मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'जीवनगौरव' पुरस्कार यंदा ज्येष्ठ संपादक, विचारवंत मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांना जाहीर झाला आहे.
प्रतिष्ठेच्या ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कारासाठी 'लोकमत'च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांची निवड करण्यात आली आहे.
जूनच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूर येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
तसेच यासोबतच परिषदेच्या अन्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना जाहीर झाला आहे, तर आचार्य अत्रे पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांना सन्मानित केले जाणार आहे.
भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या आदेशाचे पाकिस्तानात जोरदार पडसाद उमटले आहेत.
क्रिकेटचे मैदान, रणभूमी पाठोपाठ आंतरराष्ट्रीय कोर्टातही भारतासमोर निभाव लागू न शकल्याने पाकिस्तानात मोठया प्रमाणावर अस्वस्थतता आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला सुरु असताना पाकिस्तानातील कायदेपंडितांनी जाधव यांच्या फाशीचा विषय आंतरराष्ट्रीय न्यायलयाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही असे चित्र तेथील जनतेसमोर निर्माण केले होते.
पाकिस्तानला आपली बाजू मांडण्यासाठी ९० मिनिटांचा जो वेळ मिळाला होता त्याचा पाकिस्तानने पुरेपूर वापर केला नाही. पाकिस्तानने या खटल्याची व्यवस्थित तयारी केली नव्हती. पाकिस्तानकडे ९०निटांचा वेळ होता. पण पाकिस्तानने आपल्या वाटयाची ४० मिनिटे वाया घालवली.
भारतीय शास्त्रज्ञ, महाराष्ट्राचे भूमिपुत्र श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
दहा लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप असून तेल अवीव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
कुलकर्णी यांच्याअगोदर तीन भारतीयांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात लेखक अमिताव घोष, संगीतकार जुबिन मेहता आणि रसायनशास्त्रज्ञ सीएनआर राव यांचा समावेश आहे.
श्रीनिवास कुलकर्णी हे पासाडिना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत खगोलभौतिकीचे प्रोफेसर आहेत. पॅलोमर ट्रॅन्शेंट फॅक्टरीचे संस्थापक आणि संचालक म्हणून ते ओळखले जातात.
सिंगापूर-भारत समुद्री द्विपक्षीय सरावात भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका, तसेच लांब पल्ल्याचा मारा करणारे पाणबुडीविरोधी विमान पी ८१ भाग घेत आहे.
भारत आणि सिंगापूरच्या नौदलाने चीनच्या वाढत्या प्रभावक्षेत्राचा साक्षी असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात सात दिवस चालणारा संयुक्त सराव सुरू केला.
दोन्ही नौदलांमधील मोहीम वाढविण्याच्या हेतूने हा सराव घेतला जात आहे. या सरावादरम्यान समुद्रातील विविध मोहिमांतर्गत कारवायांची योजना आखण्यात आली आहे.
नौदलाचे प्रवक्ता कॅप्टन डी.के. शर्मा यांनी सांगितले, की या वर्षी समुद्रातील सरावादरम्यान पाणबुडीविरोधी युद्धकौशल्य, जमीन, आकाश तसेच जमिनीखालील दलांबरोबरच हवाई संरक्षण, तसेच जमिनीवरील चकमकींवर भर असेल.
कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाकिस्तानला सणसणीत चपराक देण्यामध्ये भारताला यश आल्याने तिसऱ्या वर्धापन दिनाच्या तयारीत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारची छाती आणखीनच फुगली.
तसेच अगोदरच काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्याचे दडपण असताना जाधव प्रकरणातील प्रतिकूल निर्णयाचा विपरीत परिणाम काश्मीरमधील तणावग्रस्त परिस्थितीवर झाला असता.
सुदैवाने निकाल भारताच्या बाजूने लागल्याने मोदी सरकारवरील दडपण कमी झाले आणि दुसरीकडे पाकची कोंडी आणि नाचक्की झाली.
त्यामुळे २६ मे रोजी सरकारचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारचे व भाजपचे बाहू चांगलेच फुरफुरणार आहेत.
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा)च्या अध्यक्षपदी माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव गौतम चटर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ. विजय सतबीरसिंग यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे.
तसेच न्यायपालिकेतून बी.डी. कापडणीस यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे.
अमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल जिओग्राफिक बी स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजविले.
यंदाच्या स्पर्धेचे पहिले बक्षिस व ५० हजार डॉलरची शिष्यवृत्ती १४ वर्षांच्या प्रणय वरदा याने जिंकली. वेदा भट्टराम हा आणखी एक भारतीय वंशांचा मुलगा तिसरा आला आहे.
तसेच यंदाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या १० स्पर्धकांपैकी सहा भारतीय वंशाचे होते. गेल्या वर्षीची स्पर्धा ही भारतीय वंशाच्या मुलाने जिंकली होती.
गेल्या एक दशकापासून या स्पर्धेत भारतीय-अमेरिकी विद्यार्थ्यांचा दबदबा आहे.
जागतिक दिवस
युवा व क्रीडा दिन : तुर्कस्तान
जन्म, वाढदिवस
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
जमशेदजी टाटा, भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिध्द उद्योगपती व देशभक्त : १९ मे १९०४
विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक : १९ मे २००८
ठळक घटना
--
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.