांनी म्हटलं.
मुंबई : राज्यभरात सुरु होणार्या बारावीच्या परीक्षेला एक मिनिटही उशिरा येणार्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेतच परीक्षा केंद्रावर येण्याचं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.
विद्यार्थ्यांना 11 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. अकरा वाजेनंतर आलेल्या विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊनच परीक्षा केंद्रांत प्रवेश दिला जाईल अन्यथा प्रवेश नाकारला जाईल. असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील नऊ विभागीय मंडळातून तब्बल 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी बसणार आहेत. राज्यभरातील 9486 कनिष्ठ महाविद्यालयातील हे विद्यार्थी आहेत. मुंबई विभागीय मंडळातून 3 लाख 30 हजार 823 विद्यार्थी बसणार आहेत.
राज्यात 2822 परीक्षा केंद्र असणार आहेत. तर मुंबई विभागात 586 केंद्र असणार आहेत. परीक्षा काळात होणार्या गैरप्रकरांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 याप्रमाणे राज्यात एकूण 252 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या शिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत.
दहावी आणि बारावीला विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात 10.30 वाजता प्रवेश दिला जातो. तर 10.40 मिनिटांनी त्यांना उत्तरपत्रिकांचे वाटप करण्यात येते. तर 10.50 वाजता त्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जाते. तर उत्तरपत्रिका लिहण्यासाठी 11वाजता सुरु करण्यात येते. त्यामुळे परीक्षा सुरु झाल्यानंतर परीक्षार्थींना प्रवेश दिला जाणार नाही. असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
लंडन- जगभरात भारतीय वंशांच्या लोकांनी विविध पदांवर चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. राजकारण, अर्थकारण, प्रशासन, अंतराळ विज्ञान, साहित्य, संशोधन, संगणकशास्त्र अशा विविध विषयांमध्ये भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहे.
आता जगातील सर्वात उत्कृष्ठ तपास यंत्रणा मानल्या जाणा-या स्काँटलंड यार्डच्या दहशतवाद विरोधी विभागाची धुरा भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे येणार आहे. माजा मेट्रोपोलिटन कमांडर असणा-या या व्यक्तीचं नाव नील बासू असं आहे.
नील बासू सध्या मेट्रोपोलिटन पोलीस डेप्युटी असिस्टंट कमिशनर पदावरती कार्यरत आहेत. त्यांचे वडील भारतीय वंशाचे नागरिक होते. बासू यांनी दहशतवादी आणि गुन्हेगारांच्या सघटनांविरोधात आजवर भरपूर काम केले आहे. सीरिया आणि इराकमध्ये जाऊन आयसीसमध्ये सहभागी होण्याच्या ब्रिटीश नागरिकांच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे.
सध्या बासू यांचं नाव या महत्त्वाच्या पदासाठी आघाडीवर असलं तरी मेट्रो पोलीस असिस्टंट कमिशनर पदावरती कार्यरत असणा-या हेलेन बॉल, वेस्ट मिडलँड चिफ कॉन्स्टेबल डेव्ह थॉम्प्सन यांचेही नाव चर्चेत आहे. युरोपमधून आयसीसमध्ये जाणा-या व्यक्ती आणि युरोपातील दहशतवादी संघटना व घातपाती घटना यांच्याकडे पाहिल्यास नील यांना अत्यंत मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल असे दिसते.
नवी दिल्ली : भारताचे दुसरे यान चंद्रावर पाठविण्याच्या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) ‘चांद्रयान-२’ मोहिमेचा खर्च फक्त ८०० कोटी रुपये असेल, असे पंतप्रधान कार्यलयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले. येत्या एप्रिलमध्ये ‘चांद्रयान-२’ रवाना करण्याची तयारी ‘इस्रो’ करत आहे.
‘चांद्रयान-१’ मोहिमही ‘इस्रो’ने एवढ्या कमी खर्चात फत्ते केली होती की, तंत्रशास्त्रीय कामगिरीप्रमाणेच या काटकसरीचीही जगभर वाहवा झाली होती.
‘चांद्रयान-१’ चा खर्च अंतराळ सफरीवर आधारित ‘ग्रॅव्हिटी’ या हॉलीवूड चित्रपटाहूनही कमी होता. आता ‘चांद्रयान-२’चा ८०० कोटी रुपये हा अपेक्षित खर्चही ‘इंटरस्टेलर’ या हॉलीवूडच्या सन २०१४मधील अंतराळपटाच्या खर्चाहून चक्क २६२ कोटी रुपये कमी असणार आहे. ‘इंटरस्टेलर’च्या निर्मितीवर १६५ दशलक्ष डॉलर (१०६५ कोटी रु.) खर्च झाले होते.
‘चांद्रयान-१’च्या तुलनेत ‘चांद्रयान-२’ अंतराळ तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आव्हानात्मक असणार आहे. या वेळी या यानासोबत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे आॅर्बिटर, चंद्रावर उतरमारे ‘लँडर’ व चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारणारे ‘रोव्हर’ही पाठविण्यात येणार आहे.
बाओबाब नावाचं एक फळ आहे, जे आपल्याला माहीत नाही. बाहेरून हिरवं आणि आतून कोरड्या नारळासारखं दिसतं हे फळ. ते चवीला काहीसं कडवट, आंबट असतं. ते सुकवून त्याची भुकटी तयार केली जाते आणि त्याचं तेलही तयार करण्यात येतं. ते फळ भारतात कुठंच मिळत नाही आणि त्याची झाडंही भारतात कुठंच नाहीत.
ती झाडं आहेत आफ्रिकन देशांमध्ये आणि आॅस्ट्रेलियामध्ये. या झाडांचं आयुष्यमान प्रचंड आहे. दक्षिण आफ्रिकेत आणि झिंबाब्वेमध्ये सहा हजार वर्षांपासून बाओबाबची झाडं उभी आहेत. बाओबाबच्या ९ प्रजाती आहेत. आॅस्ट्रेलियातील एक तर झाड तीन हजार वर्षं जुनं आहे.
प्रचंड आयुष्यमान असलेलं झाड (द ट्री आॅफ लाइफ) असंच बाओबाचं वर्णन केलं जातं. दक्षिण आफ्रिकेतील एका अशाच ६००० वर्षं जुन्या झाडाच्या आत चक्क पब आहे. आतमध्ये एका वेळेस १५ जण बसू शकतात आणि बीअरचा आनंद घेऊ शकतात. त्या १५ मध्ये आपला क्रमांक लागावा आणि आपल्यालाही आत जाता यावं, यासाठी हजारो पर्यटक प्रयत्न करतात.
अर्थात आतमध्ये एकदा ६0 लोकांची पार्टीही झाली होती. मात्र झाडाचं अस्तित्व कायम राखण्यासाठी आता केवळ १५ जण असा नियम केला आहे. हा पबही खूप जुना म्हणजे १९३३ पासून त्या झाडाच्या आत आहे. त्या पबचं सीलिंग १३ फूट उंच आहे आणि आत बसायला लाकडी बाकं आहेत. मुळात या झाडाचं उंची आहे २२ मीटर आणि रुंदी आहे तब्बल ४७ मीटर. त्या ठिकाणाला भेट देणाºया प्रत्येकाला झाडाच्या आतील पबमध्ये जाण्याची संधी मिळत नाही.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये काही दिलासादायक बदल केले आहेत. त्यामुळे कागदपत्रांमुळे ज्यांचा पासपोर्ट काढणं बाकी आहे, त्यांना दिलासा मिळू शकतो. आई-वडिलांची माहिती, जन्म प्रमाणपत्र, विवाहित किंवा घटस्फोटितांसाठीच्या नियांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
जन्म प्रमाणपत्र - ज्यांचा जन्म 26 जानेवारी 1989 किंवा त्यानंतर झाला, त्यांच्यासाठी जुन्या नियमांनुसार जन्माचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य होतं. मात्र नव्या नियमांनुसार यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता कोणतीही स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जन्म-मृत्यू रजिस्ट्रार किंवा संबंधित प्राधिकरणाने नोंद केलेली जन्म तारीख वैध धरण्यात येईल. याशिवाय मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेला शाळेचा दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.
आई-वडिलांचं नाव देणं अनिवार्य नाही - नव्या नियमांनुसार, पासपोर्टच्या अर्जामध्ये आई किंवा वडिलांचं नाव देणं अनिवार्य नाही. अर्जदार आता कायदेशीर पालकाचं नाव देऊ शकतो. या नियमामुळे सिंगल पॅरेंट किंवा अनाथ व्यक्तींना दिलासा मिळेल. याशिवाय साधू किंवा संन्यासी त्यांच्या आध्यात्मिक गुरुचं नाव देऊ शकतात.
कॉलमची संख्या घटली - कॉलमची संख्या घटवून ती 15 वरुन 9 करण्यात आली आहे. यामध्ये A, C, D, E, J आणि K कॉलम हटवण्यात आले आहेत.
प्रत सांक्षांकित करण्याच्या प्रक्रियेत बदल - जुन्या नियमांनुसार, प्रत्येक कागद नोटरी, कार्यकारी मॅजिस्ट्रेट, प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्याकडून सांक्षांकित म्हणजे अॅटेस्टेड करुन आणावा लागायचा. आता अर्जदार एका साध्या कागदावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन) देऊ शकतो. त्यामुळे प्रत सांक्षांकित करण्यासाठी जी धावपळ करावी लागायची, किंवा अनेकदा यासाठी पैसेही द्यावे लागायचे तो सर्व मनस्ताप आता वाचणार आहे.
विवाहित किंवा घटस्फोटित व्यक्ती - विवाह प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. याशिवाय घटस्फोटित व्यक्तींना पती किंवा पत्नीचं नाव देण्याची गरज नाही.
महत्वाच्या घटना
१८४२: जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणमशिनचे पेटंट मिळाले.
१८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.
१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.
१९१५: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
१९२५: द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९७२: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.
१९७५: जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.
२०१३: हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण ठार आणि ११९ जण जखमी झाले.
जन्म
१८७५: १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७)
१८९४: वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९५५)
१८९६: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९६१)
१९११: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९९७)
१९४२: अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००८)
१९४३: ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन यांचा जन्म.
१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर यांचा जन्म.
मृत्यू
१८२९: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १७७८)
१९६५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचे निधन. (जन्म: १९ मे१९२५)
१९७५: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९१२)
१९७७: साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९०३)
१९९१: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९३६)
१९९८: चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १९१९)
२०११: अमेरिकन लेखक आणि पटकथालेखक व माईलस्टोन मीडिया चे सहसंस्थापक ड्वेन मॅकडफी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.