अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ येत्या काही दिवसांत मंगळावर दोन, तर गुरू ग्रहावर एक यान पाठविणार आहे. या यानांच्या माध्यमातून दोन्ही ग्रहांवरील नवीन माहिती मिळेल, असे ‘नासा’चे वरिष्ठ अँटेना व मायक्रोवेव्ह शास्त्रज्ञ डॉ. नासेर चाहत यांनी बुधवारी सांगितले.
एमआयटी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे कोलकाता येथील चॅप्टर आॅफ आयईईई, मुंबई येथील आयईईई बॉम्बे सेक्शन आणि नागपूर येथील प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने शहरात ६व्या ‘अप्लाइड इलेक्ट्रो मॅग्नेटिक-२०१७’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचे उद्घाटन शास्त्रज्ञ डॉ. राज मित्रा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एमआयटीचे महासंचालक मुनीष शर्मा होते. या वेळी मंचावर पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्सड टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉ. सुरेंद्र पाल, अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. सतीश शर्मा, कोलकाता विद्यापीठातील डॉ. देबातोश गुहा, शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित चक्रवर्ती आणि आयोजक डॉ. अभिलाषा मिश्रा उपस्थित होत्या.
उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात डॉ. राज मित्रा यांनी ‘भविष्यातील मेटा अटॉम्स आणि मेटा सरफेस बिल्डिंग ब्लॉक अँटेना’ या विषयावर बीजभाषण केले. दुसºया सत्रात डॉ. नासेर चाहत यांनी ‘रिफ्लेक्ट अॅरे अॅण्ड रिफ्लेक्टर अँटेना’ या विषयावर संशोधन पेपर सादर केला. (source : lokmat)
संयुक्त राष्ट्रे : भारतातील १७ दशलक्ष लोक जगभर वेगवेगळ्या देशांत वास्तव्यास असून त्यातील पाच दशलक्ष लोक आखाती विभागात आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या नव्या अहवालात म्हटले आहे. परदेशांत राहणाºयांच्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. एकट्या सौदी अरेबियामध्ये तब्बल ३२ लाख भारतीय राहतात.
मेक्सिको, रशिया, बांगलादेश, सिरिया, चीन, पाकिस्तान आणि युक्रेनमधील लोकही मोठ्या संख्येने परदेशांत राहतात व त्यांची प्रत्येकाची संख्या ६ ते ११ दशलक्षांदरम्यान आहे, असे येथे प्रसिद्ध झालेल्या २०१७ इंटरनॅशनल मायग्रेशन रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
विदेशांत राहणाºया स्थलांतरितांच्या देशांच्या यादीत भारतानंतर मेक्सिको (१३ दशलक्ष) आहे. रशियातून ११, चीन १०, बांगलादेश ७, सिरिया ७ आणि पाकिस्तान व युक्रेन येथील प्रत्येकी ६० लाख लोक आहेत.
अमेरिकेतही असंख्य भारतीय भारतातील तीन दशलक्ष लोक संयुक्त अरब अमिरातीत तर अमेरिका व सौदी अरेबियात प्रत्येकी ३२ लाख लोक वास्तव्यास आहेत. विविध देशांतील २५८ दशलक्ष लोक त्यांचा मूळ देश सोडून जगभर वास्तव्यास आहेत. सन २००० पासून हे प्रमाण ४९ टक्के वाढले आहे.
२०३० सालच्या अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटची अंमलबजावणी करण्यात आंतरराष्ट्रीय स्थलांतर हा गंभीर विषय बनला आहे, असे अहवालात म्हटले.(source : lokmat)
नवी दिल्ली - देशात ट्रिपल तलाक ही प्रथा संपवण्यासाठी आज लोकसभेमध्ये मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात कॅबिनेटनं या विधेयकास मंजुरी दिली होती. सरकारनं हे विधेयक पास करण्यासाठी संपूर्ण तयारी केलेली आहे. भाजपानं पक्षातील सर्व खासदारांना व्हिप जारी करुन संसदेत हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.
तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय आहे?
नवी दिल्ली : गेल्यावर्षीच्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेली रु. 2000 ची नोट पुन्हा बंद होते की काय अशा शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी हा अंदाज कुठल्याही व्हायरल व्हॉट्सअॅप पोस्टमधून किंवा स्वयंघोषित अर्थतज्ज्ञाने व्यक्त केलेला नाही, तर स्टेट बँकेच्या एका अहवालातून ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
स्टेट बँकेच्या काल जारी झालेल्या एका शोधअभ्यास अहवालात, संसदेत अर्थमंत्र्यांनी चलनविषयक सांगितलेली अधिकृत माहिती आणि रिझर्व बँकेने वेळोवेळी चलनस्थिती विषयी जारी केलेले अहवाल, यांचा तुलनात्मक अभ्यास करुन आपले निष्कर्ष नोंदवले आहेत. मात्र स्टेट बँकेच्या अहवालात कोणताही ठोस निष्कर्ष किंवा मत व्यक्त न करता फक्त काही शक्यता सूचित करण्यात आल्या आहेत.
स्टेट बँकेच्या अहवालानुसार 2463 अब्ज रुपये किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा छापून तयार आहेत, मात्र त्या अजून चलनात जारी केलेल्या नाहीत.
नोटाबंदीनंतर ज्या प्रमाणात व्यवहारात रु. 2000 च्या नोटा दिसायच्या तेवढ्या हल्ली दिसत नाहीत, हे तसं सर्वसामान्य निरीक्षण. काही स्वयंघोषित अर्थतज्ज्ञांनीही रु. दोन हजारची नोट ही तात्पुरती उपाययोजना असल्याचे दावे केले होते. त्यातच मधल्या काळात रिझर्व बँकेने रु. 2000 च्या नोटांची छपाई बंद केल्याचीही बातमी आली होती.(source : abpmajha)
पुणे : समाविष्ट गावांबाबत महापालिकेचे काहीच नियोजन नसल्याचे बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. या गावांसंबधीचा विषय चर्चेला आल्यानंतर शहर अभियंता प्रशांत वाघमारे सभेला उपस्थित नसल्याबद्दल महापौर मुक्ता टिळक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
समाविष्ट गावांमधील विकास आराखडा व त्यासंबंधीचे दोन विषय बुधवारच्या सर्वसाधारण सभेत होते. शहर अभियंत्यांशी संबंधित हे विषय आहेत. मात्र, सभेला शहर अभियंताच उपस्थित नव्हते. आयुक्त कुणाल कुमार हेही परगावी असल्यामुळे सभेत नव्हते.
महापौरांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. समाविष्ट गावांसंबधीचे विषय सभेत आहेत, याची माहिती असतानाही ही अनास्था दाखवली याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सभेला उपस्थित दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी या नाराजीची दखल घ्यावी, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, राजाभाऊ लायगुडे यांनी या गावांमधील विसर्जित ग्रामपंचायतींमधून महापालिकेत वर्ग झालेल्या कर्मचाºयांना ४ महिने वेतन मिळालेले नाही. त्यांचे हाल सुरू आहेत, याची जबाबदारी कोण घेणार? अशी विचारणा प्रशासनाकडे केली. त्यांच्यापैकी काहींच्या घरात आजारी व्यक्ती आहेत.(source : lokmat)
2 जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्याचा आज निकाल :
नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्याचा आज निकाल लागणार आहे. राजधानी नवी दिल्लीमधील विशेष न्यायालयात या घोटाळ्याच्या खटल्यांवर निकाल सुनावला जाणार आहे. माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि खासदार कनिमोळी यांचे भविष्य या निकालातून ठरणार आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी . सैनी हा निकाल सुनावतील.
सीबीआयच्या विशेष न्यायायालयात या घोटीळ्यासंबंधी खटल्यांचे कामकाज सुरू आहे. यातील एक खटला सीबीआयने व एक खटला अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवला आहे. निकाल वाचून दाखवण्याच्या दिवशी या न्यायालयाने कनिमोळी आणि ए. राजा यांच्यासह इतर आरोपींना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
संपुआ सरकारच्या काळात झालेल्या या स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात देशाच्या तिजोरीचे १ लाख ७६ हजार कोटीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते.
तत्कालीन विरोधी पक्ष भाजपाने यामुळे सरकारविरोधात केवळ संसदेतच नव्हे तर सर्व देशात सरकारविरोधात आंदोलने आणि विरोध प्रदर्शन केले होते. द्रमुक पक्षाचीही या महाघोटाळ्यामुळे मोठी नाचक्की झाली होती.(source : lokmat)
महत्वाच्या घटना
१९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
१९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
१९६५: विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
१९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
जन्म
१८०४: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १८८१)
१९०३: प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९९०)
१९१८: संयुक्त राष्ट्रांचे ४थे सरचिटणीस कुर्त वाल्ढहाईम यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून २००७)
१९२१: भारताचे १७ वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांचा जन्म.
१९५४: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू ख्रिस एव्हर्ट लॉइड यांचा जन्म.
१९५९: फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांचा जन्म.
१९५९: अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९८)
१९६३: हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा जन्म.
मृत्य
१८२४: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १७५५)
१९६३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १८८२)
१९७९: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९३)
१९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी यांचे निधन.
१९९७: भावगीतलेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम यांचे निधन. (जन्म: ४ जुलै१९१४)
२००४: भारतीय न्यूरोलॉजिस्ट औतार सिंग पेंटल यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)
२००६: तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती रूपमूर्त निझाव यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९४०)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.