चालू घडामोडी - २१ ऑगस्ट २०१७

Date : 21 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘वंदे मातरम्’ला विरोध करणा-यांचा मताधिकार काढून घ्या : उद्धव ठाकरे
  • ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगान सुरू असताना ‘ओवेसी’च्या ‘एमआयएम’चे नगरसेवक बसून राहिले, शेख जफर, सय्यद मतीन, शेख समीना असे हे तीन नगरसेवक ‘वंदे मातरम्’चा अवमान करीत असताना सभागृहातील शिवसेना नगरसेवकांच्या संतापाचा स्फोट झाला व त्यांनी या ‘वंदे मातरम्’ विरोधकांना झोडपून काढले.

  • ‘वंदे मातरम्’वरून हिंदुस्थानात रोजच राडा व्हावा हे आजच्या राज्यकर्त्यांना लांच्छन आहे, मुंबई महापालिकेनंतर हे लोक संभाजीनगरात पोहोचले आहेत.

  • सभागृहात अशा हाणामाऱ्या होऊ नयेत, तिथे शहराच्या व लोकांच्या प्रश्नांवर चर्चा घडावी या मतांचे आम्ही असलो तरी ‘वंदे मातरम्’सारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर काही नतद्रष्टांना अवदसा सुचते त्याला शिवसेना काय करणार? ‘वंदे मातरम्’ हा मुसलमान समाजासाठी म्हणे ‘धार्मिक’ विषय बनला आहे.

  • मातृभूमीला वंदन हे त्यांच्या इस्लाममध्ये बसत नाही. अल्ला सोडून हे लोक दुसऱ्या कुणापुढे झुकत नाहीत, असे त्यांच्या डोक्यात ठासून भरले आहे.

  • या अनाडी अंधश्रद्धेतून बाहेर पडल्याशिवाय मुसलमानांचा विकास होणार नाही. मुसलमानांचे काही ‘पावलीकम’ पुढारी आजही त्याच अंधश्रद्धेच्या चिखलात त्या समाजाला ढकलत असतील तर हे लोक इस्लामचे मारेकरी आहेत.

कृषी विद्यापीठात शहिदांना आदरांजली :
  • विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुर्‍हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले, तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांचे बलिदान मात्र व्यर्थ गेले नाही

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष करताना हौतात्म्य आलेल्या शहिदांना २० ऑगस्ट रोजी आदरांजली वाहण्यात आली, तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.

  • कारण विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी झाली.

  • तसेच विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणार्‍या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे विशेष सभेचे आयोजन २० ऑगस्ट रोजी करण्यात येते.

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी, याकरिता आंदोलन १९६८ साली उभारण्यात आले होते आणि या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी २० ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती..

भारतीय वंशाचा मुलगा ठरला 'चाइल्ड जिनियस' : राहुल दोशी
  • एडवर्ड जेन्नरने वैद्यकीय क्षेत्रात लावलेले शोध हा राहुलने आवडीचा विषय म्हणून निवडला होता व त्यावरच त्याला सर्वाधिक प्रश्न विचारले गेले, पण त्याला खरा विजय मिळवून दिला, तो १९ व्या शतकातील विल्यम होलमन हंट आणि जॉन एवरेट मिलाईस या दोन कलावंतांशी संबंधित प्रश्नांच्या उत्तरांनी.

  • ब्रिटनमधील 'चॅनेल ४' या दूरचित्रवाहिनीच्या स्मरणशक्ती आणि सामान्यज्ञान यावर आधारित स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून, राहुल दोशी हा १२ वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा 'चाइल्ड जिनियस' ठरला.

  • लंडनमध्ये शिकणाऱ्या राहुलने अंतिम फेरीत नऊ वर्षांच्या रोनन याचा १० विरुद्ध ४ असा पराभव केला. म्हणजे अंतिम फेरीत विचारलेल्या सर्व १० प्रश्नांची उत्तरे राहुलने अचूक दिली, तर रोननची फक्त चार उत्तरे बरोबर आली.

  • आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात स्पर्धकांच्या स्मरणशक्तीसोबत गणित, इंग्रजी, इतिहास व इंग्रजी स्पेलिंगच्या ज्ञानाचा कस लागला.

आयआयटी प्रवेश परीक्षा होणार ऑनलाइन : २०१८ पासून
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी)च्या प्रवेश परीक्षा २०१८ पासून ऑनलाइन पद्धतीनं घेण्यात येणार आहे, हा निर्णय चेन्नईच्या जॉइंट अॅडमिशन बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

  • देशातील सर्व आयआयटी संस्थांमध्ये २०१८ पासून ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार असून त्याची सविस्तर माहिती जॉइंट अॅडमिशन बोर्ड देणार आहे.

  • आयआयटीला जायचे आहे पण कोचिंगसाठी पैसे नाहीत. चिंता करू नका. तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांची सोय लवकरच होणार आहे.

  • तुम्हाला आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी घरबसल्या शिकवणी मिळणार आहे. गरीब विद्यार्थ्यांनाही आयआयटीची दरवाजे खुली व्हावीत, त्यांच्यातील टॅलंट देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात यावे, या उद्देशातून केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय कामाला लागले आहे.

  • गेल्या अनेक वर्षांपासून त्याबाबतचा विचार सुरू होता, अखेर हा निर्णय घेण्यात आला असून तो योग्यच आहे, असं जॉइंट अॅडमिशन बोर्डाचे चेअरमन भारस्कर राममूर्ती यांनी सांगितलं आहे. त्यामुळे २०१८ पासून जेईई (अॅडव्हान्स) परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.

दिल्लीला मिळणार वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच :
  • भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला लवकरच वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच मिळणार आहे. अमेरिकाच हे सुरक्षा कवच आपल्या देशाला उपलब्ध करून देणार आहे.

  • केंद्र सरकारतर्फे लवकरच 'नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल' चा उपयोग दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत भारताचे संबंध सध्या तणावाचे आहेत, चीनने तर वारंवार युद्धाची धमकी दिली आहे आणि पाकिस्तान दहशतवादी कारवाया करण्यात आघाडीवर आहे.

  • अशात राजधानी दिल्लीला एका सबळ हवाई सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊनच 'नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल' चा वापर दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे.

'इन्फोसिस' कंपनीकडून कोटींचे शेअर बायबॅक :
  • इन्फोसिसच्या संचालक मंडळाने १९ ऑगस्ट रोजी तब्बल १३ हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

  • कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजिनाम्यानंतर तातडीने कंपनीने हा निर्णय घेतला.

  • कंपनीच्या संचालक मंडळाने यासंदर्भात निवेदन जारी केले होते. सिक्का यांना मंडळाने पूर्ण पाठिंबा व्यक्त करताना संस्थापक नारायण मूर्ती यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यांच्या चुकीच्या मोहिमेमुळे सिक्का यांना जावे लागल्याचे संचालक मंडळाने म्हटले होते.

  • तसेच कंपनी स्वतःचेच शेअर खरेदीदारांकडून खरेदी करते, तेव्हा त्या पद्धतीला शेअर बायबॅक म्हणतात.

मायावती-अखिलेश-लालू-सोनिया गांधी एकत्र : भाजपाच्या विरोधात
  • मोदी सरकार आणि एनडीएच्या विरोधात विरोधी पक्ष एकजुटीचे प्रयत्न करतायत, आता बहुजन समाज पक्षानंही सामाजिक हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

  • बहुजन समाज पक्षानं ट्विटरवर एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात मायावती, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, सोनिया गांधींसह अनेक नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय.

  • मात्र बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव एस. सी. मिश्रा यांनी सांगितलं की, फोटो शेअर करण्यात आलेलं ट्विटर अकाऊंट हे बहुजन समाज पक्षाचं अधिकृत अकाऊंट नाही. खरंतर २०१४ च्या देशातील परिवर्तनानंतर राजनैतिक घडामोडींना वेग आला आहे.

  • भाजपानं आतापर्यंत अनेक राज्यांत सत्ता स्थापन केली आहे. तसेच राजकारणातही भाजपाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं विरोधी पक्षांसाठी स्वतःचं अस्तित्व टिकवणं मोठं आव्हान आहे.

  • बहुजन समाज पक्षानं शेअर केलेल्या फोटोमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जेडीयू नेते शरद यादव, आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादवांचाही समावेश आहे. या सर्व नेत्यांमध्ये मायावतींचा फोटो सर्वात मोठा दाखवण्यात आला आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • -

जन्म, वाढदिवस

  • उसेन बोल्ट, जमैकाचा धावपटू : २० ऑगस्ट १९८६

  • नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार : २० ऑगस्ट १७८९

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेता : २० ऑगस्ट २००१

  • उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक : २० ऑगस्ट २००६

ठळक घटना

  • -

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.