इस्लामाबाद : अमेरिकेने पाकिस्तानी डिप्लोमॅट्सना देशात प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विशेष म्हणजे, पाकिस्ताननेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका पाकिस्तानी डिप्लोमॅट्सना देशात येणावर निर्बंध घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आता अमेरिकेने हा निर्णय घेतल्याने, पाकिस्तानची गोची झाली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी याबाबत सांगितलं की, "पाकिस्तानी डिप्लोमॅट्सना अमेरिकेत येण्यावर निर्बंध घालण्यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे."
"अमेरिकेच्या या निर्णयाबाबत दोन्ही देश एकमेकाच्या संपर्कात असून, यावर लवकरच तोडगा निघेल," अशी आशाही फैजल यांनी यावेळी व्यक्त केली.
यापूर्वी पाकिस्तानने अमेरिकन डिप्लोमॅट्सना देशात बंदी घातली होती. यानंतर अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर पॉलिटिकल अफेअर्स थॉमस शैनन यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले होते.
"ज्या प्रमाणे पाकिस्तानने त्यांच्या डिप्लोमॅट्सना देशात बंदी घातली आहे. त्याच प्रकारे अमेरिका वॉशिंग्टनमध्ये त्यासंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करेल," असं शैनन यांनी यावेळी सांगितलं होतं.
नवी दिल्ली: जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान देण्यात आलेलं नाही. अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मासिकानं प्रभावशाली व्यक्तींची यादी घोषित केली आहे. या यादीत यंदा मोदी स्थान मिळवू शकले नाहीत.
या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान, चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन, आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लियो वराडकर आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या दिग्गज राष्ट्रप्रमुखांचा ‘टाइम’च्या यादीत समावेश आहे.
मात्र या यादीत मोदींना स्थान देण्यात आलेलं नाही.
शंभर जणांमध्ये केवळ चार भारतीय - जागतिक 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत विविध विभागात केवळ चार भारतीयांनीच स्थान मिळवलं आहे. यामध्ये ओला कॅबचे सह संस्थापक भावीश अग्रवाल, अभिनेत्री दीपिका पदुकोण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा समावेश आहे.
टाइम मासिकातर्फे दरवर्षी जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली जाते.
नवी दिल्ली : भारतात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आले नाही, तर भारतासाठी तो फटका असेल, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी CLSA चे मुख्य रणनितीकार क्रिस्टोफर वुड यांनी व्यक्त केले आहे. 'ग्रीड अँड फिअर' या साप्ताहिकातील लेखात त्यांनी हे मत नोंदवले आहे.
क्रिस्टोफर वुड्स नेमकं काय म्हणाले - "पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले नाही, तर भारताला मोठं नुकसान सहन करावं लागेल.", असे म्हणत वुड्स पुढे म्हणाले, "2018 या वर्षात भारताने काही खास कामगिरी केली नाही, मात्र तरी आशियात भारतच वरचढ आहे. भारताच्या आणखी चांगली कामगिरी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत किती, यावर अवलंबून आहे."
तेलांच्या किंमती वेगाने वाढत आहेत. त्यामुळे भारतासमोरील आव्हानं वाढत आहेत, असेही मत वुड्स यांनी नोंदवले आहे. भारतीय स्टॉक मार्केटकडूनही वुड्स यांना अजूनही आशा आहेत.
क्रिस्टोफर वुड्स कोण आहेत - क्रिस्टोफर वुड्स हे CLSA या ब्रोकिंग फर्मचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य रणनितीकार आहेत. 'सर्वोत्कृष्ट रणनितीकार' म्हणून जागतिक स्तरावर त्यांना ओळखलं जातं. गुंतवणूकदार नेहमीच आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून असतात. 'ग्रीड अँड फिअर' नावाचं साप्ताहिक सुद्धा क्रिस्टोफर वुड्स प्रसिद्ध करतात.
नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
22 डिसेंबर 1923 रोजी राजिंदर सच्चर यांचा जन्म झाला. पंजाब राज्याचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले भीम सेन सच्चर हे राजिंदर सच्चर यांचे वडील. डीएव्ही हायस्कूल, लाहोरमधील गव्हर्नमेंट कॉलेज आणि लॉ कॉलेजमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले.
22 एप्रिल 1962 रोजी राजिंदर सच्चर यांनी शिमला कोर्टात वकिली करण्यास सुरुवात केली. 8 डिसेंबर 1960 रोजी त्यांची सुप्रिम कोर्टात वकील म्हणून नियुक्ती झाली. विधी व न्याय या क्षेत्रात त्यांनी आपले बहुमोल योगदान दिले.
6 ऑगस्ट 1985 ते 22 डिसेंबर 1985 या काळात ते दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. विधिज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
संयुक्त राष्ट्र संघात मानव अधिकारांच्या संरक्षणासंदर्भातील उपआयोगाचे ते सदस्य होते.
मार्च 2005 मध्ये राजिंदर सच्चर यांच्या नेतृत्त्वात तत्कालीन केंद्र सरकारने सच्चर समिती नियुक्त केली होती. या समितीने भारतातील मुस्लीम समाजाची आर्थिक, समाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करुन अहवाल सादर केला होता.
प्याँगयाँग - अण्वस्त्र हल्ल्याची धमकी व आपल्या ताकदीचे वारंवार प्रदर्शन करुन अमेरिकेसहीत जगभरातील अन्य देशांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करणारे उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. किम जोंग यांनी आपली अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर कोरियाच्या अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांची चाचणी शनिवारपासून थांबवण्यात येणार आहेत. म्हणजे आजपासून उत्तर कोरियामध्ये होणाऱ्या सर्व अण्वस्त्रांच्या चाचण्या थांबवण्यात येणार आहेत.
किम जोंग उन यांनी हा निर्णय देशहितासाठी घेतल्याचे बोलले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय मुद्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या उद्देशानं किम जोंग उन यांनी निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. किम जोंग उन यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
दरम्यान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष पुढील आठवड्यात पॅन्मुन्जोम येथे भेटणार आहेत. या भेटीपूर्वीच किम जोंग उन यांनी हा निर्णय घेतला आहे.
वॉशिंग्टन : महत्त्वाकांक्षी जनधन योजना यशस्वी झाली असली तरी भारतातील १९ कोटी नागरिकांचे अजूनही कुठल्याही बँकेत खाते नाही. बँकेत खाते नसलेल्या लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागला आहे.
जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल फाइंडेक्स डाटाबेस’ या अहवालात ही माहिती दिली आहे. भारतातील एकूण बँक खात्यांपैकी अर्धी बँक खाती गेले वर्षभर निष्क्रिय आहेत, असे यात म्हटले आहे. जनधन योजनेमुळे मार्च २0१८ पर्यंत ३१ कोटी लोक औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले, असा गौरवपूर्ण उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे. बँक खाते असणे हे गरिबी निर्मूलनातील पहिले पाऊल समजले जाते.
आंतरराष्टÑीय नाणेनिधीच्या वार्षिक वासंतिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने हा अहवाल जारी केला आहे. अहवालात म्हटले आहे की, बँकेत खाते असणाऱ्या लोकांची संख्या २0११ पासून दुपटीने वाढून ८0 टक्के झाली आहे. २0१४ मध्ये मोदी सरकारने राबविलेल्या जनधन योजनेमुळे लोक बँकिंग व्यवस्थेशी मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहेत.
तरीही बँकेत खाते नसलेल्या जागतिक लोकसंख्येपैकी ११ टक्के लोक भारतातील आहेत. जगाच्या लोकसंख्येपैकी ६९ टक्के म्हणजेच ३.८ अब्ज प्रौढ लोकांकडे आता स्वत:चे बँक खाते अथवा मोबाइल मनी प्रोव्हायडर आहे. २0१४ मध्ये हे प्रमाण ६२ टक्के, तर २0११ मध्ये अवघे ५१ टक्के होते.
सेऊल- दक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना करण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळेच या टेलिफोन हॉटलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींच्या सेऊल येथील ब्लू हाऊस या निवासस्थानातून उत्तर कोरियामध्ये स्टेट अफेअर्स कमिशनमध्ये एक फोन करून या हॉटलाइनची चाचणी करण्यात आली. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही राष्ट्राध्यक्ष पुढील आठवड्यात पॅन्मुन्जोम येथे भेटणार आहेत. त्याआधी उ. कोरियाचे किम जोंग उन आणि द. कोरियाचे मून जाए-इन फोनवर चर्चा करतील. त्यांच्या भेटीनंतरही ही हॉटलाइन कायम ठेवली जाणार असून दोन्ही देशातील तणावाची स्थिती कमी करण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी तिचा कायम उपयोग करण्यात येईल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चाचणीचा फोन कॉल 4 मिनिटे 19 सेकंदांचा होता. दोन्ही बाजूचे नेते या कॉलमध्ये एकमेकांशी बोलले. हा फोन अत्यंत चांगल्याप्रकारे झाला असून आवाजाची गुणवत्ताही चांगली होती. जणू शेजारी फोन करावा इतक्या सहजपणाने त्यावर बोलणं होत होतं.
या दोन्ही देशांमध्य़े चर्चा होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. 1950-53 पासून अशी चर्चा फक्त तिसऱ्यांदा होत आहे. त्याचप्रमाणे डोनल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यामध्ये मे किंवा जून महिन्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घटना
१९६०: रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.
१९७२: अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
१९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.
२०००: आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.
जन्म
१८६४: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९२०)
१९२२: स्कॉटिश साहसकथा लेखक अॅलिएस्टर मॅकलिन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७)
१९२६: इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचा जन्म.
१९३४: महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचा जन्म.
१९४५: भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांचा जन्म.
१९५०: हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म.
मृत्यू
१५०९: इंग्लंडचा राजा हेन्री (सातवा) यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १४५७)
१९१०: अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५)
१९३८: पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ सर मुहम्मद इक्बाल यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)
१९४६: ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८३)
१९५२: इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८८९)
२०१३: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.