बीजिंग: भारताच्या मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड 2017 चा किताब जिंकला आहे. चीनमध्ये मिस वर्ल्ड 2017चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 118 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
हरियाणाची असलेली मानुषी छिल्लर 20 वर्षांची आहे. या स्पर्धेत दुस-या स्थानावर मिस मेक्सिको आणि तिस-या क्रमांकावर मिस इंग्लंडनं मान मिळवला आहे. यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्रा हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.
प्रश्नोत्तराच्या फेरीत मानुषीने आईविषयी दिलेल्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे ?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.
यावर मानुषी म्हणाली, मी माझ्या आईच्या जवळ आहे. माझ्यामते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे. माझ्यासाठी माझी आई प्रेरणास्थान आहे. जगातील प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोडी करत असते.
मुंबई : मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. अनेक व्यवसाय, उद्योगधंदे करून अनेकांनी गडगंज संपत्ती कमवली. अगदी रस्त्यावर वडापाव विकणारा सामान्य माणसाचीही उलाढाल आता लाखोंच्या घरात गेलीय.
जगभरात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेलेले प्रसिद्ध व्यावसायिक मुळचे मुंबईकर आहेत. अशाच काही मुंबईकरांविषयी आज पाहुया.
मुकेश अंबानी १.८ मिलिअन डॉलर एवढी आर्थिक उलाढाल असलेले मुकेश अंबानीमुंबईतीलच नव्हेतर संपूर्ण जगात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. रिलायन्स इंडस्ट्रीचे ते अध्यक्ष असून २०१४ साली फोर्बने प्रसिद्ध केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये ३६ व्या क्रमांकावर होते.
२०१३ साली आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणूनही गणले गेले आहेत. मुंबईतील अॅन्टिलियामध्ये ते राहत असून जगातील सगळ्यात महागड्या घरांमध्ये यांच्या बंगल्याची गणना केली जाते.
आंतरराष्ट्रीय धोरणाचे विश्लेषक व्ही. पी. दत्त यांनी इंदिरा गांधी यांच्या परराष्ट्र धोरणाचा उल्लेख ‘अत्यंत परिपक्व आणि भारताचे कमीत कमी नुकसान करणारे’ असा केला होता.
बांगलादेशची मुक्ती आणि पाक-रशियाला शिकवलेला धडा, अण्वस्त्र निर्मितीबद्दल घेतलेली भूमिका असे सारेच निर्णय त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळले... हीच त्यांची खुबी होती.
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विविध क्षेत्रांतील यशांपैकी महत्त्वाचे यश म्हणजे त्यांनी परराष्ट्र धोरणाला दिलेला आकार. त्यातही उल्लेखनीय म्हणजे डिसेंबर १९७१मध्ये जिंकलेल्या बांगलादेश युद्धात पंधरवड्यात मिळालेले यश. या विजयामुळेच त्यांना 'दुर्गामाता' हे सार्थ नामाभिधान मिळाले होते.
पूर्व पाकिस्तानात मुजीबुर रेहमान व अवामी लीगवर पश्चिम पाकिस्तानचा वरंवटा चालू लागल्यावर इंदिरा गांधी यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि संयमाने पावले उचलत बांगलादेशी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुक्ती वाहिनीला मदत करत तसेच बांगलादेशी राजकीय नेत्यांना भारतात आश्रय देत लष्करी कारवाईसाठी परिस्थिती निर्माण केली.
एक कोटी निर्वासितांना तात्पुरता निवारा देऊन बांगलादेशातील स्थिती निवळल्यावर मातृभूमीध्ये पुन्हा जाता येईल, अशा विश्वास त्यांच्यात निर्माण केला. त्यानंतर इंदिराजींनी फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, बेल्जियम, आॅस्ट्रिया अशा युरोपीय देशांचा दौरा त्यांनी केला. अमेरिकेलाही भेट दिली.
नवी दिल्ली - आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने भन्नाट फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे कॉल सुरु असताना वॉईस कॉल की व्हिडिओ कॉल असा पर्याय उपलब्ध होणार आहे तर दुसऱ्या फिचरमध्ये व्हाट्सअॅप व्हाईस कॉल रेकॉर्ड करणे सोपे होणार आहे.
हे दोन्ही फिचर्स अॅंड्रॉईडवरच लागू होणार आहेत. व्हॉट्सअॅप सध्या दोन नव्या फिचर्ससाठी काम करीत आहे. सध्या व्हॉट्सअॅपकडून या नव्या फीचरची चाचपणी सुरु असून अँड्रॉईडच्या बिटा व्हर्जनवर तपासलं जात आहे. लवकरच हे फीचर तुमच्या-आमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. येत्या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर लाँच होण्याचा अंदाज आहे.
चाचणी सुरू WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ-व्हॉईस कॉल संदर्भात व्हॉट्सअॅप टीमची सध्या चाचपणी सुरू आहे. सुरु असलेला कॉल बंद न करता त्याला व्हिडिओ कॉलमध्ये रुपांतरीत करता येणार आहे.
जुलै महिन्यात यासंबधी प्रथम चाचणी करण्यात आली होती. या फिचरची चाचणी झाली असून याचा वापर कसा करायचा यासंबधी स्क्रीनशॉटही पाठविण्यात येणार आहेत.
जागतिक दिवस
जागतिक शौचालय दिन / आंतरराष्ट्रीय पुरूष दिन / महिला उद्योजकता दिन
महत्वाच्या घटना
१९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.
१९६९: फूटबॉलपटू पेले यांनी १,००० वा गोल केला.
१९६९: अपोलो-१२ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अॅलन बिल हे चंद्रावर उतरले.
१९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.
१९९८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.
१९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.
२०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान..
जन्म
१८२८: झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १८५८)
१८३१: अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)
१८७५: प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे१९५०)
१८८८: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९४२)
१९१४: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रामकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)
१९१७: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४)
१९७४: भारतीय अभिनेते आणि गायक अरुण विजय यांचा जन्म.
१९७५: मिस युनिव्हर्स आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेन यांचा जन्म.
१९७६: ट्विटर चे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांचा जन्म.
मृत्यु
१८८३: जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८२३)
१९७१: मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये यांचे निधन.
१९९९: कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.